दिवाळी तर संपली पण आजही आपल्या जिभेवर काही पदार्थांची चव कायम रेंगाळत असते. नाश्ता किंवा छोटी भूक लागल्यावर आपल्याला काही तरी चटपटीत खाण्याची इच्छा होते.(Laxminarayan Chivda recipe) रोज नाश्त्याला नवं काय खायचा हा प्रश्न नेहमीच असतो. त्यातीलच एक चिवडा. मुरमुरे, पातळ पोहे, जाड पोहे अशा विविध पदार्थांपासून चिवडा बनवला जातो. कधी भाजून किंवा तळूनही बनवता येतो.(Poha chivda)महाराष्ट्रातील अनेक भागात विविध पद्धतीने चिवडा बनवला जातो. पण यातील एक लक्ष्मीनारायण चिवडा.(Maharashtrian chivda recipe) मार्केटमध्ये मिळणाऱ्या या चिवड्याची चव अप्रतिम असते. आंबट-गोड चवीचा असणारा हा चिवडा खायला अप्रतिम लागतो.(Easy Indian snacks) जर आपल्यालाही घरच्याघरी कमी तेलात, हायजेनिक पद्धतीने आणि अगदी १० मिनिटांत लक्ष्मीनारायण चिवडा बनवायचा असेल तर पाहा सोपी रेसिपी. (Diwali snacks recipe)
साहित्य
बदाम - ३० ग्रॅमकाजू - ३० ग्रॅमशेंगदाणे - ५० ग्रॅमसफेद डाळ - ५० ग्रॅमकाळे मणुके - ३० ग्रॅमहिरवी मिरची - ६ ते ७ सुके खोबरे - २० ग्रॅमलसूण - २० ग्रॅमकढीपत्ता - ५० पोहे - ५०० ग्रॅमहळद - १ चमचा धने पावडर - १ चमचा जिरे पावडर - १ चमचा आमचूर पावडर - २ चमचे लाल मिरची पावडर - ३ चमचे मीठ - २ चमचे पिठी साखर - २ चमचे तेल - तळण्यासाठी
कृती
1. सगळ्यात आधी गॅसवर कढई ठेवून त्यात तेल व्यवस्थित गरम करुन घ्या. त्यात तळण्याची चाळणी ठेवून बदाम, काजू, शेंगदाणे, सफेद डाळ, काळे मणुके, सुके खोबरे, लसूण, कढीपत्ता, हिरवी मिरची वेगवेगळ्या पद्धतीने तळून घ्या. आणि बाऊलमध्ये काढा.
2. त्यानंतर पोहे तळून बाऊलमध्ये काढून घ्या. वरुन सर्व मसाले घालून हाताने व्यवस्थित मिक्स करा. तयार होईल अवघ्या १० मिनिटांत लक्ष्मीनारायण चिवडा. प्रवासात किंवा छोटी भूक लागल्यावर सहज खाता येईल.
Web Summary : Craving a quick, tasty snack? This 10-minute Laxminarayan Chivda recipe delivers a market-like flavor using simple ingredients. Fry nuts, spices, and poha, then mix it all together for a delicious homemade treat.
Web Summary : जल्दी और स्वादिष्ट नाश्ता चाहते हैं? यह 10 मिनट की लक्ष्मीनारायण चिवड़ा रेसिपी आसान सामग्री का उपयोग करके बाजार जैसा स्वाद देती है। मेवे, मसाले और पोहा भूनें, फिर स्वादिष्ट घर के बने नाश्ते के लिए सब कुछ एक साथ मिलाएं।