Lokmat Sakhi >Food > मराठवाडा स्पेशल पारंपरिक रेसिपी! झणझणीत आदनवड्या, मऊ लुसलुशीत पदार्थ-डब्यासाठी खास पर्याय

मराठवाडा स्पेशल पारंपरिक रेसिपी! झणझणीत आदनवड्या, मऊ लुसलुशीत पदार्थ-डब्यासाठी खास पर्याय

Marathwada traditional recipes: spicy Maharashtrian snack: authentic Marathwada food: सकाळच्या डब्यात भाजीला काही पर्याय नसेल तर आपण ही रेसिपी नक्की ट्राय करु शकतो. यासाठी लागणारे साहित्य पाहूया.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2025 18:11 IST2025-06-26T18:09:51+5:302025-06-26T18:11:27+5:30

Marathwada traditional recipes: spicy Maharashtrian snack: authentic Marathwada food: सकाळच्या डब्यात भाजीला काही पर्याय नसेल तर आपण ही रेसिपी नक्की ट्राय करु शकतो. यासाठी लागणारे साहित्य पाहूया.

Marathwada special traditional recipe Spicy and soft Adan vadya masala vadi perfect lunchbox | मराठवाडा स्पेशल पारंपरिक रेसिपी! झणझणीत आदनवड्या, मऊ लुसलुशीत पदार्थ-डब्यासाठी खास पर्याय

मराठवाडा स्पेशल पारंपरिक रेसिपी! झणझणीत आदनवड्या, मऊ लुसलुशीत पदार्थ-डब्यासाठी खास पर्याय

महाराष्ट्रातील अनेक राज्यात विविध पदार्थांची चव चाखायला मिळते.(Tiffin box recipe) प्रांत बदलला की, पदार्थांचे नाव आणि चवही बदलते. मराठवाडा हा खवय्याप्रेमींसाठी अगदी खास शहर आहे. (Maharashtra traditional recipe) मराठवाड्यात आदनवड्या हा पारंपरिक पद्धतीने केला जाणारा कोरडा, टिकणारा आणि पौष्टिक पदार्थ आहे.(Adanvadiya recipe for lunchbox) आदनवड्या म्हणजे पिठाचं किंवा डाळीच्या मिश्रणाचं लाटून केलेली कोरडी वडी. 
आदनवडी ही मराठवाडा, विदर्भ आणि काही खानदेशी भागात केली जाणारी पारंपरिक रेसिपी आहे. सण, उपवासाच्या दिवशी किंवा दिवाळीत काही ठिकाणी हा पदार्थ केला जातो.(homemade traditional flatbread) हा पदार्थ कमी साहित्यातून पौष्टिक आणि टिकणारा पदार्थ आहे. सकाळच्या डब्यात भाजीला काही पर्याय नसेल तर आपण ही रेसिपी नक्की ट्राय करु शकतो. यासाठी लागणारे साहित्य पाहूया. (Adanvadiya step by step recipe)

Monsoon food : वाफाळत्या भातासोबत खा आंबट-गोड चवीचं वरण, पारंपरिक रेसिपी- पावसाळ्यातलं कम्फर्ट फूड

साहित्य 
कांदे -२ 
सुके खोबरे- १ वाटी 
हिरव्या मिरच्या- २
आल्याचे तुकडे - ३ ते ४
लसूण पाकळ्या - ७ ते ८ 
कोथिंबीर
तेल - ३ ते ४ चमचे
काळा मसाला - १ चमचा
मीठ
बेसन पीठ - १ वाटी
मीठ - चवीनुसार 
हळद - १ चमचा 
जिरेपूड - १ चमचा
धणेपूड - २ चमचा
लाल तिखट - १ चमचा 
ठेचलेला लसूण-जिरे - अर्धा चमचा 
पाणी

कृती 

1. सगळ्यात आधी आपल्याला कांद्याची सालं काढून त्याला चार भागामध्ये चिरा पाडा. त्यानंतर गॅसवर जाळी ठेवून चिरलेला कांदा, खोबरे आणि मिरच्या चांगल्या भाजून घ्या. खोबरे थोडेसे भाजल्यानंतर त्याला काढा. त्यानंतर मिरच्या भाजा. 

2. आता भाजलेल्या खोबऱ्याचे तुकडे करा. गॅसवर तवा गरम करुन त्यात तेल घाला. त्यात सगळ्यात आधी खोबरे परतवून घ्या. भाजलेले खोबरे काढून आता तव्यावर कांदा, मिरची, आले आणि लसूण परतवून घ्या. व्यवस्थित भाजल्यानंतर पाटावर वाटून घ्या. 

3. फोडणीसाठी गॅसवर कढई गरम करुन त्यात तेल घाला. त्यात काळा मसाला आणि तयार केलेले कांद्या-खोबऱ्याचे वाटण घाला. चांगले परतवून घ्या, त्याला तेल सुटू लागले की, मसाला व्यवस्थित शिजला आहे असं समजा. वरुन त्यात कोथिंबीर आणि धने पावडर घालून परतवून घ्या. वरुन त्यात गरम पाणी घालून उकळी काढा. मीठ घालून गॅस बंद करा. 

4. आता वड्या बनवण्यासाठी बेसनाचे पीठ घ्या. त्यात मीठ, हळद, लाल तिखट, धणे पूड, ठेचलेला लसूण-जिरे घाला. पाणी घालून व्यवस्थित मळून घ्या. त्याची चपाती लाटून घ्या. चपाती जास्त जाड आणि पातळ नसावी. याचे त्रिकोणी तुकडे करा. 

5. आता तयार रस्सामध्ये या वड्या घालून एक उकळी येऊ द्या. शिजल्यानंतर थोडी कोथिंबीर घालून भात किंवा भाकरीसोबत खा मराठवाड्यातील स्पेशल झणझणीत आदणवड्या. 

 

Web Title: Marathwada special traditional recipe Spicy and soft Adan vadya masala vadi perfect lunchbox

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.