मकर संक्रांत म्हटलं की तीळ गूळ घ्या आणि गोड गोड बोला हे वाक्य आपल्या ओठांवर येतेच. हिवाळ्याच्या दिवसात तीळ आणि गूळ यांचं सेवन आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.(makarsankarti til ladoo) तीळ उष्ण असतात आणि गूळ शरीराला ऊर्जा देते. मात्र अनेकांना घरी तिळाचे लाडू बनवणं नकोस वाटतं. कारण अनेकदा गुळाचा पाक चुकतो आणि लाडू दगडासारखे कडक होतात. (sesame ladoo recipe)
घरी लाडू बनवताना अनेकदा गुळाचा पाक चुकतो, बिघडतो, पातळ होतो किंवा लवकर वितळत नाही. ज्यामुळे लाडू वळवणं कठीण होतं आणि ते दगडासारखे कडक होतात.(tilgul ladoo) पण मऊ-लुसलुशीत तोडांत टाकताच विरघळणारे लाडू करण्यासाठी काही सोप्या टिप्स लक्षात ठेवल्या तर लाडूची चव मस्त लागेल. तिळाचे मऊ लाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती पाहूया.
भोगीच्या भाजीची खिचडी करताना भात चिकट- गचका होतो? २ टिप्स, होईल मऊ- मोकळा, चवही आजीच्या हातासारखी
साहित्य
चिरलेला पिवळा गूळ - १ वाटी
तीळ - १ वाटी
शेंगदाणे - अर्धी वाटी
वेलची पूड - १ चमचा
जायफळ - १ चमचा
तेल - १ चमचा
कृती
1. तिळाचे लाडू बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला गूळ चिरून घ्यावा लागेल. त्यानंतर कढईत पाणी घालून त्यावर एक भांड ठेवा. ज्यात चिरलेला गूळ घाला. त्यावर मोठ भांडे झाकून ठेवा. यामुळे कढई व्यवस्थित झाकली जाईल. गॅसवर हे भांडे ठेवा, ज्यामुळे गूळ लवकर वितळण्यास मदत होईल.
2. यानंतर पॅनमध्ये तीळ, शेंगदाणे वेगवेगळ्या पद्धतीने भाजून घ्या. आता भाजलेले शेंगदाणे जाडसर कुटून घ्या.
3. एका भांड्यात वितळलेला गूळ, शेंगदाणे आणि तीळ घालून व्यवस्थित मिक्स करा. वरुन वेलची पूड, जायफळ आणि तेल घालून पुन्हा एकजीव करा.
4. हाताला तेल लावून लाळू वळवा. तयार होईल मऊ- खुसखुशीत तिळाचे तोंडात टाकताच विरघळणारे लाडू.
