Join us

महाशिवरात्र स्पेशल : करा उपवासाचा आलू पराठा - चटणी, पौष्टिक पदार्थ - मिळेल भरपूर एनर्जी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2025 13:24 IST

Mahashivratri Recipe : Fasting Aloo Paratha Recipe : Upvasacha Aloo Paratha : Upwas aloo paratha Fasting recipe : How To Make Fasting Aloo Paratha : यंदाच्या महाशिवरात्रीला करा गरमागरम उपवासाचा आलू पराठा आणि चटणी, पाहा सोपी रेसिपी...

महाशिवरात्रीचा सण उत्सव सुरु होण्यास आता अवघे काहीच तास बाकी आहेत. फक्त महाराष्ट्रात नसून, देशभरात महाशिवरात्री उत्साहाने साजरा करण्यात येते. या दिवशी बरेचजण विशेषतः महिला वर्ग फार मोठ्या प्रमाणांत उपवास करतात. उपवास (Mahashivratri Recipe : Fasting Aloo Paratha Recipe) म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर फक्त साबुदाण्याची खिचडी येते. परंतु, फक्त साबुदाण्याची खिचडी न करता आपण विविध प्रकारचे चविष्ट आणि  हेल्दी पदार्थ (Upvasacha Aloo Paratha) खाऊन देखील उपवास करु शकतो.

उपवासाला साबुदाण्याच्या खिचडीपासून ते वड्यापर्यंत अनेक पदार्थ तयार केले जातात. परंतु प्रत्येकवेळी उपवासाला (How To Make Fasting Aloo Paratha) काय नवीन पदार्थ तयार करायचा? असा प्रश्न देखील पडतो. यासाठीच, यंदाच्या उपवासाला झटपट तयार होणारे उपवासाचे आलू पराठे आणि चटणी कशी करायची याची सोपी रेसिपी पाहूयात(Upwas aloo paratha Fasting recipe).

१. उपवासाच्या आलू पराठ्यासाठी लागणारे साहित्य :- 

१. साबुदाणा - १ कप २. मीठ - चवीनुसार३. आले - जिरे - हिरव्या मिरचीची पेस्ट - १ टेबलस्पून ४. उकडलेले बटाटे - २ बटाटे ५. पाणी - गरजेनुसार ६. साजूक तूप - गरजेनुसार

२. उपवासाच्या चटणीसाठी लागणारे साहित्य :- 

१. भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट - १ कप २. हिरव्या मिरच्या - २ ते ३३. चिंच - १/२ टेबलस्पून ४. मीठ - चवीनुसार ५. तूप - १ टेबलस्पून ६. जिरे - १ टेबलस्पून ७. लाल सुकी मिरची - १ सुकी मिरची

फळांवर जे स्टिकर्स चिटकवलेलेे असतात, त्यांचा अर्थ काय? तुम्ही नक्की काय पाहून फळं घेणं योग्य, वाचा...

महाशिवरात्र स्पेशल : फक्त १० मिनिटांत करा रताळ्याचे थालीपीठ, पौष्टिक आणि पचायलाही हलका उपवासाचा चविष्ट पदार्थ...

कृती :- 

१. सगळ्यांत आधी एका पॅनमध्ये साबुदाणा घेऊन तो कोरडा भाजून घ्यावा. भाजून झाल्यानंतर साबुदाणा थोडा थंड होण्यासाठी बाजूला काढून ठेवावा. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात भाजलेले साबुदाणे घालूंन ते व्यवस्थित वाटून त्याची बारीक पूड करून घ्यावी. २. आता एका मोठ्या डिशमध्ये साबुदाण्याची बारीक पूड घेऊन त्यात चवीनुसार मीठ व उकडलेला बटाटा मॅश करून घालावा. ३. त्यानंतर त्यात आले - जिरे - हिरव्या मिरचीची पेस्ट आणि गरजेनुसार पाणी घालून पीठ व्यवस्थित मळून घ्यावे. मळलेल्या पिठाचे छोटे गोळे करून घ्यावेत. आता याचे गोलाकार पराठे लाटून घ्यावेत. ४. तव्याला थोडेसे तूप लावून घ्यावे. त्यानंतर पराठे दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्यावेत. 

उपवासाचे आलू पराठे खाण्यासाठी तयार आहेत. 

उपवासाच्या चटणीची कृती :- 

१. एका मिक्सरच्या भांड्यात भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घ्यावा. २. त्यानंतर त्यात हिरव्या मिरच्या, चिंच, चवीनुसार मीठ आणि गरजेनुसार पाणी घालावे. ३. आता मिक्सरमध्ये हे सगळे जिन्नस एकत्रित घालूंन व्यवस्थित वाटून त्याची चटणी तयार करून घ्यावी. ही तयार चटणी एका बाऊलमध्ये काढून घ्यावी. ४. एका छोट्या भांड्यात थोडेसे साजूक तूप घेऊन त्यात लाल सुकी मिरची आणि जिरे घालून खमंग फोडणी तयार करून घ्यावी. ही तयार फोडणी चटणीमध्ये घालून उपवासाच्या चटणीला खमंग फोडणी द्यावी. 

उपवासाची चटणी खाण्यासाठी तयार आहे. उपवासाचे गरमागरम आलू पराठे आपण या चटणी सोबत खाण्यासाठी सर्व्ह करु शकता.

टॅग्स :अन्नपाककृतीनवरात्री उपवास आणि पदार्थ २०२४महाशिवरात्री