दिवाळी तर संपली पण आजही आपल्या जिभेवर काही पदार्थांची चव कायम रेंगाळत असते. नाश्ता किंवा छोटी भूक लागल्यावर आपल्याला काही तरी चटपटीत खाण्याची इच्छा होते.(Laxminarayan Chivda recipe) रोज नाश्त्याला नवं काय खायचा हा प्रश्न नेहमीच असतो. त्यातीलच एक चिवडा. मुरमुरे, पातळ पोहे, जाड पोहे अशा विविध पदार्थांपासून चिवडा बनवला जातो. कधी भाजून किंवा तळूनही बनवता येतो.(Poha chivda)
महाराष्ट्रातील अनेक भागात विविध पद्धतीने चिवडा बनवला जातो. पण यातील एक लक्ष्मीनारायण चिवडा.(Maharashtrian chivda recipe) मार्केटमध्ये मिळणाऱ्या या चिवड्याची चव अप्रतिम असते. आंबट-गोड चवीचा असणारा हा चिवडा खायला अप्रतिम लागतो.(Easy Indian snacks) जर आपल्यालाही घरच्याघरी कमी तेलात, हायजेनिक पद्धतीने आणि अगदी १० मिनिटांत लक्ष्मीनारायण चिवडा बनवायचा असेल तर पाहा सोपी रेसिपी. (Diwali snacks recipe)
साहित्य
बदाम - ३० ग्रॅम
काजू - ३० ग्रॅम
शेंगदाणे - ५० ग्रॅम
सफेद डाळ - ५० ग्रॅम
काळे मणुके - ३० ग्रॅम
हिरवी मिरची - ६ ते ७
सुके खोबरे - २० ग्रॅम
लसूण - २० ग्रॅम
कढीपत्ता - ५०
पोहे - ५०० ग्रॅम
हळद - १ चमचा
धने पावडर - १ चमचा
जिरे पावडर - १ चमचा
आमचूर पावडर - २ चमचे
लाल मिरची पावडर - ३ चमचे
मीठ - २ चमचे
पिठी साखर - २ चमचे
तेल - तळण्यासाठी
कृती
1. सगळ्यात आधी गॅसवर कढई ठेवून त्यात तेल व्यवस्थित गरम करुन घ्या. त्यात तळण्याची चाळणी ठेवून बदाम, काजू, शेंगदाणे, सफेद डाळ, काळे मणुके, सुके खोबरे, लसूण, कढीपत्ता, हिरवी मिरची वेगवेगळ्या पद्धतीने तळून घ्या. आणि बाऊलमध्ये काढा.
2. त्यानंतर पोहे तळून बाऊलमध्ये काढून घ्या. वरुन सर्व मसाले घालून हाताने व्यवस्थित मिक्स करा. तयार होईल अवघ्या १० मिनिटांत लक्ष्मीनारायण चिवडा. प्रवासात किंवा छोटी भूक लागल्यावर सहज खाता येईल.
