पिवळी मूग डाळ म्हटलं की आपल्याला सर्वातआधी आठवते ती म्हणजे गरमागरम मूग डाळीची भजी...संध्याकाळच्या चहाची वेळ, मुगाची भजी, वाफाळता चहा हा अनेकांचा आवडीचा बेत असतो. पण नेहमी तीच तीच मुगाची भजी खाऊन कधी कधी कंटाळा येतो आणि काहीतरी 'हटके' किंवा कुरकुरीत खाण्याची इच्छा होते. जर तुम्हालाही मुगाच्या डाळीपासून काहीतरी वेगळा आणि चविष्ट पदार्थ करायचा असेल, तर 'मसाला मूग वडा' हा एक उत्तम पर्याय आहे(Masala Moong Daal Vada Recipe).
बाहेरून कुरकुरीत, आतून मऊ आणि मसाल्यांची खास चव असलेला 'मसाला मूग वडा' हा भन्नाट पदार्थ आहे. कमी साहित्यामध्ये झटपट तयार होणारा हा वडा चहासोबत, पाहुणचारासाठी तसेच संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी एकदम परफेक्ट पदार्थ... साधी भजी करण्यापेक्षा थोडी मेहनत घेऊन बनवलेला हा मूग डाळीचा मसाला वडा चवीला अप्रतिम लागतो... दाक्षिणात्य पद्धतीचा टच असलेला हा 'मसाला मूग वडा' तुमच्या संध्याकाळच्या चहाची मजा दुप्पट करेल. डाळीचा खरपूसपणा आणि मसाल्यांचा सुगंध यामुळे हा पदार्थ घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच नक्कीच आवडेल. बाहेरून सोनेरी आणि कुरकुरीत तर आतून मसालेदार आणि मऊ असा हा वडा एकदा खाल्ला की पुन्हा पुन्हा खावासा वाटतो. खास मसाल्यांचा सुगंध, डाळीची पौष्टिकता आणि खमंग चव यामुळे 'मसाला मूग वडा' टी टाईमसाठी परफेक्ट पदार्थ आहे. नेहमीच्या मूग डाळीच्या भजीला पर्याय म्हणून (How To Make Masala Moong Daal Vada At Home) संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी हा 'मसाला मूग वडा' नक्की ट्राय करा.
साहित्य :-
१. पिवळी मूग डाळ - २ कप (४ ते ५ तास पाण्यांत भिजवलेली)२. तांदुळाचे पीठ - १ कप ३. मीठ - चवीनुसार४. कडीपत्ता - ६ ते ८ पाने (बारीक चिरलेली)५. कोथिंबीर - २ ते ३ टेबलस्पून६. जिरे - १ टेबलस्पून७. पांढरे तीळ - १/२ टेबलस्पून८. बटाटा - १ ते २ (उकडलेला बटाटा)९. कांदा - १ कप (बारीक चिरलेला)१०. हिरव्या मिरच्या - २ ते ३ (बारीक चिरलेल्या)११. लाल तिखट मसाला - १ टेबलस्पून१२. हळद - १/२ टेबलस्पून१३. धणेपूड - १/२ टेबलस्पून१४. जिरेपूड - १/२ टेबलस्पून
कृती :-
१. मिक्सरच्या एका मोठ्या भांड्यात भिजवलेली पिवळी मूग डाळ ओतून गरजेनुसार पाणी घालावे. वाटून त्याचे बॅटर तयार करून घ्यावे. २. पिवळ्या मूग डाळीचे बॅटर मिक्सरमधून एका बाऊलमध्ये घेऊन त्यात तांदुळाचे पीठ, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेला कडीपत्ता व कोथिंबीर आणि पांढरे तीळ, जिरे घालावे. (गरजेनुसार यात पाणी घालून भजी साठी जसे बेसन पीठ भिजवतो तसेच बॅटर तयार करावे, परंतु बॅटर किंचित घट्ट असावे.)
तळणीचे पदार्थ होणार नाही तेलकट! शेफ संजीव कपूर सांगतात १ ट्रिक, तेल न पिता होतील कुरकुरीत...
३. दुसऱ्या एका बाऊलमध्ये उकडलेला बटाटा घेऊन तो व्यवस्थित मॅश करून घ्यावा. मग यात बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, लाल तिखट मसाला, हळद, धणेपूड, जिरेपूड, व मीठ घालावे. सगळे मिश्रण व्यवस्थित कालवून त्याचे मध्यम आकाराचे छोटे - छोटे गोळे तयार करुन घ्यावेत. ४. आता या मिश्रणाचे तयार गोळे मूग डाळीच्या बॅटरमध्ये घोळवून गरम तेलात सोडून गोल्डन - ब्राऊन व खरपूस रंग येईपर्यंत व्यवस्थित तळून घ्यावेत.
खाण्यासाठी तयार आहेत गरमागरम मसाला मूग वडा, हिरवी चटणी किंवा सॉससोबत आपण मसाला मूग वडा अगदी ताव मारत खाऊ शकता.
Web Summary : Tired of the same old moong bhaji? Try Masala Moong Vada! This crispy, flavorful snack is easy to make with simple ingredients. A perfect tea-time treat, it's sure to be a family favorite. Enjoy this South Indian-inspired delight!
Web Summary : क्या आप एक ही तरह की मूंग भजी से ऊब गए हैं? मसाला मूंग वड़ा आजमाएं! यह कुरकुरा, स्वादिष्ट नाश्ता साधारण सामग्री के साथ बनाना आसान है। चाय के समय के लिए एकदम सही, यह निश्चित रूप से परिवार का पसंदीदा होगा। इस दक्षिण भारतीय-प्रेरित आनंद का आनंद लें!