हिवाळा सुरू झाला की बाजारात हिरवेगार, टपोरे आणि गोड मटार दिसू लागतात. या दिवसांत स्वयंपाकघरात काहीतरी झटपट, पौष्टिक आणि चविष्ट बनवायचे असेल, तर पहिली पसंती मिळते ती म्हणजे 'मटार भात' किंवा 'मटार पुलाव'ला! पांढऱ्याशुभ्र लांबसडक तांदळात उठून दिसणारे ते हिरवेगार मटार आणि घरभर दरवळणारा साजूक तुपाचा सुगंध...नुसतं ऐकताच भूक लागते. मटार भात हा केवळ एक पदार्थ नसून, तो अनेकांच्या आवडीचा 'कम्फर्ट फूड' आहे. मटार भाताची गोडी काही निराळीच असते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारा हा पदार्थ दही, रायता किंवा लोणच्यासोबत तर अप्रतिम लागतोच, पण सोबतीला एखादी रस्सा भाजी असेल तर मग विचारायलाच नको!(Matar Bhat Recipe)
हिरव्या, ताज्या मटारांचा नैसर्गिक गोडवा, मसाल्यांचा हलकासा तडका आणि मऊशार भात यांचा मेळ म्हणजे खऱ्या अर्थाने समाधान देणारा पदार्थ. विशेष म्हणजे हा भात (green peas rice recipe) ना जास्त तिखट, ना जड – अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारा. अवघ्या १० मिनिटांत तयार होणारा हा मटार भात रात्रीच्या जेवणासाठी तर मस्तच, पण डब्यासाठी, पाहुण्यांसाठी किंवा एखाद्या खास दिवशीही नक्कीच चालून जातो. एकदा केला की “आज पुन्हा तोच मटार भात कर” अशी मागणी घरच्यांकडून (matar bhat Maharashtrian style) हमखास होईल, एवढी याची चव खास आहे. झटपट करता येणाऱ्या सुगंधी मटार भाताची स्पेशल रेसिपी पाहूयात...
साहित्य:-
१. बासमती तांदूळ – १ कप२. ओले हिरवे वाटाणे – १ कप३. कांदा – १ मध्यम (बारीक चिरलेला)४. हिरवी मिरची – १ ते २ (चिरलेली)५. आले-लसूण पेस्ट – १ चमचा६. जिरे – १ चमचा७. तमालपत्र – १८. लवंग – २ काड्या ९. वेलदोडे – २१०. दालचिनी – छोटा तुकडा११. हळद - १/४ चमचा१२. गरम मसाला – १/२ चमचा१३. मीठ – चवीनुसार१४. तूप किंवा तेल – २ चमचे१५. पाणी – २ कप१६. कोथिंबीर – १ टेबलस्पून (बारीक चिरलेली)
कृती :-
१. सर्वप्रथम तांदूळ स्वच्छ धुवून १५ मिनिटे भिजत ठेवा. यामुळे भात छान मोकळा शिजतो.२. कुकर किंवा जाड पृष्ठभाग असणाऱ्या पातेल्यात तूप किंवा तेल गरम करा. त्यात जिरे घाला. जिरे तडतडले की तमालपत्र, लवंग, वेलदोडे आणि दालचिनी घालून सुगंध सुटेपर्यंत परतवा.३. आता चिरलेला कांदा घालून तो हलका गुलाबी होईपर्यंत परतावा. त्यानंतर हिरवी मिरची आणि आले-लसूण पेस्ट घालून कच्चा वास जाईपर्यंत परतवा.४. ओले वाटाणे घालून २–३ मिनिटे मध्यम आचेवर परतवा. मटारांचा नैसर्गिक गोडवा आणि मसाल्यांचा सुगंध एकत्रित खूपच छान चव देते. ५. हळद, गरम मसाला आणि मीठ घालून सर्व मिश्रण नीट कालवून घ्या.
६. भिजवलेले तांदूळ घालून हलक्या हाताने मिसळा. त्यावर २ कप पाणी घाला. झाकण लावून कुकरमध्ये २ शिट्ट्या किंवा पातेल्यात १०–१२ मिनिटे भात शिजवा.७. गॅस बंद करून भात ५ मिनिटे वाफेवर ठेवा. वरून चिरलेली कोथिंबीर घालून हलकेच भात मोकळा करा.
हा मटार भात दही, काकडी कोशिंबीर, लोणचं किंवा साध्या वरणासोबत अप्रतिम लागतो. अजून सुगंध हवा असेल तर शेवटी १ चमचा तूप वरून घालू शकता.
Web Summary : Enjoy warm, comforting Matar Bhat this winter! This easy recipe uses fresh green peas, fragrant spices, and fluffy rice. Ready in minutes, it's perfect for dinner, lunchboxes, or special occasions. Serve with yogurt, raita, or your favorite curry for a complete meal.
Web Summary : इस सर्दी में स्वादिष्ट और आरामदायक मटर भात का आनंद लें! यह आसान रेसिपी ताज़ी हरी मटर, सुगंधित मसालों और फूले हुए चावल का उपयोग करती है। मिनटों में तैयार, यह रात के खाने, लंचबॉक्स या विशेष अवसरों के लिए बिल्कुल सही है। दही, रायता या अपनी पसंदीदा करी के साथ परोसें।