'काजू' हा सुक्यामेव्यातील सर्वात महत्वाचा पदार्थ आहे. पांढऱ्याशुभ्र काजूंची चव कायम आपल्या तोंडात रेंगाळत रहाते. समोर काजू दिसले की ते कितीही खाल्ले तरीही (Malvani Traditional Recipe Cashew Sabji) पोटच भरत नाही. सध्या आंबा - कैरी मिळण्याच्या या ऋतूत बाजारांत ओले काजूगर सहज विकत मिळतात. आंबा, कैरी सोबतच आपण ओल्या काजूगरांपासून वेगवेगळे पदार्थ तयार करुन आवडीने खातो. एरव्ही वर्षभर सुके काजू भाजून, खारवून, तिखट-मीट (Olya Kajuchi Bhaji) लावून खाण्यात तर मजा असतेच, परंतु ऐन मोसमात ओल्या काजुची उसळ किंवा भाजी खाल्ली नाही तर आपण खवय्ये कसले? (Malvani Olya Kajuchi Usal).
सहसा गोड पदार्थांमध्ये किंवा पुलावभातामध्ये आपण काजू घालतो. विशिष्ट्य पदार्थांमध्ये काजू घातले तर त्या पदार्थाची चव आणखीनच वाढते व पदार्थ खायला मजा येते. भाजीचे ओले काजू हे चवीला कोवळे असतात. म्हणूनच त्याची चव खूप छान लागते. साधारण उन्हाळा सुरु झाला की, बाजारात कैरी, आंबे, फणस, काजू दिसू लागतात. कोकणातील हा खास मेवा चाखण्याची हीच तर एक संधी असते. ओले काजू ही कोकणातील खासियत. या ओल्या काजूपासून बनवली जाणारी उसळ किंवा भाजी ही इतर सगळ्या भाज्यांना चवीमध्ये मागे टाकू शकते. ओल्या काजूगरांची ही झक्कास मालवणी स्टाईल रेसिपी नक्की ट्राय करा(How To Make Malvani Style Kajuchi Bhaji).
साहित्य :-
१. ओले काजू - २ कप (पाण्यांत भिजवून साल काढून घेतलेले)
२. तमालपत्र - १ ते २ पान
३. तेल - २ टेबलस्पून
४. जिरे - १/२ टेबलस्पून
५. लवंग - ४ ते ५ काड्या
६. काळीमिरी - ५ ते ७ दाणे
७. दालचिनी - १ काडी
८. आलं - १ टेबलस्पून
९. लसूण - ६ ते ८ पाकळ्या
१०. ओलं खोबरं - १ कप
११. कांदा - १ कप (बारीक चिरलेला)
१२. टोमॅटो - १ कप (बारीक चिरलेला)
१३. हळद - १ टेबलस्पून
१४. लाल तिखट मसाला - १ टेबलस्पून
१५. मीठ - चवीनुसार
१६. मालवणी मसाला - १ टेबलस्पून
१७. कोथिंबीर - १ टेबलस्पून
१ कप दूध-वाटीभर कलिंगड, करा ‘मोहब्बत का शरबत’! उन्हाळ्यातील गारेगार पदार्थ, मुलांनाही आवडेल...
यंदा वाळवणात करा वर्षभर टिकणारी दही मिरची, तोंडी लावायला खास चमचमीत पदार्थ...
कृती :-
१. ओले काजूगर पाण्यांत भिजवून स्वच्छ धुवून घ्यावेत. त्यानंतर त्याची सालं काढून काजूगर सोलून घ्यावेत.
२. आता एका पॅनमध्ये तेल घेऊन त्यात तमालपत्र, जिरे, लवंग, काळीमिरी, दालचिनी, आलं, लसूण, ओलं खोबरं घालून सगळे जिन्नस एकत्रित तेलावर भाजून घ्यावेत.
३. सगळे जिन्नस व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर एका डिशमध्ये काढून थोडे थंड होऊ द्यावेत. थंड झाल्यानंतर हे सगळे जिन्नस मिक्सर जार मध्ये घालून एकत्रित वाटून वाटण तयार करून घ्यावे.
४. आता एका मोठ्या पॅनमध्ये तेल घेऊन त्यात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, हळद, लाल तिखट मसाला, चवीनुसार मीठ, मालवणी मसाला घालावा.
ब्रेडचे ‘हे’ ६ पदार्थ म्हणजे मेजवानीच! नाश्ता ते स्वीट डिश, ब्रेड है मुमकीन है!
गुलकंद करण्याची पाहा पारंपरिक पद्धत, लालचुटूक गुलाबाचा गारेगार पदार्थ-उन्हाळ्यात आवश्यक थंडावा!
५. आता या तयार मसाल्यात मिक्सरमध्ये वाटून तयार केलेले वाटणं घालावे. २ ते ३ मिनिटे हे सगळे मिश्रण शिजवून घ्यावे.
६. सगळ्यात शेवटी काजू आणि गरजेनुसार पाणी घालून वर झाकण ठेवून ३ ते ५ मिनिटे व्यवस्थित शिजवून घ्यावे.
७. आता वरून बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरवून घ्यावी.
ओल्या काजूची उसळ खाण्यासाठी तयार आहे. गरमागरम भात, भाकरी किंवा चपाती सोबत देखील आपण ही उसळ खाऊ शकता.