Lokmat Sakhi >Food > अक्षय्य तृतीया स्पेशल : वाटीभर आंब्याच्या रसाची करा पुरणपोळी, खास पदार्थानं करा मुहूर्त...

अक्षय्य तृतीया स्पेशल : वाटीभर आंब्याच्या रसाची करा पुरणपोळी, खास पदार्थानं करा मुहूर्त...

AMBA PURAN POLI : Mango Puran Poli : Summer Special Recipe Mango Puran Poli : Akshay Tritiya Special Mango Puran Poli : How To Make Mango Puran Poli At Home : अक्षय्य तृतीयेला आंब्याच्या रसाच्या पुरणपोळीचा झक्कास बेत एकदा नक्की करुन पाहाच...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2025 14:20 IST2025-04-29T14:00:39+5:302025-04-29T14:20:32+5:30

AMBA PURAN POLI : Mango Puran Poli : Summer Special Recipe Mango Puran Poli : Akshay Tritiya Special Mango Puran Poli : How To Make Mango Puran Poli At Home : अक्षय्य तृतीयेला आंब्याच्या रसाच्या पुरणपोळीचा झक्कास बेत एकदा नक्की करुन पाहाच...

Mango Puran Poli Akshay Tritiya Special Mango Puran Poli How To Make Mango Puran Poli At Home AMBA PURAN POLI | अक्षय्य तृतीया स्पेशल : वाटीभर आंब्याच्या रसाची करा पुरणपोळी, खास पदार्थानं करा मुहूर्त...

अक्षय्य तृतीया स्पेशल : वाटीभर आंब्याच्या रसाची करा पुरणपोळी, खास पदार्थानं करा मुहूर्त...

अक्षय्य तृतीयेचा सण म्हणजे साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक. आपल्यापैकी बऱ्याचजणांच्या घरात अक्षय्य तृतीयेच्या खास दिवशी आंब्याची पहिली पेटी विकत आणली जाते. बऱ्याच घरांमध्ये अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर पहिला आंबा (Mango Puran Poli) खाल्ला जातो, आजही काही घरांमध्ये ही प्रथा पाळली जाते. आंब्याची पेटी आणल्यावर आपण आंबे तर खातोच, पण आंब्याच्या रसाचे (Akshay Tritiya Special  Mango Puran Poli) अनेक पदार्थ देखील करून त्यावर ताव मारतो. महाराष्ट्रीयन परंपरेमध्ये प्रत्येक सणावाराला वरणापूरणाचा स्वयंपाक केला जातोच(How To Make Mango Puran Poli At Home).

अक्षय्य तृतीयेनिमित्त घरोघरी पुरणपोळीचा बेत आखला जातो. परंतु आपली नेहमीची डाळीची पुरणपोळी तर आपण प्रत्येक सणावाराला हमखास खातोच. यासाठीच यंदाच्या अक्षय्य तृतीयेला आंब्याच्या रसाची पुरणपोळी देखील आपण नक्की ट्राय करून पाहू शकतो. एरवी आपण नेहमीची तीच ती पुरणपोळी तर खातो. पण आंब्याच्या रसाचा काहीतरी वेगळा पदार्थ करायचा असल्यास तुम्ही ही आंब्याच्या रसाची मऊ, लुसलुशीत होणारी पुरणपोळी एकदा तयार करून तर पाहा... अक्षय्य तृतीयेला आंब्याच्या रसाच्या पुरणपोळीचा झक्कास बेत एकदा नक्की करुन पाहाच...           

साहित्य :- 

१. आंब्याचा रस - २ कप 
२. बारीक रवा - १/२ कप 
३. साजूक तूप - १ ते २ टेबलस्पून 
४. साखर - २ कप 
५. मिल्क पावडर - १/४ कप 
६. वेलची पूड - १ टेबलस्पून 
७. गव्हाचे पीठ - १ कप 
८. मैदा - १/२ कप 
९. मीठ - चवीनुसार 
१०. हळद - १/२ टेबलस्पून 
११. पाणी - गरजेनुसार 
१२. तेल - २ ते ३ टेबलस्पून 

सांडगी मिरचीतला मसाला निघू नये म्हणून २ सोप्या ट्रिक्स - खराब न होता वर्षभर टिकेल चांगली, चवीला झणझणीत...


इवल्याशा गुळाच्या खड्याचे करा थंडगार सरबत! थकवा जाईल पळून, प्या गूळ सरबत...

कृती :- 

१. सगळ्यातआधी आंबे स्वच्छ धुवून त्यांचा रस काढून घ्यावा. 
२. एका मोठ्या पॅनमध्ये साजूक तूप घेऊन त्यात बारीक रवा घालून तो खरपूस रंग येईपर्यंत चांगला परतून घ्यावा. रवा परतून झाल्यावर त्यात आंब्याचा रस घालून तो सारखा हलवत राहून शिजवून घ्यावा. 
३. रव्याचे सारण थोडे शिजत आल्यावर त्यात मिल्क पावडर, वेलची पूड व साखर घालून ती संपूर्णपणे विरघळवून घ्यावी. आता मिश्रणाला हलकासा घट्टसरपणा येईपर्यंत शिजवून घ्यावे. 
४. पॅनमधील मिश्रण पॅन सोडून वेगळे आणि थोडे घट्टसर होऊ लागले की आपले पुरण तयार आहे असे समजावे. 

आंबा चिरण्याच्या ७ पद्धती, प्रत्येक फोडीप्रमाणे वेगळी लागेल आंब्याची चव! पाहा कशासाठी - कसा चिराल आंबा...

५. आता एका मोठ्या भांड्यात गव्हाचे पीठ, मैदा, तेल, चवीनुसार मीठ व हळद घालूंन पोळीसाठीची कणीक मळून घ्यावी. मळून घेतलेली कणीक हलक्या ओलसर कापडाने झाकून ३० ते ४० मिनिटे तशीच ठेवून द्यावी. 
६. मग या कणकेचे छोटे छोटे खोलगट गोळे तयार करुन त्यात तयार रव्याचे पुरण भरुन मध्यम आकाराचे गोळे तयार करून घ्यावेत. 
७. आता या तयार गोळ्यांची छान गोलाकार अशी पोळी लाटून घ्यावी. साजूक तूप लावून ही पोळी दोन्ही बाजुंनी खरपूस भाजून घ्यावी. 

आंब्याच्या रसाची गोड चवीची पुरणपोळी खाण्यासाठी तयार आहे. आपण ही गरमागरम पोळी साजूक तूप किंवा दूधासोबत लावून खाल्ली तर त्याची चव अजूनच छान लागते.

Web Title: Mango Puran Poli Akshay Tritiya Special Mango Puran Poli How To Make Mango Puran Poli At Home AMBA PURAN POLI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.