पावसाळा सुरु झाला की आपल्याला बाजारात सर्वत्र अळूची पानं पाहायला मिळतात. (Konkan recipe) या काळात आपण अळू वडीची चव हमखास खातो. परंतु, महाराष्ट्रातील इतर भागात अळूच्या वड्याच नाही तर त्याच्या पानांची भाजी देखील केली जाते.(Maharashtra traditional) अळूचं फदफदं हा कोकणातील आणि कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग परिसरात प्रसिद्ध असलेला पारंपरिक आणि चवदार पदार्थ आहे.(Konkan monsoon food ) अळू म्हणजे अळूच्या पानांचा वापर करून बनवलेली भाजी. "फदफदं" हा शब्द ऐकला की जिभेवर एक वेगळी चव अनुभवायला मिळते कारण ही भाजी थोडीशी रसदार, मसालेदार आणि घरगुती चव असलेली असते. (maharashtra food) यामध्ये शेंगदाणे आणि मका घालून या भाजीची चव आणखी वाढते. ही भाजी प्रामुख्याने पावसाळ्यात किंवा श्रावणात बनवली जाते. पचायला हलकी असून यात फायबर, लोह जास्त प्रमाणात आहेत. पारंपरिक पद्धतीने अळूचं फदफदं कसं बनवायचं पाहूया. यासाठी लागणारे साहित्य आणि कृती पाहा.
शेवग्याच्या पानांचं करा कुरकुरीत कटलेट, क्रिस्पी व टेस्टी नाश्ता- ठिसूळ हाडं होतील मजबूत
साहित्य
अळूची पाने - २ ते ३भिजवलेले शेंगदाणे - अर्धी वाटीमक्याचे तुकडे - ३ ते ४पाणी मीठ - चवीनुसार बेसनाचे पीठ - १ वाटीतेल मोहरी - १ चमचाहिरवी मिरची - २ मेथी दाणे - अर्धा चमचा हिंग - १ चमचा कढीपत्त्याची पाने- ७ ते ८लाल मिरची पावडर - १ चमचा गूळ - अर्धी वाटीचिंचेचा कोळ - छोटी वाटी
कृती
1. सगळ्यात आधी अळूची पाने धुवून स्वच्छ करा. आता पानांना बारीक चिरून घ्या. देठांचे देखील बारीक तुकडे करा. यानंतर कढईमध्ये पाणी घालून त्यात चिरलेले अळूची पाने, देठ, भिजवलेले शेंगदाणे , मक्याचे तुकडे आणि पाणी घाला. वरुन मीठ घालून व्यवस्थित शिजवून घ्या.
2. आता एका भांड्यात बेसनाचे पीठ घेऊन त्यात पाणी घाला. उकडलेल्या अळूच्या पानांमध्ये बेसनाची पातळ केलेली पेस्ट घाला. यामधून उकडलेला मका काढून घ्या.
3. कढईला गॅसवर तापवून त्यात तेल गरम करा. तेल गरम झाल्यानंतर त्यात मोहरी, हिरवी मिरची, मेथीचे दाणे, हिंग, कढीपत्ता, लाल मिरची पावडर घाला. वरुन बेसनाच्या पीठात घोळवलेले मिश्रण घाला. त्यात गुळाचा खडा आणि चिंचेचा कोळ घाला. वरुन मीठ घालून उकळी येऊ द्या. त्यानंतर त्यात उकडलेला मका घालून उकळी येऊ द्या. वाफाळत्या भातासोबत किंवा भाकरीसोबत खा अळूची पातळ भाजी किंवा फदफदं