नवीन वर्षातला पहिला सण मकर संक्रांती. या दिवशी सगळ्यांना आठवतो तो तिळगूळ. “तिळगूळ घ्या, गोड गोड बोला” असं म्हणतं घरोघरी तिळाचे लाडू, वड्या, चिक्की असे विविध पदार्थ बनवले जातात. (sesame laddoo recipe) पण अनेकदा तिळाचा लाडू बनवणं फार वेळखाऊच काम वाटतं. त्यामुळे आपण लाडू बाहेरुन विरत आणतो. तिळाचा लाडू बनवताना तो कडक होतो, वळवताना लवकर वळत नाही, पाक घट्ट होते, चव बिघडते.(why sesame laddoos become hard)तिळाचा लाडू बनवताना अनेकदा आपण काही चुका करतो ज्यामुळे ते दगडासारखे कडक होतात. ज्यामुळे ते लवकर तुटत नाही. लाडू बनवताना आपण चिक्कीचा गूळ वापरला तर पदार्थ फसतो. कारण गूळ योग्य नसेल तर लाडू कडक होतात. म्हणून तिळाचा लाडू परफेक्ट होण्यासाठी गुळाची निवड करणं फार महत्त्वाच आहे. पाहूया लाडू बनवण्यासाठी गूळ..(makarsankranti laddoo recipe)
1. तिळाच्या लाडूसाठी सगळ्यात चांगला आणि उत्तम मानला जाणारा गूळ म्हणजे साखर न मिसळलेला, नैसर्गिक ऊसगूळ. हा गूळ मऊ, चिकट आणि मध्यम रंगाचा तपकिरी असतो. यामध्ये नैसर्गिक गोडवा आणि ओलावा असल्यामुळे लाडू वळायला सोपे जातात आणि खूप कडकही होत नाहीत. बाजारात हा चिकट गूळ किंवा लाडू गूळ म्हणून मिळतो.
2. बाजारात अनेक ठिकाणी गुळाचे दोन प्रकार पाहायला मिळतात. कडक गूळ आणि मऊ गूळ. कडक गूळ हा चहासाठी किंवा गूळ पाण्यासाठी वापरला जातो. हा गूळ वितळायला खूप वेळ घेतो आणि लाडू करताना नीट मिसळला जात नाही त्यामुळे लाडू फुटतात. तिळाच्या लाडूसाठी कडक गुळाचा वापर करु नका.
मुलांच्या डब्यासाठी खास खाऊ! करा कोबीचं थालीपीठ, चविष्ट आणि भरपूर पोषण- झटपट रेसिपी
3. जर रंग आणि चवीचा विचार करत असाल तर खूप गडद काळा गूळ टाळावा. या गुळाची चव कधी कधी कडू लागते, ज्यामुळे लाडूची चव देखील बदलते. फार फिकट रंगाचा गुळसुद्धा चांगला नसतो. कारण त्यात गोडवा कमी असू शकतो. तपकिरी, सुगंधी आणि जाता गूळ हा सगळ्यात चांगला पर्याय आहे.
4. सध्या बाजारात पावडर गूळ किंवा गुळाची भुकटी देखील मिळते. आपल्याकडे फारसा वेळ नसेल तर हा गूळ वापरु शकता. पण लाडूला पारंपरिक चव आणि चिकटपणा हवा असेल तर गोळा किंवा ढेपरुप गूळ जास्त चांगला ठरतो. गूळ किसून किंवा बारीक चिरून वापरल्यास तो तिळात नीट मिसळतो.
5. तिळाचे लाडू मऊ, चविष्ट आणि जास्त दिवस टिकावे असं वाटत असेल तर ताजा, नैसर्गिक, मऊ आणि चिकट ऊसगूळ वापरणं सगळ्यात महत्त्वाचा आहे. योग्य गुळामुळेच तिळाच्या लाडूंना खास पारंपरिक चव आणि गोडवा मिळतो. जो आपल्या सणांचा आनंद द्विगुणित देखील करतो.
Web Summary : Sesame laddoos often harden due to incorrect jaggery. Use soft, natural sugarcane jaggery. Avoid hard, dark, or powdered jaggery for best results. Fresh jaggery ensures delicious, soft laddoos.
Web Summary : गलत गुड़ के कारण अक्सर तिल के लड्डू सख्त हो जाते हैं। मुलायम, प्राकृतिक गन्ना गुड़ का प्रयोग करें। सर्वोत्तम परिणामों के लिए सख्त, काले या पिसे हुए गुड़ से बचें। ताजा गुड़ स्वादिष्ट, मुलायम लड्डू सुनिश्चित करता है।