lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Food > धणे पावडर विकत आणता? घरच्या घरी 10 मिनिटात धणे पावडर बनवा, 2 सोप्या पध्दती

धणे पावडर विकत आणता? घरच्या घरी 10 मिनिटात धणे पावडर बनवा, 2 सोप्या पध्दती

धणे पावडर ही घरच्या घरी सहजपणे तयार करता येते. घरी तयार केलेली धणे पावडर ही बाजारात मिळणार्‍या धणे पावडरपेक्षा शुध्द आणि भेसळविरहित असते. घरी धणे पावडर तयार करणं अगदीच सोपं.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2021 07:19 PM2021-10-15T19:19:09+5:302021-10-15T19:26:15+5:30

धणे पावडर ही घरच्या घरी सहजपणे तयार करता येते. घरी तयार केलेली धणे पावडर ही बाजारात मिळणार्‍या धणे पावडरपेक्षा शुध्द आणि भेसळविरहित असते. घरी धणे पावडर तयार करणं अगदीच सोपं.

Make coriander powder at home in 10 minutes in 2 easy ways | धणे पावडर विकत आणता? घरच्या घरी 10 मिनिटात धणे पावडर बनवा, 2 सोप्या पध्दती

धणे पावडर विकत आणता? घरच्या घरी 10 मिनिटात धणे पावडर बनवा, 2 सोप्या पध्दती

Highlightsघरच्या घरी धणे पावडर तयार करण्याच्या दोन पध्दती आहेत. पहिल्या पध्दतीत धणे धुवून, वाळवून, कढईत भाजून मिक्सरमधे वाटून धणे पावडर करतात.दुसर्‍या पद्धतीत धणे मायक्रोवेवमधे गरम करुन नंतर मिक्सरमधे वाटून त्याची पावडर करतात.

धणे पावडर हा रोजच्या स्वयंपाकातला आवश्यक मसाला. विशेषत: मसाल्यांच्या भाज्यांमधे, रश्याच्या भाज्यांमधे धणे पावडर ही लागतेच. पण धणे पावडर ही सर्व मसाल्यांप्रमाणे बाजारातूनच आणली जाते. खरंतर धणे पावडर ही घरच्या घरी सहजपणे तयार करता येते. घरी तयार केलेली धणे पावडर ही बाजारात मिळणार्‍या धणे पावडरपेक्षा शुध्द आणि भेसळविरहित असते.

Image: Google

धणे पावडर पध्दत एक

घरच्या घरी धणे पावडर बनवण्याच्या दोन पध्दती आहेत. पहिल्या पध्दतीप्रमाणे धणे पावडर करताना आधी अर्धा किलो धणे विकत आणावेत. ते आधी निवडून घ्यावेत. नंतर हे धणे एक ते दोन वेळा पाण्यानं स्वच्छ धुवावेत. धणे एक दोन दिवस उन्हात पूर्ण सुकवावेत. धणे सुकल्यानंतर भाजून घ्यावेत. त्यासाठी आधी कढई गरम करावी. गरम कढईत धणे 5 ते 10 मिनिटं भाजून घ्यावेत आणि एका भांड्यात काढावेत. थोडे गार झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात घालून वाटावेत. जोपर्यत बारीक पूड होत नाही तोपर्यंत मिक्सरमधे वाटावेत. 10 मिनिटात धणे पावडर तयार होते.

Image: Google

धणे पावडर पध्दत दोन

दुसर्‍या पध्दतीनं धणे पावडर करताना मायक्रोवेवचा वापर करावा. त्यासाठी आधी धणे निवडून स्वच्छ करावेत. एक ते दोन दिवस धणे उन्हात सुकवावेत. मायक्रोवेव 150 अंशावर प्रीहीट करावा. नंतर धणे एका भांड्यात घालून मायक्रोवेवमधे ठेवावेत. पाच मिनिटांनी लगेच धणे बाहेर काढून मिक्सरमधून बारीक वाटावेत.

Image: Google

घरी तयार केलेली धणे पावडर भरपूर दिवस टिकते. त्यासाठी एका स्वच्छ हवाबंद डब्यात घालून ठेवावी. धणे पावडरला हवा लागू दिली नाही की ती चांगली राहाते. आवश्यक तेवढीच धणे पावडर मसाल्याच्या डब्यातल्या भांड्यात काढून धणे पावडरचा डबा/ बरणी नीट लावून ठेवावी.

Web Title: Make coriander powder at home in 10 minutes in 2 easy ways

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.