Lokmat Sakhi >Food > घरच्याघरी करा मऊ मस्त मोजेरेला चीज, २ गोष्टी फक्त हव्या-घरीच करा महिनाभर टिकणारे चीज

घरच्याघरी करा मऊ मस्त मोजेरेला चीज, २ गोष्टी फक्त हव्या-घरीच करा महिनाभर टिकणारे चीज

Homemade mozzarella cheese: How to make mozzarella: २ पदार्थांच्या मदतीने घरच्या घरी मऊ मोजेरेला चीज बनवू शकतो. महिनाभर टिकणारी ही मोजेरेला चीजची रेसिपी पाहूया.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2025 16:45 IST2025-05-05T15:04:18+5:302025-05-05T16:45:02+5:30

Homemade mozzarella cheese: How to make mozzarella: २ पदार्थांच्या मदतीने घरच्या घरी मऊ मोजेरेला चीज बनवू शकतो. महिनाभर टिकणारी ही मोजेरेला चीजची रेसिपी पाहूया.

Make soft mozzarella cheese at home with just 2 ingredients it will be made quickly how to store one month | घरच्याघरी करा मऊ मस्त मोजेरेला चीज, २ गोष्टी फक्त हव्या-घरीच करा महिनाभर टिकणारे चीज

घरच्याघरी करा मऊ मस्त मोजेरेला चीज, २ गोष्टी फक्त हव्या-घरीच करा महिनाभर टिकणारे चीज

हल्ली प्रत्येक पदार्थांची चव पूर्ण करण्यासाठी चीजचा उपयोग केला जातो.(Homemade mozzarella cheese) लहांन मुलांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला चीज फार आवडते. गेल्या काही वर्षात भारतीयांना देखील चीजची भूरळ पडली.(How to store homemade cheese) अगदी आवडीने चीज खाल्ले जाते. पराठा, सॅण्डविच, केक, पिझ्झा, बर्गर, पास्ता यांसारख्या अनेक पदार्थांमध्ये चीज हवे असते. (Quick and easy mozzarella cheese recipe)
बाजारात आपल्याला अनेक वेगवेगळ्या ब्रॅण्डचे चीज पाहायला मिळते. तर काही प्रमाणात त्यातही भेसळ केली जाते. (Fresh mozzarella at home)त्यामुळे अनेकदा खाताना मनात शंका निर्माण होते. हे चीज पदार्थाला चविष्टच बनवत नाही तर आरोग्याला देखील फायदेशीर असते.(cheese recipe) कमी सोडियम आणि कॅलरी असणारा हा पदार्थ आरोग्यासाठी चांगला मानला गेला आहे. सध्या दुग्धजन्य पदार्थांच्या किमती वाढताना पाहायला मिळत आहे. अशातच चीजचे क्यूब आणि स्लाइसच्या किमतीवर देखील परिणाम झाला आहे. 

पारंपरिक पद्धतीच्या करा आंबा-नारळाच्या वड्या,चविष्ट गोडाचा पदार्थ, १० दिवस टिकणारी आंबा बर्फी

आज आम्ही मोजेरेला चीज बनवण्याची सोपी पद्धत सांगणार आहोत. आपण २ पदार्थांच्या मदतीने घरच्या घरी मऊ मोजेरेला चीज बनवू शकतो. महिनाभर टिकणारी ही मोजेरेला चीजची रेसिपी पाहूया. 

साहित्य 

कच्चे दूध - १ लीटर 
व्हिनेगर - अर्धा कप 
मीठ - १ चमचा 
बर्फाचे खडे 

">

कृती 

1. सगळ्यात आधी गॅसवर कच्चे दूध तापवण्यास ठेवा. दूध हलके गरम झाले की गॅस बंद करुन त्यात व्हिनेगर घाला. 

2. दूध आता व्यवस्थित ढवळत राहा. दूध फाटल्यानंतर थोडा वेळ झाकून ठेवा. आता चमच्याच्या मदतीने दूधाचा गोळा एका भांड्यात काढा. 

3. बाऊलमध्ये तयार झालेला गोळ्यातील पाणी हाताने दाबून काढा.कढईत असणाऱ्या दूधाच्या पाण्यात मीठ घालून ढवळून घ्या. 

4. पुन्हा गॅस पेटवून त्यात तयार चीजचा गोळा घाला. दोन सेकंद ठेवून गोळा बाहेर काढा. आता थंड पाण्यात किंवा बर्फाच्या खड्यांमध्ये तयार गोळा काही मिनिटे राहू द्या. 

5. हाताने पुन्हा दाबून त्यातील पाणी काढून घ्या. एका डब्यांत आकार येण्यासाठी हा गोळा घेऊन फ्रीजरमध्ये २ ते ३ तास सेट होण्यास ठेवा. 

6. काही तासाने ब्रेड किंवा हव्या त्या पदार्थांमध्ये किसून किंवा कापून ते खाऊ शकतो. चवही चांगली लागते. तसेच महिनाभर टिकत असल्यामुळे एकदाच आपण बनवू शकतो. 

7. घरच्या घरी सोप्या पद्धतीचे होईल मऊ-मोजेरेला चीज. मुले देखील आवडीने खातील. 

 

Web Title: Make soft mozzarella cheese at home with just 2 ingredients it will be made quickly how to store one month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.