Join us  

अक्षय्य तृतिया स्पेशल : कपभर रवा आणि २ आंबे, करा आंब्याचा मऊसूत शिरा फक्त १० मिनिटांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2024 5:13 PM

Mango Kesari Recipe | Mango Sooji Halwa : तोंडात विरघळेल असा मऊ लुसलुशीत आब्यांचा शिरा

अक्षय्य तृतीया म्हटलं की, सगळ्यात आधी आठवतं ते म्हणजे आमरसाचं जेवण (Mango Sheera). अक्षय्य तृतीयेला सगळ्यांच्याच घरात गोडा धोडाचा स्वयंपाक केला जातो (Cooking Tips). याव्यतिरिक्त या दिवसानिमित्त आंब्याचा गोड शिरा केला जातो. उन्हाळा सुरु झाला की, लोकांना आंबा खाण्याचे वेध लागते. आंबा म्हणजे काहींसाठी स्वर्गसुख. आंब्याचे अनेक पदार्थ केले जातात. आंब्याची लस्सी, आंबा कुल्फी, आंब्याची खीर आपण खाल्लीच असेल. पण कधी आंब्याचा शिरा करून पाहिलं आहे का?

आंब्याचा शिरा हा पदार्थ पाहिल्यानंतर नक्कीच अनेकांच्या तोंडातून पाणी सुटेल. शिवाय तोंडात विरघळणारीही रेसिपी काही मिनिटात तयार होणारी आहे. जर आपल्याला अक्षय्य तृतीयानिमित्त गोड पदार्थ करण्याची इच्छा झाली असेल तर, एकदा गोडसर आंब्याचा शिरा करून पाहाच(Mango Kesari Recipe | Mango Sooji Halwa).

आंब्याचा शिरा करण्यासाठी लागणारं साहित्य

तूप

रवा

आंबा

बदाम

सावधान! तुम्ही प्लास्टिकचा तांदूळ तर खात नाही ना? '४' टिप्स, प्लास्टिक तांदूळ ' असा ' ओळख

काजू

दूध

पाणी

कृती

सर्वप्रथम, २ आंबे घ्या आणि पाण्यात घालून धुवून घ्या. सुरीने आंबा चिरून त्याचा गर मिक्सरच्या भांड्यात काढून घ्या. त्यात चिमुटभर लाल रंग घालून आंब्याचा रस तयार करा.

दुसरीकडे कढई गरम करण्यासाठी ठेवा. त्यात एक वाटी साजूक तूप घाला. तूप गरम झाल्यानंतर त्यात एक मोठा कप रवा घालून भाजून घ्या. रव्याचा रंग ब्राऊन झाल्यानंतर त्यात एक कप बारीक चिरलेला बदाम आणि काजू घालून मिक्स करा.

ना लाटणे- ना तेलाचा एक थेंब, तिप्पट फुलणारे मैद्याचे पापड करण्याची सोपी कृती; टिकतील महिनाभर

आता त्यात एक वाटी दूध आणि दीड वाटी उकळलेलं पाणी घालून चमच्याने सतत ढवळत राहा. नंतर गॅस मध्यम आचेवर ठेवा, आणि त्यात एक कप साखर, चिमुटभर वेलची पावडर घालून मिक्स करा.

शेवटी एक वाटी आंब्याचा पल्प घालून व्यवस्थित एकजीव करा. त्यावर २ मिनिटांसाठी झाकण ठेवा. वाफेवर शिरा शिजवून घ्या. अशाप्रकारे तोंडात विरघळणारा असा आंब्याचा शिरा खाण्यासाठी रेडी.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सअक्षय्य तृतीया