'पुलाव' हा असा पदार्थ आहे की जो झटपट तयार करता येतो. अगदी घाईच्यावेळी सगळे मसाले, भाज्या, तांदूळ एकत्रित करून आपण पुलाव तयार करु शकतो. 'पुलाव' घरातील (Masoor Pulao Recipe) लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खायला आवडतो. काहीवेळा नेहमीच्या जेवणापेक्षा काहीतरी वेगळे बनवले असेल (Easy Homemade Masoor Pulao) तर जेवणही चांगलं जातं. नेहमीच चपाती, भाजी, वरण, भात खायला कोणालाच आवडत नाही. अशावेळी आपण पुलाव, बिर्याणी, मसाले भात असे भाताचे वेगवेगळे प्रकार करतो(How To Make Masoor Pulao At Home).
भाताचे असे अनेक प्रकार खायला अतिशय चविष्ट आणि रुचकर लागतात. दररोजचा तोच - तोच पुलाव खाऊन कंटाळा आला असल्यास आपण पटकन तयार होणारा 'मसूर पुलाव' घरच्या घरी करु शकतो. मसूरची भाजी, आमटी आपण करतोच पण मसूर पुलाव देखील चवीला चांगला लागतो. मसूर पुलाव तयार करण्यासाठीची सोपी रेसिपी पाहूयात.
साहित्य :-
१. तेल - २ ते ३ टेबसलस्पून
२. जिरे - १ टेबलस्पून
३. दालचिनी - २ काड्या
४. लवंग - ५ ते ६ लवंग काड्या
५. वेलची - ४ ते ५
६. चक्रीफूल - १
७. मोठी वेलची - १
८. काळीमिरी - ६ ते ७
९. कडीपत्ता - १० ते १२ पानं
१०. कांदा - १ कप (बारीक चिरलेला)
११. हिरव्या मिरच्या - आलं - लसूण पेस्ट - १ टेबलस्पून
१२. टोमॅटो - १ कप
१३. बटाटे - १ कप
१४. लाल तिखट मसाला - १ टेबलस्पून
१५. हळद - १/२ टेबलस्पून
१६. गरम मसाला - १ टेबलस्पून
१७. धणे पूड - १ टेबलस्पून
१८. मीठ - चवीनुसार
१९. अख्खा मसूर - १ कप (२ ते ३ तास भिजवलेला मसूर)
२०. बासमती तांदूळ - १ कप
२१. कसुरी मेथी - १ टेबलस्पून
२२. कोथिंबीर - १ टेबलस्पून (बारीक चिरलेली)
२३. पाणी - गरजेनुसार
२४. जिरे पावडर - १ टेबलस्पून
क्षिती जोगला फार आवडते आजीच्या हातचे आंबट वरण! पाहा आंबट वरणाची पारंपरिक रेसिपी...
भारती सिंगला आवडते तशी नेपाळी पद्धतीची तिळाची चटणी खाऊन तर पाहा, हिवाळ्यातली झणझणीत मजा...
कृती :-
१. सगळ्यात आधी एका मोठ्या पातेल्यात तेल घेऊन त्यात जिरे, दालचिनी, लवंग, वेलची, चक्रीफूल, मोठी वेलची, काळीमिरी असे सगळे खडे मसाले घालावेत.
२. त्यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा, कडीपत्ता, हिरव्या मिरच्या - आलं - लसूण पेस्ट, टोमॅटो, बटाटे, लाल तिखट मसाला, हळद, गरम मसाला, जिरेपूड धणे पूड व चवीनुसार मीठ घालावे.
३. सगळे मिश्रण व्यवस्थित शिजले की त्यात भिजवलेला मसूर, बासमती तांदूळ, कसुरी मेथी व बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी.
४. आता सगळे जिन्नस चमच्याने हलवून एकजीव करून घ्यावे. आता या पातेल्यावर झाकण ठेवून मसूर भात मंद आचेवर १० ते १२ मिनिटे व्यवस्थित शिजवून घ्यावा.
गरमागरम मसूर भात खाण्यासाठी तयार आहे. लोणचं, पापड यासोबत हा मसूर भात खाण्यासाठी सर्व्ह करावा.