Join us

सुंदर गुलाबाचा करा चविष्ट गुलकंद, उन्हाळ्यात रोज चमचाभर गुलकंद आणि मग मज्जानी लाइफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2025 20:16 IST

Make delicious Gulkand from beautiful roses, see easy recipe : गुलकंद घरी करणे फारच सोपे. पाहा कसे कराल.

गुलाबाचे फुल दिसायला फारच सुंदर असते. प्रेमाचे चिन्ह म्हणून या फुलाकडे पाहीले जाते. (Make delicious Gulkand from beautiful roses, see easy recipe )गुलाब फक्त केसात माळायला किंवा वाहायला वापरत नाहीत. गुलाबाचा वापर अन्न पदार्थांमध्येही केला जातो. गुलाबाचे सरबत फार छान गोड लागते. तसाच आणखी एक लोकप्रिय पदार्थ म्हणजे गुलकंद. (Make delicious Gulkand from beautiful roses, see easy recipe )उन्हाळ्यामध्ये  गुलकंद खाणे शरीरासाठी फार उपयुक्त ठरते.

गुलकंद चवीला फारच छान लागतो. पण फक्त चवच नाही तर त्याचे फायदेही माहिती असणे गरजेचे आहे. गुलकंद शरीराला थंडावा देण्यासाठी उत्तम आहे. ज्यांना पित्ताचा त्रास असतो अशा लोकांना गुलकंद खाण्याचा सल्ला दिला जातो. दूध व गुलकंद हे कॉम्बिनेशन लहानपणी तुम्हीही खाल्लेच असेल. गुलकंदामुळे शरीरातील उष्णता कमी होते. 

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये रोज एक चमचा गुलकंद खाल्याने शरीराला उन्हामुळे होणार्‍या त्रासांपासून वाचवता येते. गुलकंदामध्ये भरपूर अँण्टी ऑक्सिडंट्स असतात. पचनासाठी गुलकंद फार फायदेशीर असतो. शरीराला ऊर्जा मिळते. यकृतासाठी गुलकंद चांगला असतो. तसेच घामामुळे होणारे त्रासही कमी होतात.  विकत गुलकंद आणण्यापेक्षा घरीच करा. करायला अगदीच सोपा आहे. उन्हामध्ये ठेवायची वगैरे काही गरज नाही, ही सोपी रेसिपी पाहा.     

साहित्यगुलाब, साखर, वेलची, बडीशेप

कृती१. गुलाबाची चांगली ताजी फुले वापरा. फुले छान धुऊन घ्या. पाकळ्या वेगळ्या करून घ्या. माती किंवा काही घाण त्यावर राहणार नाही याची काळजी घ्या. 

२. पाण्यामध्ये पाकळ्या बुडवून ठेवा. नंतर एका सुक्या फडक्यावर पाकळ्या पसरवा आणि पाकळ्या सुक्या करून घ्या. अगदी बारीक तुकडे करुन घ्या. 

३. एका कढईमध्ये त्या पाकळ्या घ्या. त्यामध्ये साखर घाला. तुम्हाला गोड जास्त आवडत असेल तर, जास्त साखर वापरा. कमी वापरली तरी चालते. पाणी किंवा इतर काही वापरू नका. साखर विरघळल्यावर पाकळ्या व साखर एकजीव व्हायला लागतील.  

४. वेलची व बडीशेपेची पूड करून घ्या. ती पूड गुलकंदाच्या मिश्रणामध्ये घाला. छान मिक्स करुन घ्या. नंतर गुलकंद गार करत ठेवा. गार झाल्यावर एका हवाबंद डब्यामध्ये काढून घ्या. 

टॅग्स :समर स्पेशलअन्नपाककृतीफुलं