गोव्याचे पारंपारिक पदार्थ कायमच जरा हटके असतात. उन्हाळा स्पेशल पदार्थ तर भरपूर आहेत. त्यापैकी एक म्हणजे की फुटी कढी ज्याला कोकमाचे तिवळ असे ही म्हटले जाते. (Make Goan's traditional special Footi Kadhi)दिसायला कोकम सरबतासारखेच असले तरी चवीला अगदी वेगळे असते. भातासोबत वरण आमटीऐवजी एखाद्या दिवशी हा पदार्थ अनेक घरांमध्ये केला जातो. मात्र उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराला ऊर्जा व थंडावा देण्यासाठी हे एक खास पेय म्हणूनही गारेगार प्यायले जाते. करण्याच्या पद्धती घरोघरी वेगळ्या आहेत, मात्र पदार्थ चवीला कमालच आहे.
साहित्य
आमसूल, पाणी, कोथिंबीर, मीठ, हिरवी मिरची, जिरे पूड, आलं, साखर, काळी मिरी पूड, लसूण
कृती
१. कोकम आगळ वापरला तरी चालेल.(Make Goan's traditional special Footi Kadhi) नसेल तर आमसूल घ्या. एका भांड्यामध्ये आमसूल भिजत ठेवा. आमसूल मऊ होऊन तुटायला लागतील. मग ते पाण्यामध्ये व्यवस्थित चुरून घ्या. चोथा काढण्यासाठी मिश्रण गाळून घ्या.
२. पाणी व चोथा वेगळा करुन झाल्यावर पाण्यामध्ये चवीपुरते मीठ घाला. त्यात साखर घाला. जिरे पूड घाला. काळी मिरी पूड घाला.
३. मिक्सरच्या भांड्यात लसणाच्या काही पाकळ्या घ्या. आल्याचा तुकडा घ्या. हिरवी मिरची घ्या. त्याचे वाटण करुन घ्या. ते जाडसर वाटण तयार केलेल्या मिश्रणामध्ये टाका. छान ढवळून घ्या. अर्धा तास झाकून ठेवा. नंतर हवे असेल तर गाळून घ्या. किंवा मग तसेच घेऊ शकता.
४. त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. भाताबरोबर घ्या किंवा नुसते गार करुन प्या.
आणखी एक पद्धत म्हणजे वरील प्रमाणे कृती करुन झाल्यावर त्याला एक फोडणी द्यायची. फोडणीमध्ये थोडे तेल घालायचे. त्यामध्ये जिरे घाला. जरं तडतडल्यावर त्यामध्ये घाला. बारीक चिरलेली हिरवी मिरची घाला मग ती फोडणी तिवळमध्ये ओता. भाताबरोबर खाताना अशी तिवळ मस्त चमचमीत लागते. साधी तिवळ गार करुन प्यायला जास्त छान लागते. फोडणी देऊन केलेल्या तिवळमध्ये अनेक जण लसूण घालत नाहीत. त्याला बिना नारळ-लसूण सोलकढी या अर्थीही या पदार्थाला संबोधले जाते.