Join us
Daily Top 2Weekly Top 5

अण्णाच्या टपरीवर मिळतो तसा टिपिकल साऊथ इंडियन मेदूवडा घरी करण्याची सोपी ट्रिक, पाहा करायचं काय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2026 09:30 IST

Annachya taprivarchya medu vada chi recipe: Medu vada oil-free tips: गोल, कुरकुरीत मेदू वडा करण्यासाठी काही खास टिप्स पाहूया.

दक्षिण भारतीय पदार्थ म्हटलं की डोळ्यांसमोर इडली, डोसा किंवा मेदू वडा आपल्याला सहज आठवतो. सकाळी ऑफिसला जाताना किंवा नाश्त्याला अण्णाच्या गाड्यावर मिळणाऱ्या मेदू वड्याची चव वेगळीच असते.(medu vada chi recipe) पण अनेकदा आपण जेव्हा घरी मेदू वडे बनवतो, तेव्हा तो खूप तेलकट होतो किंवा बाहेरुन हवा तसा हॉटेलसारखा रंग आणि कुरकुरीतपणा येत नाही. काही वेळेस वड्याचं पीठ पातळ झाल्यामुळे वड्याला आकार देणंही कठीण होत. (Medu vada oil-free tips)काही सोप्या टिप्स आपलं काम अधिक सोपं करु शकतात. हॉटेलमध्ये मिळतो तसा परफेक्ट मेदू वडा करण्यासाठी काही टिप्स फॉलो करु शकता. गोल, कुरकुरीत मेदू वडा करण्यासाठी काही खास टिप्स पाहूया. (Hotel sarkha medu vada)

नेहमीचा पुलाव खाऊन कंटाळा आला? १५ मिनिटांत करा कोबी-बीट पुलाव, आरोग्य आणि चव एकाच ताटात

साहित्य 

उडीद डाळ - १ कपपाणी आलं- १ इंच हिरवी मिरची - २ जिरे - १ चमचामीठ - चवीनुसारकोथिंबीर तेल - तळण्यासाठी

कृती 

1. सगळ्यात आधी उडीदाची डाळ २ ते ३ पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. नंतर पाणी घालून ७ ते ८ तास पाण्यात भिजत घाला. 

2. यानंतर मिक्सरच्या भांड्यात भिजवलेली उडीद डाळ, आलं, हिरवी मिरची, जिरे, मीठ घालून त्याची पेस्ट तयार करा. 

3. वरुन कोथिंबीर घालून पीठ चमच्याने ढवळून घ्या. ५ मिनिटे झाकून ठेवा. नंतर एका वाटीत पाणी घेऊन त्यात थोडेसे पीठ घाला. पीठ जर पाण्यावर तरंगले तर ते व्यवस्थित आंबवले गेले आहे असं समजा. 

4. आता कढईत तेल गरम करा. गोल चमच्याला पाणी लावून चमच्याच्या मदतीने पीठाचे सारण पसरवा. मध्यभागी खड्डा पाडून गरम तेलात वडा सोडा. कुरकुरीत तळून घेऊन खोबऱ्याच्या चटणीसोबत खा.  

English
हिंदी सारांश
Web Title : Easy trick to make South Indian Medu Vada at home

Web Summary : Make crispy, delicious Medu Vada at home like Anna's stall! Follow these simple tips for the perfect shape and taste. The recipe includes urad dal, ginger, green chilies, cumin, salt, and coriander. Soak dal, grind into paste, add spices, and deep fry until golden.
टॅग्स :अन्नपाककृती