दररोजच्या जेवणात चपाती हा पदार्थ जवळपास प्रत्येक घरात बनवला जातो. भाजीसोबत गरमागरम चपाती खाण्याची चव काही औरच असते. पण रोज तीच साधी चपाती खाण्याचा अनेकांना कंटाळा येतो. अशावेळी त्याच चपातीला थोडा वेगळा आणि चविष्ट ट्विस्ट दिला तर जेवण अधिक रुचकर बनू शकते. अशाच वेगळ्या चवीचा एक पर्याय म्हणजे मसाला चपाती(Masala Chapati Recipe).
गव्हाच्या पिठामध्ये विविध मसाले, कोथिंबीर किंवा इतर साहित्य मिसळून बनवलेली मसाला चपाती चवीलाही जबरदस्त लागते आणि पौष्टिकही असते. विशेष म्हणजे ही चपाती बनवण्यासाठी फार वेळ लागत नाही आणि घरात उपलब्ध असलेल्या साध्या साहित्यामध्येही ती सहज तयार करता येते. सकाळच्या नाश्त्यासाठी, मुलांच्या डब्यासाठी किंवा संध्याकाळच्या हलक्या खाण्यासाठी मसाला चपाती हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. कधीकधी रात्रीचं किंवा सकाळचं पीठ जास्त मळलं जातं आणि मग त्याच त्याच साध्या नेहमीच्या नेहमीच्या चपात्या बनवण्याचा कंटाळा येतो. अशावेळी उरलेल्या साध्या पिठाला एक नवा ट्विस्ट देण्यासाठी 'मसाला चपाती' ही एक बेस्ट आयडिया आहे. काही घरगुती मसाले आणि थोडंसं तूप वापरून तुम्ही या साध्या पिठापासून केलेली मसाला चपाती (How To Make Masala Chapati At Home) घरातील सगळ्यांनाचं खायला आवडेल. रात्रीच्या जेवणासाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी हा एक साधासोपा चटपटीत पदार्थ बेस्ट आहे.
साहित्य :-
१. फुटाण्याची डाळ - १ कप
२. कडीपत्त्याची पाने - १ कप
३. पुदिन्याची पाने - १ कप
४. लसूण पाकळ्या - १० ते १२ पाकळ्या
५. जिरं - २ टेबलस्पून
६. लाल मिरची पावडर - २ टेबलस्पून
७. मीठ - चवीनुसार
८. गव्हाचे पीठ - २ कप
९. तेल - ४ ते ५ टेबलस्पून
१०. कोथिंबीर - ३ ते ४ टेबलस्पून (बारीक चिरलेली)
वाळवण स्पेशल : तांदळाच्या पिठाचे पळी पापड! न लाटता पापड करण्याची रेसिपी, तेलात फुलतील दुप्पट...
कृती :-
१. मिक्सरच्या एका भांड्यात फुटण्याची डाळ, कडीपत्त्याची पाने, पुदिन्याची पाने, लसूण पाकळ्या, जिरं, लाल मिरची पावडर, चवीनुसार मीठ घालावं. आता मिक्सरच्या एका मोठ्या भांड्यात सगळे जिन्नस घेऊन ते व्यवस्थित वाटून त्याची बारीक पूड वाटून मसाला तयार करून घ्यावा. वाटून घेतलेला मसाला एका बाऊलमध्ये काढून घ्यावा.
२. नेहमीप्रमाणे कणकेची गोलाकार चपाती लाटून घ्यावी. मग त्यावर चमचाभर तेल घालून ते व्यवस्थित पसरवून घ्यावं. त्यानंतर त्यावर तयार मसाला भुरभुरवून घालावा. तो मसाला आणि तेल व्यवस्थित हाताने पसरवून चपातीच्या कडेपर्यंत पसरवून लावून घ्यावं. वरून बारीक चिरलेली बारीक कोथिंबीर घालावी.
३. मग या चपातीची चौकोनी घडी घालावी आणि चपाती पुन्हा नेहमीप्रमाणे लाटून घ्यावी.
४. तयार मसाला चपाती तव्यावर तेल सोडून खरपूस अशी दोन्ही बाजूने भाजून घ्यावी. चपाती भाजल्यावर वरून तेल किंवा तूप लावून घ्यावं.
गरमागरम मसाला चपाती खाण्यासाठी तयार आहे. सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत तसेच वाफाळत्या चहासोबत देखील आपण ही मसाला चपाती खाऊ शकता.
