महाराष्ट्रातील अनेक राज्यात विविध पद्धतीच्या चटणींची चव चाखली जाते. (Maharashtra food recipes) भाजी नसली किंवा वरण भातासोबत तोंडी लावायला चटकदार चटणीचा पर्याय हा चांगला समजला जातो.(Spicy Kolhapuri chutney recipe) कोल्हापुरात किंवा पश्चिम महाराष्ट्रात चटणी प्रत्येक घरांमध्ये वेगळ्या पद्धतीनं बनते. कोणी जास्त तिखट, तर कोणी थोडीशी गोडसर. काही चटण्या तर कांदा लसूण न घालता तयार केल्या जातात.(Village-style Maharashtrian chutney)कोल्हापुरी तिखट शेंगदाणा चटणी ही महाराष्ट्राच्या खानदानी चवीलाच नाही, तर कोल्हापूरच्या रुचकर खाद्यपरंपरेची खास डिश आहे.(10 minute chutney recipe) ही चटणी केवळ तिखटच नाही खवय्यांची आवडती मेजवाणी. खमंग भाजलेले शेंगदाणे, लाल मिरच्या आणि लसूण यांना एकत्र करुन हा पदार्थ तयार केला जातो.(Indian spicy chutney) गरमागरम भाकरी किंवा भातासोबत आवडीने खाल्ला जातो. हा पदार्थ कसा करायचा पाहूया.
साहित्य
तेल - १ चमचाशेंगदाणे - १ कप हिरव्या मिरच्या - ७ ते ८ लसूण पाकळ्या - २० ते २५ तीळ - २ चमचे जिरे - १ चमचा कोथिंबीर - १/४ कप मीठ - चवीनुसार
कृती
1. सगळ्यात आधी कढईवर पॅन ठेवून त्यावर तेल घाला. त्यात शेंगदाणे चांगले भाजून घ्या. आता त्यात मिरच्या आणि लसूण पाकळ्या भाजा.
2. यामध्ये आता तीळ, जिरे आणि कोथिंबीर चांगले खरपूस भाजून घ्या. लालसर झाल्यानंतर आणि कोथिंबीराचा रंग बदलल्यानंतर गॅस बंद करा.
3. आता तयार मिश्रण थोडे थंड होऊ द्या. मिक्सरच्या भांड्यात भाजून थंड केलेल शेंगदाणे आणि इतर भाजलेले साहित्य घाला. शेंगदाण्याचे साल काढायचे असेल तर काढू शकता. वरुन मीठ घालून मिक्सरमध्ये वाटून घ्या. तयार होईल कोल्हापुरी तिखट चटणी.
4. ही चटणी आपण भात किंवा भाकरीसोबत खाऊ शकतो. इतकेच नाही तर भाजी नसल्यास हा चांगला पर्याय आहे.