Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > Mahashivratri 2026 : साबुदाणा न भिजवता करा १० मिनिटांत साबुदाणा रिंग्ज! महाशिवरात्रीचा फराळ होईल खास - उपवासाचा कुरकुरीत पदार्थ...

Mahashivratri 2026 : साबुदाणा न भिजवता करा १० मिनिटांत साबुदाणा रिंग्ज! महाशिवरात्रीचा फराळ होईल खास - उपवासाचा कुरकुरीत पदार्थ...

Mahashivratri special sabudana rings papad : Sabudana Papad Rings Recipe : how to make instant sabudana papad rings at home : महाशिवरात्रीच्या खास दिवशी बनवण्यासाठी सोपी, पटकन होणारी आणि चविष्ट साबुदाणा रिंग्जची रेसिपी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2026 20:10 IST2026-02-13T14:26:28+5:302026-02-13T20:10:09+5:30

Mahashivratri special sabudana rings papad : Sabudana Papad Rings Recipe : how to make instant sabudana papad rings at home : महाशिवरात्रीच्या खास दिवशी बनवण्यासाठी सोपी, पटकन होणारी आणि चविष्ट साबुदाणा रिंग्जची रेसिपी...

Mahashivratri 2026: Make sago rings in 10 minutes without soaking! Mahashivratri snack will be special - a crunchy fasting dish... | Mahashivratri 2026 : साबुदाणा न भिजवता करा १० मिनिटांत साबुदाणा रिंग्ज! महाशिवरात्रीचा फराळ होईल खास - उपवासाचा कुरकुरीत पदार्थ...

Mahashivratri 2026 : साबुदाणा न भिजवता करा १० मिनिटांत साबुदाणा रिंग्ज! महाशिवरात्रीचा फराळ होईल खास - उपवासाचा कुरकुरीत पदार्थ...

महाशिवरात्रीचा सण (Mahashivratri 2026) महाराष्ट्रभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. उपवास म्हटलं की घराघरात साबुदाण्याचे वेगवेगळे पदार्थ हमखास तयार केले जातात. या दिवशी उपवास म्हटलं की, आपल्या डोळ्यांसमोर सर्वात आधी येते ती म्हणजे साबुदाण्याची खिचडी किंवा वडे. पण दरवर्षी तोच तोच पदार्थ खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल, तर यंदा काहीतरी 'हटके' आणि चटपटीत ट्राय करायलाच हवं. उपवासाच्या मेनूमध्ये व्हरायटी (vrat food recipes) शोधणाऱ्यांसाठी 'साबुदाणा रिंग्ज' हा एक उत्तम पर्याय आहे(how to make instant sabudana papad rings at home).

बऱ्याचदा साबुदाणा भिजत घालायला विसरलो की उपवासाच्या फराळाची पंचायत होते, पण या रिंग्सचं वैशिष्ट्य असं की, हे बनवण्यासाठी तुम्हाला खूप आधीपासून तयारी करण्याची गरज नाही. झटपट होणारे हे रिंग्स वरून इतके क्रिस्पी होतात की त्यांचा कुरकुरीत आवाज ऐकूनच कोणाच्याही तोंडाला पाणी सुटेल. हे साबुदाणा रिंग्ज (Mahashivratri special sabudana rings papad) दिसायला जितके आकर्षक आहेत, चवीला तितकेच कुरकुरीत आणि बनवायला अतिशय सोपे आहेत. फार कमी कष्टात आणि उपलब्ध साहित्यात तयार होणारा हा पदार्थ लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनाच आवडेल असा आहे. क्रिस्पी, कुरकुरीत आणि खरपूस अशा या रिंग्ज दह्याच्या चटणीसोबत किंवा शेंगदाण्याच्या आमटीसोबत अप्रतिम लागतात. महाशिवरात्रीच्या खास (Sabudana Papad Rings Recipe) दिवशी बनवण्यासाठी सोपी, पटकन होणारी आणि चविष्ट साबुदाणा रिंग्जची रेसिपी पाहूयात...

