Lokmat Sakhi >Food > घरीच करा चटपटीत चाट मसाला, झटपट होतो अनेक महिने सुगंध टिकतो, पाहा सोपी रेसिपी

घरीच करा चटपटीत चाट मसाला, झटपट होतो अनेक महिने सुगंध टिकतो, पाहा सोपी रेसिपी

Make chaat masala at home, the aroma lasts for months : चटपटीत असा चाट मसाला घरी तयार करणे अगदीच सोपे. पाहा रेसिपी.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2025 08:20 IST2025-03-31T08:18:03+5:302025-03-31T08:20:02+5:30

Make chaat masala at home, the aroma lasts for months : चटपटीत असा चाट मसाला घरी तयार करणे अगदीच सोपे. पाहा रेसिपी.

Make chaat masala at home, the aroma lasts for months | घरीच करा चटपटीत चाट मसाला, झटपट होतो अनेक महिने सुगंध टिकतो, पाहा सोपी रेसिपी

घरीच करा चटपटीत चाट मसाला, झटपट होतो अनेक महिने सुगंध टिकतो, पाहा सोपी रेसिपी

काही पदार्थ असे असतात जे इतर खाद्यपदार्थांची चव वाढवण्याचं काम करतात. जसे की चटणी किंवा लोणचे. ()Make chaat masala at home, the aroma lasts for monthsया पदार्थांचा वापर तोंडी लावण्यासाठी केला जातो. मात्र त्याची चव कमालीची असते. असाच एक पदार्थ आहे  जो आपण सारखा वापरतो. तो म्हणजे चाट मसाला. फळांवर भुरभुरायला आपण चाट मसाला  वापरतो.  ()Make chaat masala at home, the aroma lasts for monthsफळांची चव फारच छान लागते. ताकामध्ये चाट मसाला घातल्यावर ताकही फार चविष्ट होते. पाणीपुरी किंवा इतर चाटचे पदार्थ तयार करतानाही चाट मसाला महत्त्वाचा घटक असतो.

चवीला छान आंबट गोड असा लागणारा हा चाट मसाला घरोघरी वापरला तर जातोच. मात्र बाजारातून आणून वापरला जातो. चाट मसाला घरी तयार करणे फारच सोपे आहे. जास्त पदार्थही वापरावे लागत नाहीत. ()Make chaat masala at home, the aroma lasts for monthsरोजच्या वापरातील पदार्थांपासून तयार करता येतो. तसेच  झटपट तयार होतो. जास्त वेळही लागत नाही. घरी केल्याने त्याची चवही भारी असते . मुख्य म्हणजे आपल्याला हवा तेव्हा पटकन तयार करता येतो. तसेच हवा तेवढा तयार करता येतो. ही रेसिपी जरा वेगळी आहे मात्र चवीला विकतच्या चाट मसाल्यापेक्षा जास्त छान असते.

साहित्य
आमचूर पूड, मीठ, जिरं, ओवा, काळी मिरी, धणे, लवंग, बडीशेप, पुदिना, लाल तिखट, काळं मीठ, सुंठ पूड, साखर

कृती
१. एका तव्यामध्ये जिरं घ्या. त्यामध्ये थोडा ओवाही घाला. थोडी काळी मिरी टाका. तसेच बडीशेपही वापरा. जेवढं जिरं घ्याल तेवढेच धणे घ्या. चार ते पाच लवंग घ्या. ते सगळ छान परतून घ्या. सुकेच परतायचे. तेल पाणी काहीही वापरायचे नाही. ५ ते १० मिनिटे परतून झाल्यावर गार करण्यासाठी एका ताटलीमध्ये काढून घ्या. 

२. तो मसाला बाजूला काढल्यावर पुदिन्याची पाने परता. त्यालाही ड्रायरोस्टच करा. परतून कडक झाली की गॅस बंद करा.

३. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये परतलेला मसाला घ्यायचा. त्यामध्ये चवीपुरते लाल तिखट टाका. तसेच काळं मीठ वापरा. साधे रोजच्या वापराचे मीठही वापरा. त्यामध्ये थोडी सुंठ पूड घाला. अगदी थोडीच वापरा नाही तर मसाला फार उग्र होईल. त्यामध्ये थोडी साखर घाला. परतलेला पुदिना घाला. त्यामध्ये आमचूर पूडही घाला. 

४. सगळं मिश्रण छान वाटून घ्या. त्याची एकजीव पूड तयार करा. अति वाटू नका नाही तर त्याला तेल सुटेल. 

५. एका हवाबंद डब्यामध्ये साठवून ठेवा. अनेक महिने हा पदार्थ टिकतो.
 

Web Title: Make chaat masala at home, the aroma lasts for months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.