रोज घरातलं खाऊन सगळ्यांनाच कंटाळा येतो.(Weight loss food) पावसाळा सुरु झाला की, आपल्याला आहारात बदल होतात. जंक फूडऐवजी आपण अनेक चांगले आणि हेल्दी पदार्थ खातो.(Monsoon food) साधा वरण-भात खाऊन आपल्याला कंटाळा येतो. पण अशावेळी आपण घरच्या घरी साध्या पद्धतीने मसूर डाळ खिचडी करु शकतो. (high protein food)
मसूर डाळ खिचडी ही पारंपरिक, पचायला हलकी आणि पौष्टिक डिश आहे.(Masoor dal khichdi) जी प्रामुख्याने महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश आणि काही प्रमाणात बंगाल आणि छत्तीसगडमध्ये बनवली जाते.(Easy vegetarian diet food) ही खिचडी पचायला हलकी, पचनाला सोपी आणि पोषकतत्वांनी भरलेली आहे. जर आपण डाएट करत असून किंवा वजन कमी करायचे असेल तर खास करुन ही खिचडी खाल्ली जाते.(Low calorie Indian meal) तूप, लोणचं आणि पापडासोबत ही खिचडी चवीने खाता येते. रेसिपी बनवताना लागणारे साहित्य आणि कृती पाहूया.
Monsoon Food : मुलं भाज्याच खात नाहीत? करा चमचमीत व्हेजिटेबल सोया पुलाव, टेस्ट भी हेल्थ भी..
साहित्य
तेल - १ चमचा
जिरे - १ चमचा
हिरवी मिरची - १
हिंग - अर्धा चमचा
लाल मिरची - २
चिरलेला कांदा - १/४ कप
बारीक चिरलेला टोमॅटो - १/४ कप
काश्मिरी लाल मिरची पावडर - १ चमचा
हळद - अर्धा चमचा
धने पावडर - १ चमचा
धुतलेले तांदूळ - १ कप
अख्खा मसूर डाळ - १ कप
पाणी - ३ कप
गरम मसाला - १ चमचा
बारीक चिरलेला कोथिंबीर - १ चमचा
लिंबाचा रस - १ चमचा
कृती
1. सगळ्यात आधी डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घ्या. मसूर डाळीला बनवण्याच्या १ तासाआधी पाण्यात भिजत ठेवा.
2. त्यानंतर गॅसवर कुकर ठेवून त्यात १ चमचा तेल घाला. नंतर त्यात जिरे तडतडू द्या. आता यामध्ये हिंग, बारीक चिरलेली हिरवी मिरची, लाल मिरची घालून चांगले परतवून घ्या.
3. बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो घालून चांगले परतवा. वरुन मीठ, हळद, लाल मिरची पावडर, धने पावडर घालून मसाला चांगला एकजीव करा. यात भिजवलेले तांदूळ आणि अख्खा मसूल घाला. तीन कप पाणी घालून चांगले ढवळून घ्या. वरुन मीठ घालून पुन्हा एकदा चमच्याने ढवळून घ्या. झाकण लावून कुकरच्या तीन शिट्ट्या काढून घ्या.
4. कुकर थोडा थंड झाल्यानंतर वरुन मसाला, कोथिंबीर आणि लिंबाचा रस घालून चमच्याने ढवळून घ्या. सर्व्ह करताना खिचडीवर साजूक तुपाची धार, लोणचं किंवा पापडसोबत आवडीने गरमागरम मसूर डाळ खिचडी.