Join us

महाशिवरात्री स्पेशल: साबुदाण्याची खिचडी-वडा नेहमीचा, करा उपवासाचे फ्रेंच फ्राइज, कुरकुरीत आणि स्वादिष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2025 10:49 IST

Mahashivratri special recipe: Fasting food: Sabudana French fries recipe: fasting special recipe: Fasting-friendly meals: Easy fasting recipes: Maha Shivratri food ideas: Special recipes for Maha Shivratri: Shivratri fasting recipes: Maha Shivratri vrat food: महाशिवरात्रीला पौष्टिक, स्वादिष्ट आणि कुरकुरीत फ्रेंच फ्राइजची रेसिपी पाहूयात.

महाशिवरात्रीचा उपवास हा पवित्र मानला जातो. महाशिवरात्रीचा उपवास हा माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला असतो. (Mahashivratri special recipe) यंदा हा दिवस २६ फेब्रुवारीला असणार आहे. या दिवशी प्रत्येक शिवभक्त शंकार आणि देवी पार्वतीचा उपवास करतात. (Sabudana French fries recipe) या खास सणाच्या दिवशी भगवान शंकराची पूजा करुन उपवास सोडला जातो. उपवास म्हटलं की, आपण वेगवेगळे पदार्थ चवीने खातो. (fasting special recipe) साबुदाण्याची खिचडीपासून ते थालीपीठ असे अनेक प्रकार बनतो. प्रत्येक वेळी तेच पदार्थ खाऊन आपल्याला वैताग येतो. (Shivratri fasting recipes) परंतु नेहमी उपवासाला साबुदाण्याचे पदार्थ खाऊन कंटाळा येतो. आज आम्ही तुम्हाला साबुदाण्याचे फ्रेंच फ्राइजची रेसिपी सांगणार आहोत.झटपट तयार होईल. महाशिवरात्रीला पौष्टिक, स्वादिष्ट आणि कुरकुरीत फ्रेंच फ्राइजची रेसिपी पाहूयात. 

सोमवारी डब्याला कुठली भाजी? भरली ढोबळी मिरची, रेसिपी झटपट-चव झणझणीत, आठवडा जाईल मस्त

साहित्य 

  • साबुदाणा - अर्धा कप
  • उकडलेले बटाटे - २ 
  • शेंगदाण्याचा कुट - २ मोठे चमचे
  • जिरे- हिरवी मिरची पेस्ट 
  • साखर - चवीनुसार 
  • मीठ - चवीनुसार 

कृती 

1. सगळ्यात आधी साबुदाण्याची पावडर तयार करु घ्या. त्यात बटाटा किसून घाला.2. आता त्यात शेंगदाण्याचा कूट, मीठ, जिरे-हिरवी मिरची पेस्ट आणि साखर घालून मिश्रण एकजीव करा. 3. मिश्रण पीठासारखे तयार होईल. आता लाकडी पाटावर तेल लावून तयार पीठाची चपाती लाटून घ्या. 4. हाताने थापून सुरीने काप तयार करा. तेलात खुसखुशीत तळून घ्या किंवा एअर फ्रायरमध्ये फ्रायही करु शकता.  

टॅग्स :अन्नपाककृती