Join us

गणपतीसाठी करा शेंगदाणा मोदक, कमी वेळेत झटपट होणारा एक चविष्ट पौष्टिक नैवेद्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 13:54 IST

गणपतीचे १० दिवस वेगवेगळे नैवेद्य केले तर आपल्यालाही छान वाटते आणि खाणाऱ्यालाही मजा येते. म्हणूनच गणपतीला दाखविण्याच्या नैवेद्य यादीमध्ये हा एक पदार्थ टाकून द्या. चविष्ट आणि पौष्टिक शेंगदाणा मोदक

ठळक मुद्देकमी वेळेत अतिशय झटपट होणारा हा पदार्थ आहे. त्यामुळे नोकरदार महिलांसाठी तर ही रेसिपी विशेष उपयुक्त ठरणारी आहे. 

प्रतिभा भोजने जामदारखवा टाकून केलेले किंवा कणिक आणि रवा एकत्र करून केलेले मोदक नेहमीच करायला नको वाटतात. नैवेद्याच्या मोदकांमध्ये कधीतरी चव बदलदेखील पाहिजेच असते. म्हणूनच ही एक खास रेसिपी. उपवासाचे शेंगदाणा मोदक. हे मोदक अतिशय चवदार तर असतातच पण गुळ आणि शेंगदाणे यामुळे या मोदकांमध्ये पौष्टिक घटकही खूप असतात. शिवाय कमी वेळेत अतिशय झटपट होणारा हा पदार्थ आहे. त्यामुळे नोकरदार महिलांसाठी तर ही रेसिपी विशेष उपयुक्त ठरणारी आहे. 

 

शेंगदाणा मोदकांसाठी लागणारे साहित्य१ वाटी भाजून सालं काढलेले शेंगदाणे, पाव वाटी गूळ, १ चमचा वेलदोडा पूड, ४ चमचे साजूक तूप.

 

कसे करायचे शेंगदाणा मोदक?मिक्सरमध्ये शेंगदाणे, गूळ, वेलदोडा आणि साजूक तूप घालून फिरवून घ्यावे. मिश्रण मऊ होईल. मोदकाच्या साच्याला तुपाचे बोट लावून त्यात हे मिश्रण भरून मोदक बनवून घ्यावेत. गूळ आणि तुपाचे प्रमाण आवडीनुसार बदलले तरी चालते.

(प्रतिभा जामदार यांच्या 'संध्याई किचन' या युट्यूब चॅनलवर विविध पाककृतीही पाहता येतील.)

 

टॅग्स :अन्नपाककृती