Join us  

फक्त अर्ध्या तासात डाळी भिजत घालून करा क्रिस्पी मेदू वडे; दाक्षिणात्य चवीचे मेदू वडे हवेत तर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2024 1:57 PM

Medu Vada Recipe with lots of tips for crispy fluffy vadas : मेदू वडे तयार करताना जास्त तेल पितात, आकार द्यायला जमत नाही? चहाची गाळणी घ्या अन्..

मेदू वडा हा उडीद डाळीचा वापर करून तयार करण्यात येणारा कुरकुरीत पौष्टीक पदार्थ आहे (Medu Vada). हा पदार्थ दक्षिण भारतात आवर्जून केला जातो (South Indian Food). मेदू वडे हे बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ असतात. शिवाय दिसायला डोनटसारखे दिसतात. मेदू वडे काहींना जमतात तर, काहींना करायला जमत नाही (Crispy Medu vada). बऱ्याचदा मेदू वड्याला हवा तसा आकार द्यायला जमत नाही. तर काही वेळेला मेदू वडे करताना जास्त तेल पितात. ज्यामुळे मेदू वडे खाण्याची कमी होते (Cooking Tips).

पण बऱ्याचदा आपण उडीद डाळ भिजत घालायला विसरतो, किंवा अचानक घरी पाहुणे येतात. पण जर आपल्याला अर्ध्या तासात उडीद डाळ भिजत घालून मेदू वडे करायचे असतील तर ही रेसिपी नक्कीच फॉलो करून पाहा. अर्ध्या तासात उडीद डाळ भिजत घालून आपण मेदू वडे तयार करू शकता. दाक्षिणात्य पद्धतीचे कुरकुरीत मेदू वडे कसे तयार करायचे? पाहूयात(Medu Vada Recipe with lots of tips for crispy fluffy vadas).

कुरकुरीत मेदू वडे करण्यासाठी लागणारं साहित्य

उडीद डाळ

मूग डाळ

पाणी

हिरवी मिरची

आलं

लसूण

पोळ्या कडक होतात? पचतही नाही? कणिक भिजवताना घाला १ लहानशी गोष्ट-पोळ्या होतील हेल्दी

जिरं

मीठ

कोथिंबीर

कृती

सर्वप्रथम, एका बाऊलमध्ये एक कप उडीद डाळ आणि अर्धा कप मूग डाळ घालून मिक्स करा. त्यात पाणी घालून डाळी धुवून घ्या. नंतर त्यात पाणी घालून डाळी ३० मिनिटांसाठी भिजत ठेवा. ३० मिनिटानंतर मिक्सरच्या भांड्यात काढून घ्या. त्यात ३ ते ४ हिरव्या मिरच्या, आल्याचा तुकडा, ५ ते ६ लसणाच्या पाकळ्या, ३ टेबलस्पून पाणी घालून गुळगुळीत पेस्ट तयार करा.

कपभर रवा अन् दही, करा विकतसारखा मऊसूत- पांढरा ढोकळा; पाहा इन्स्टंट रेसिपी

नंतर व्हिस्करने १० मिनिटांसाठी मिश्रण फेटून घ्या. नंतर त्यात एक चमचा जिरं, चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करा. दुसरीकडे कढईत तेल घालून गरम करण्यासाठी ठेवा. जर आपल्याला हाताने मेदू वड्याला आकार द्यायला जमत नसेल तर, चहाची गाळणी घ्या. गाळणीच्या उलट्या बाजूस थोडे तेल लावा. त्यावर थोडे पीठ ठेऊन मध्यभागी छिद्र पाडा, व अलगद तेलात सोडा. नंतर सोनेरी रंग येईपर्यंत मेदू वडे तळून घ्या. अशा प्रकारे क्रिस्पी मेदू वडे खाण्यासाठी रेडी. आपण हे मेदू वडे चटणी किंवा सांबारसोबत खाऊ शकता.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स