Lokmat Sakhi >Food > शाळेतून आल्यावर मुलांसाठी चार वाजताचा खास खाऊ, अप्पे पात्रात करा मिनी हनी केक

शाळेतून आल्यावर मुलांसाठी चार वाजताचा खास खाऊ, अप्पे पात्रात करा मिनी हनी केक

mini cakes recipe: mini honey cake recipe for kids: आपण मुलांसाठी कमी साखरेचा झटपट होणारा मिनी हनी केक करु शकतो.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2025 13:52 IST2025-06-17T13:51:27+5:302025-06-17T13:52:30+5:30

mini cakes recipe: mini honey cake recipe for kids: आपण मुलांसाठी कमी साखरेचा झटपट होणारा मिनी हनी केक करु शकतो.

mini honey cake recipe for kids appe pan cake tiffin snacks for kids healthy snack for children | शाळेतून आल्यावर मुलांसाठी चार वाजताचा खास खाऊ, अप्पे पात्रात करा मिनी हनी केक

शाळेतून आल्यावर मुलांसाठी चार वाजताचा खास खाऊ, अप्पे पात्रात करा मिनी हनी केक

अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच केक खायला आवडतो. (Mini cake) केकमध्ये देखील विविध फ्लेवर चाखायला मिळतात. केक जितका सॉफ्ट तितकाच जास्त तो खाण्यास मुलांना अधिक आवडतो.(mini honey cake recipe for kids) केकऐवजी मुलांना मफिन्स, मिनी केक, पॅन केक खाण्याची इच्छा जास्त असते.(appe pan honey cake) मुलांच्या शाळा सुरु झाल्याअसून त्यांना सतत गोड खाण्याची क्रेव्हिंग होत असते. अशावेळी आपण त्यांच्या खाऊच्या डब्यात विकतचे केक आणून देतो.(tiffin snacks for kids) परंतु घरच्या घरी केक बनवले तर आरोग्याच्या दृष्टीने त्यांच्यासाठी चांगले राहिल. (easy kids snack recipe)
मुलांना मधल्यावेळेत भूक लागते अशावेळी काहीतरी वेगळ खाण्यासाठी सतत त्यांचा कल्ला सुरु असतो.(quick honey cake in appe pan) रोज काय बनवायचा हा प्रश्न प्रत्येक आईला पडणारा आहे. यावेळी आपण मुलांसाठी कमी साखरेचा झटपट होणारा मिनी हनी केक करु शकतो. (lunchbox mini cakes recipe)

पावसाळ्यात करा गरमागरम हिरव्या मुगाचं कढण, पारंपरिक पौष्टिक पदार्थ- इम्युनिटी होईल बूस्ट, चवीलाही मस्त

साहित्य 

दूध - ३/४ कप 
दूध पावडर - ३/४ कप 
पिठी साखर - ३/४ कप 
तेल - १/४ कप 
मैदा - १ कप 
बेकिंग पावडर - १ चमचा
बेकिंग सोडा - १/४ चमचा 
व्हॅनिला इसेन्स - अर्धा चमचा 
पाणी - ३/४ कप 
साखर - ३ चमचे 
मध - ३ चमचे 
जाम - ४ ते ५ चमचे 
डेसिकेटेड कोकनट - २ ते ३ चमचे


कृती 

1. सगळ्यात आधी एका बाऊलमध्ये दूध, दूधाचा पावडर, पिठी साखर आणि तेल घालून फेटून घ्या. 

2. आता यामध्ये मैदा, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर घालून पुन्हा फेटून घ्या. व्हॅनिला इसेन्स घालून पुन्हा एकदा फेटा. 

3. तयार बॅटर अप्पे पात्रात घालून १५ ते २० मिनिटे बेक करुन घ्या. गॅसवर पॅन ठेवून त्यात पाणी आणि साखर घालून वितळवून घ्या. 

4. अप्पे पात्रातील मिनी केक दोन्ही बाजूने बेक झाल्यावर काढून घ्या. आता एका बाऊलमध्ये तयार साखरेच्या पाण्यात मध घालून त्याचा सिरप तयार करा. हे पाणी तयार मिनी केकवर पसरवा. 

5. आता वरुन मुलांच्या आवडीचा जाम आणि डेसिकेटेड कोकनट घाला. तयार होईल बेकरी स्टाईल मिनी हनी केक, मुलांच्या आवडीचा खाऊ. 

 

Web Title: mini honey cake recipe for kids appe pan cake tiffin snacks for kids healthy snack for children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.