Join us

फक्त एक वाटी गव्हाच्या पिठाचे करा पापड! गहू भिजवा, चिक करा, घाट घ्या-गरजच नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2025 18:45 IST

Make papad with just one bowl of wheat flour! No need to soak, grind, or grind the wheat : गव्हाचे पापड चवीला फार छान लागतात. करायलाही सोपे, पाहा रेसिपी.

आपण विविध प्रकारचे पापड खातो. बाजारात अनेक प्रकारचे पापड आरामात उपलब्ध आहेत. (Make papad with just one bowl of wheat flour! No need to soak, grind, or grind the wheat!)मात्र हा एक असा प्रकार आहे जो फार लोकांना माहिती ही नाही आणि बाजारात सहसा मिळतही नाही. गव्हाच्या पीठाचे पापड चवीला अगदी मस्त लागतात. (Make papad with just one bowl of wheat flour! No need to soak, grind, or grind the wheat!)मात्र ते करण्याची पद्धत जरा किचकट आहे. पण या पद्धतीने केल्यावर अगदी तासाभराचे काम आहे. पाहा रेसिपी. 

साहित्यगव्हाचे पीठ, पाणी, मीठ, रवा, चिली फ्लेक्स, जिरे

कृती१. अर्धी वाटी गव्हाचे पीठ छान चाळून घ्या. वाटीभर पीठामध्ये भरपूर पापड होतात.

२. गॅसवर एका पातेल्यामध्ये ६ कप पाणी तापवत ठेवा. अर्धी  वाटी गव्हाचे पीठ वापरत असाल तर त्यासाठी ६ कप पाणी वापरावे लागते. तसेच अर्धी वाटी रवाही वापरायचा आहे. 

३. पाणी जरा कोमट झाले की त्यामध्ये अर्धी वाटी गव्हाचे पीठ घाला. तसेच त्यामध्ये अर्धी वाटी रवाही घाला. चवीपुरते मीठ घाला. आणि चिली फ्लेक्स घाला. सगळं व्यवस्थित ढवळून घ्या. त्यामध्ये गुठळ्या होणार नाहीत याची काळजी घ्या. त्यामध्ये थोडे जिरे घाला. मिश्रण सतत ढवळत राहा. पीठामधील गुठळ्या घालवायला जरा वेळ लागतो. मात्र एकही गुठळी राहणार नाही याची काळजी घ्या. 

४. काही वेळातच पीठ जरा घट्ट व्हायला लागेल. रंगही जरा गडद होईल. असे झाल्यावर गॅस बंद करा आणि पीठ जरा कोमट होऊ द्या. 

५. पापड घालण्यासाठी मोठा प्लास्टिकचा तुकडा वापरा. प्लास्टिकला तेल लावा अगदी थोडे लावा. आणि थोडावेळ उन्हात ठेवा.  तेल सुकले की मग पापड घालायला घ्या. पळीने डोसा जसा घालता तसेच गव्हाच्या पिठाचे पापड घालून घ्या. पळीने गोल फिरवून जरा पातळ पापड घाला.

टॅग्स :समर स्पेशलअन्नपाककृती