Join us

महाशिवरात्र स्पेशल : फक्त १० मिनिटांत करा रताळ्याचे थालीपीठ, पौष्टिक आणि पचायलाही हलका उपवासाचा चविष्ट पदार्थ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2025 09:05 IST

Mahashivratra Special : Sweet Potato Thalipeeth : Fasting Special Thalipeeth Recipe : Ratalyache Thalipeeth : यंदाच्या महाशिवरात्रीला करा गरमागरम उपवासाचे थालीपीठ, दह्यासोबत खाण्याचा आनंदच वेगळा..

महाशिवरात्रीचा सण संपूर्ण महाराष्ट्रभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकरांची पूजा करून गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. तसेच या दिवशी अनेक महिला उपवास करतात. या खास सणाच्या दिवशी भगवान शंकराची पूजा करून नंतर उपवास सोडला जातो. उपवास म्हटलं की, उपवासाच्या वेगवेगळ्या पदार्थांची प्रत्येक (Mahashivratra Special : Sweet Potato Thalipeeth) घरात रेलचेल असते. उपवासाला साबुदाण्याच्या खिचडी (Ratalyache Thalipeeth) पासून ते वड्यापर्यंत अनेक पदार्थ तयार केले जातात. परंतु नेहमीच उपवासाला असे साबुदाण्याचे पदार्थ खाऊन काहीवेळा कंटाळा येतो. त्याचबरोबर, प्रत्येकवेळी उपासाला काय नवीन पदार्थ तयार करायचा? असा प्रश्न देखील पडतो(Fasting Special Thalipeeth Recipe).

यासाठीच, यंदाच्या उपवासाला उपवासाचेच काही पदार्थ वापरुन आपण अगदी झटपट तयार होणारे रताळ्याचे थालीपीठ करु शकतो. उपवासाला खाल्ला जाणारा साबुदाणा, भगर, शिंगाडा यांची पौष्टिक पीठ आणि रताळ्याचा किस असे काही पदार्थ एकत्रित करुन उपवासाचे थालीपीठ तयार करु शकतो. महाशिवरात्रीला पौष्टिक आणि पोटभरीचे असे थालीपीठ तयार करण्याची रेसिपी पाहूयात.

साहित्य :- 

१. राजगिऱ्याचे पीठ - १/२ कप २. शिंगाड्याचे पीठ - १/२ कप ३. भगर पीठ - १/२ कप ४. साबुदाणा पीठ - १/२ कप५. रताळ्याचा किस - १ कप (रताळी किसून घेतलेली)६. बटाटा - १ कप (उकडून मॅश केलेला बटाटा)७. कोथिंबीर - १/२ कप (बारीक चिरलेली) (पर्यायी)८. मीठ - चवीनुसार९. जिरे - २ टेबलस्पून १०. हिरव्या मिरच्या - ४ (बारीक चिरलेल्या)११. साखर - १ टेबसलस्पून १२. आलं - १/२ टेबसलस्पून (किसून घेतलेलं) १३. पाणी - गरजेनुसार१४. साजूक तूप - गरजेनुसार

फळांवर जे स्टिकर्स चिटकवलेलेे असताता, त्यांचा अर्थ काय? तुम्ही नक्की काय पाहून फळं घेणं योग्य, वाचा...

कोकणी पद्धतीने १० मिनिटांत करा मऊ - लुसलुशीत आंबोळी, सकाळचा नाश्ता होईल झक्कास...

कृती :- 

१. सगळ्यांत आधी एका मोठ्या बाऊलमध्ये राजगिरा, भगर, साबुदाणा, शिंगाड्याचे पीठ घेऊन ही सगळी पीठ एकत्रित मिक्स करून घ्यावीत. (सगळी पीठ न घेता आपण यातील कोणतेही एक पीठ घेतले तरी चालू शकते.)२. आता या बाऊलमधील पिठात किसलेल्या रताळ्याचा किस घालावा. त्यानंतर सगळे जिन्नस हाताने कालवून एकजीव करून घ्यावे. ३. त्यानंतर या पिठात बारीक चिरलेली कोथिंबीर (पर्यायी) चवीनुसार मीठ, जिरे, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, साखर, किसलेल आलं घालावे. 

फक्त २ मिनिटांत करा मॅगीची भेळ, चहासोबत खाण्यासाठी मस्त चमचमीत पदार्थ, खा मनसोक्त...

४. सगळ्यात शेवटी या पिठात गरजेनुसार पाणी घालून पीठ व्यवस्थित मळून घ्यावे. ५. आता या तयार पिठाचे मध्यम आकाराचे गोळे तयार करावेत. ६. पोळपाट घेऊन त्यावर बटर पेपर किंवा ओला कॉटनचा रुमाल अंथरुन त्यावर थालीपीठ गोलाकार आकारात थापून घ्यावे. ७. आता एक पॅन गरम करून त्यावर तेल किंवा तूप सोडून हे थालीपीठ दोन्ही बाजुंनी खरपूस भाजून घ्यावे. 

गरमागरम उपवासाचे थालीपीठ दह्यासोबत खाण्यासाठी सर्व्ह करावे.

टॅग्स :अन्नपाककृतीमहाशिवरात्री