साहित्य :- 

१. साबुदाणा - २ ते ३ कप 
२. पाणी - २ ते ३ कप 
३. मीठ - चवीनुसार

यंदाची महाशिवरात्र होईल खास! करा उपवास पराठा आणि चटणी, आहार हलका पण मिळेल भरपूर  एनर्जी... 

वाटल्या तांदळाची बटाटा भजी, ‘अशी’ कुरकुरीत भजी तुम्ही कधी खाल्ली नसतील, पाहा खमंग रेसिपी...

कृती :- 

१. सगळ्यात आधी साबुदाणा एका मिक्सरच्या भांडयात घेऊन तो व्यवस्थित बारीक पीठ होईपर्यंत वाटून घ्यावा. मिक्सरमध्ये एकदम बारीक पूड तयार करून घेतलेलं साबुदाणा पीठ एका बाऊलमध्ये काढून घ्यावे. 
२. आता यात थोडं पाणी घालून मिश्रण व्यवस्थित कालवून एकजीव करावे. मग अर्ध्या तासासाठी हे मिश्रण झाकून साबुदाण्याचे पीठ फुलवून घ्यावे. 
३. पीठ व्यवस्थित फुलून आल्यावर त्यात चवीनुसार मीठ घालावे. मीठ घालून मग पुन्हा एकदा हे बॅटर मिक्सरच्या भांड्यात ओतून ते मिक्सरमध्ये वाटून घ्यावे. 

परफेक्ट उडपी स्टाईल उत्तपा करण्याची खास ट्रिक! अण्णाच्या गाडीवर मिळतो त्याहूनही भारी...

४. मिक्सरमध्ये वाटून या बॅटरची स्मूद अशी पेस्ट तयार करून घ्यावी. ही तयार पेस्ट एका पाईपिंग बॅग मध्ये भरावी. पाईपिंग बॅग नसेल तर दुधाची पिशवी किंवा कोणतीही जरा जाडसर प्लास्टिकच्या पिशवीत हे मिश्रण भरून त्याला मेहेंदीच्या कोनसारखा आकार देऊन खालून टोक किंचित कापून घ्यावे. 
५. प्लास्टिक किंवा स्टीलच्या ताटाला किंचितसे तेल पसरवून लावावे. मग त्यावर पाईपिंग बॅगच्या मदतीने गोलाकार आकाराच्या साबुदाणा रिंग काढून त्या ३ ते ४ तास वाळण्यासाठी फॅनखाली ठेवाव्यात. आपण कडक ऊन्हांत देखील २ ते ३ दिवस व्यवस्थित वाळवून वर्षभर खाण्यासाठी स्टोअर करु शकता. 
६. या साबुदाणा रिंग २ ते ३ तास फॅनखाली नीट वाळवून घेतल्यानंतर गरम कडकडीत तेलात घालून तळून घ्याव्यात. 

अशाप्रकारे आपण यंदाच्या महाशिवरात्रीच्या उपवासा दिवशी अशा इन्स्टंट पद्धतीने झटपट होणाऱ्या साबुदाणा रिंग्ज पटकन तयार करुन खाऊ शकता. सोबतच वर्षभरासाठी स्टोअर देखील करुन ठेवू शकता.

Web Title : महाशिवरात्रि स्पेशल: 10 मिनट में बनाएं साबूदाना रिंग्स!

Web Summary : महाशिवरात्रि के लिए झटपट बनाएं कुरकुरे साबूदाना रिंग्स। इस आसान रेसिपी में साबूदाना को पहले से भिगोने की ज़रूरत नहीं है। चटनी या आमटी के साथ इस स्वादिष्ट व्रत के भोजन का आनंद लें। सभी उम्र के लिए बिल्कुल सही!

Web Title : Mahashivratri Special: Make instant Sabudana Rings in 10 minutes!

Web Summary : Make crispy Sabudana Rings quickly for Mahashivratri. This easy recipe requires no pre-soaking of sabudana. Enjoy this crunchy, delicious vrat food with chutney or amti. Perfect for all ages!