Lokmat Sakhi >Food > मोगू मोगू.. प्या मस्त गुलाबी ड्रिंक! नाव भारी, चव भारी, करा घरबसल्या थायलंडवारी..

मोगू मोगू.. प्या मस्त गुलाबी ड्रिंक! नाव भारी, चव भारी, करा घरबसल्या थायलंडवारी..

Mogu mogu.. Drink the delicious pink drink : या उन्हाळ्यात काही तरी वेगळी रेसिपी करून बघा. नक्कीच आवडेल.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2025 20:04 IST2025-04-09T20:03:11+5:302025-04-09T20:04:19+5:30

Mogu mogu.. Drink the delicious pink drink : या उन्हाळ्यात काही तरी वेगळी रेसिपी करून बघा. नक्कीच आवडेल.

Mogu mogu.. Drink the delicious pink drink | मोगू मोगू.. प्या मस्त गुलाबी ड्रिंक! नाव भारी, चव भारी, करा घरबसल्या थायलंडवारी..

मोगू मोगू.. प्या मस्त गुलाबी ड्रिंक! नाव भारी, चव भारी, करा घरबसल्या थायलंडवारी..

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सतत काही तरी छान गार प्यायचे मन करते. मग आपण छान फळांचे ज्यूस पितो. तसेच विविध सरबत पितो. (Mogu mogu.. Drink the delicious pink drink)लिंबू सरबत, कोकम सरबत, आवळा सरबत आदी अनेक सरबतांचे प्रकार आपण करतो. तसेच नारळ पाणीही उन्हाळ्यामध्ये पितो. शरीरासाठी प्रचंड फायदेशीर असते. सारखी सारखी तीच पेये पिऊन कंटाळा आला आहे का? मग हे पेय पिऊन बघा. नक्कीच आवडेल. बाजारात आजकाल विदेशी पेये फार प्रसिद्ध आहेत. त्यातीलच एक थायलंडचे पेय म्हणजे मोगू-मोगू चवीला फारच छान लागते. (Mogu mogu.. Drink the delicious pink drink)विविध फळांचे हे मोगू-मोगू फार महाग असते. त्यामध्ये एक नारळाची जेली असते. त्या जेलीसाठी लोक हे पेय विकत घेतात. मात्र जेलीसकट मोगू-मोगू घरी तयार करणे अगदीच सोपे आहे. रेसिपी पाहा आणि करुन बघा.

साहित्य
नारळ पाणी, लीची, आगरआगर, साखर, लिंबू, बीटाचा रस

कृती
१. बाजारातून आगरआगर घेऊन या. आरामात उपलब्ध होते. जेली तयार करण्यासाठी या पदार्थाचा वापर केला जातो. नारळाचे पाणी व आगरआगरचे मिश्रण करून जेली तयार करायची.
२. एका पातेल्यामध्ये नारळाचे पाणी घ्या. त्यामध्ये थोडेसे आगरआगर घाला. त्यामध्ये एक उकळी येऊ द्या. मग गॅस बंद करा. एका ताटलीमध्ये ते पाणी ओता. पाणी गार झाल्यावर त्याची जेली होते. मग सुरीच्या मदतीने तुकडे करून घ्या. लहान तुकडे करा व एका वाटीमध्ये काढून ठेवा. 


३. बीटाचे तुकडे करा आणि पाणी घालून मिक्सरमधून फिरवून घ्या. पातळ रस करून घ्या.  
४. मिक्सरच्या भांड्यामध्ये लीची घ्या. त्यामध्ये गरजे पुरते पाणी घ्या. लीची पूर्ण बुडेल एवढे पाणी वापरा. त्यामध्ये थोडी साखर घाला. साखर वापरली नाही तरी चालेल. लीची छान पातळ करून घ्या. त्यामध्ये लिंबाचा रस घाला. अगदी रंगासाठी थोडासाच बीटाचा रस वापरा. सगळं छान मिक्स करून घ्या. 


५. एका फडक्याचा वापर करून मिश्रण छान गाळून घ्या. चोथा काढून टाका. एका ग्लासमध्ये नारळाची जेली घ्या. त्यामध्ये तयार केलेला लीचीचा ज्यूस ओता. गार करा आणि प्या.    

Web Title: Mogu mogu.. Drink the delicious pink drink

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.