Join us

monsoon food : पावसाळ्यात करा गरमागरम कुरकुरीत मिरची भजी, संध्याकाळच्या चहासोबतचा मस्त बेत- पाहा रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2025 10:33 IST

Monsoon Snacks: Mirchi Bhaji Recipe : संध्याकाळच्या चहासोबत किंवा पाहुण्यांसाठी स्पेशल झणझणीत खाऊ म्हणून मिरची भजी नेहमीच एक उत्तम पर्याय असतो.

गरमागरम चहा आणि कुरकुरीत मिरची भजी कसला स्वाद अहाहा.. पावसाळा सुरु झाला की आपल्याला नेहमीच काही तरी चटकदार चमचमीत पदार्थ खायला आवडतात. (Monsoon Food) बटाटा वडा, वडापाव, बटाटा भजी, कांदा भजी यांसारखे पदार्थ आपण नेहमीच खातो. पण कुरकुरीत मिरची भजीची चव काही औरच.(Mirchi Bhaji Recipe) मिरची भजी हा एक अत्यंत लोकप्रिय आणि चविष्ट भारतीय झणझणीत स्नॅक आहे. जो प्रामुख्याने महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्रप्रदेशात खूप आवडीनं खाल्ला जातो. (Crispy Pakora Ideas) पावसाळ्यात, संध्याकाळच्या चहासोबत किंवा पाहुण्यांसाठी स्पेशल झणझणीत खाऊ म्हणून मिरची भजी नेहमीच एक उत्तम पर्याय असतो. यासाठी वापरल्या जाणाऱ्या हिरव्या मोठ्या मिरच्या या फारशी तिखट नसतात. मिरचींना मधून चिरून त्यात चवीनुसार मीठ, चाट मसाला, बटाट्याची सारण भरुन बनवल्या जातात. बेसनाच्या पिठात कालवून मस्त तळल्या जातात. कमी वेळात तयार होणार खमंग कुरकुरीत पदार्थ कसा करायचा पाहूया. 

Konkan Food: कोकणातला पारंपरिक पदार्थ 'वालाची आमटी', तोंडाला पाणी सुटेल अशी चमचमीत भाजी

साहित्य 

पनीर - २०० ग्रॅमबटाटा - १ हिरवी मिरची - १ कोथिंबीर - १ चमचा मीठ - चवीनुसार भावनगरी मिरच्या - ६आले-लसूण पेस्ट - १ चमचा चाट मसाला - १ चमचा शाही पनीर मसाला - १ चमचा पनीर - १ वाटी बेसन - १ कप हळद - अर्धा चमचा ओवा - अर्धा चमचा पाणी तेल 

 

कृती 

1. सगळ्यात आधी एका बाऊलमध्ये पनीर कुस्करुन घ्या. त्यात उकडून मॅश केलेला बटाटा घाला. वरुन कोथिंबीर, बारीक चिरलेली हिरवी मिरची, मीठ आणि आले-लसूण पेस्ट घाला. 

2. त्यात आमचूर पावडर घालून चमच्याने सगळे एकजीव करा. शाही पनीर मसाला घालून पुन्हा मिश्रण एकजीव करा. 

3. आता भावनगरी मिरचीला व्यवस्थित धुवून पुसून घ्या. मध्यभागी चिर पाडून घ्या. एका बाऊलमध्ये बेसनाचे पीठ घेऊन त्यात हळद, ओवा आणि पाणी घालून त्याचे जाडसर पीठ तयार करा. तयार पीठात भरलेली मिरची बुडवून घ्या. 

4. तेल चांगले कडकडीत गरम झाल्यानंतर त्यात मिरची मंद आचेवर चांगली कुरकुरीत तळा. संध्याकाळी गरमागरम चहासोबत खा. 

 

टॅग्स :अन्नपाककृती