Join us

Maharashtra food : ऑफिसच्या डब्यासाठी करा चमचीत मसाला तोंडली, सहकारी विचारतील भाजीची रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2025 10:11 IST

Spicy tendli masala: Maharashtra food: अगदी १५ मिनिटांत होईल मसाला तोंडली, यासाठी लागणारे साहित्य आणि कृती पाहूया.

सकाळच्या घाईच्या वेळी डब्यात काय द्यायचं हा प्रश्न अनेक गृहिणींना असतो.(office tiffin recipe) त्यात घरच्यांच्या आवडत्या भाज्या नसतील तर ते लगेच नाक मुरडतात. तोंडली ही भाजी अनेकांना आवडत नाही. परंतु, ही फळभाजी चवीला उत्तम आणि आरोग्यासाठी पौष्टिक आहे.(Lunchbox recipe) मसाले भातापासून अनेक मिक्स भाज्यांमध्ये तोंडलीचा वापर केला जातो. या भाजीमध्ये अनेक पोषक तत्व दडलेली आहेत.(Spicy tendli masala) यात पुरेसे व्हिटॅमिन्स, लोह, फायबर, कॅल्शियमसारखे घटक आहेत. जे पचायला हलके असते. यामुळे आपली पचनशक्ती देखील सुधारते. तोंडली चवीला थोडी तुरट असल्यामुळे आपल्याला ती आवडत नाही. तसेच ती कापण्यासाठी देखील अधिक वेळ लागतो.(Maharashtra  food) सकाळी घाईच्या वेळी डब्यात तोंडलीची भाजी द्यायची असेल तर अशा पद्धतीने करा.(lunch recipe) अगदी १५ मिनिटांत होईल मसाला तोंडली, यासाठी लागणारे साहित्य आणि कृती पाहूया. 

Maharashtra food : झणझणीत कोल्हापुरी तिखट चटणी घरी करा १० मिनिटांत, अस्सल गावरान चव

साहित्य 

तोंडली - पाव किलोतेल -४ चमचे मोहरी - १/२ चमचा हिंग - १/४ चमचाजिरे- १/२ चमचाबारीक चिरलेला कांदा - १ चमचा आले लसूण पेस्ट - १ चमचा हळद - १/२ चमचा मिरची पावडर - १/२ चमचाधने पूड - १ चमचा जिरे पूड - १/२ चमचागरम मसाला - १/२ चमचामीठ - चवीनुसार गूळ - १ चमचा पाणी - १/४ कप दाण्याचा कूट - २ चमचा चिरलेली कोथिंबीर - आवश्यकतेनुसार मॅगी मसाला पॅकेट - १ चमचा 

कृती 

1. सगळ्यात आधी तोंडली धुवून पुसून घ्या. नंतर मध्यभागी चिरून घ्या. कुकरमध्ये तेल गरम करुन त्यात चिरलेली तोंडली घाला. वरुन मीठ घालून चांगली फ्राय करुन घ्या. थोडा रंग बदलल्यानंतर ताटात काढून घ्या. 

2. कुकरमध्ये पुन्हा तेल घालून चांगले गरम होऊ द्या. मोहरी, जिरे, हिंग तडतडू द्या. नंतर चिरलेला कांदा, आलं-लसूण पेस्ट, हळद, लाल मिरची पावडर , धने पावडर, जिरे पावडर, गरम मसाला आणि पाणी घालून मसाला चांगला शिजवून घ्या. 

3. आता फ्राय केलेली तोंडली घाला. वरुन गूळ, मीठ आणि कोथिंबीर घालून मिश्रण एकजीव करा. पाणी घालून कुकर चमच्याने पुन्हा एकदा ढवळून घ्या. झाकण लावून शिट्टी काढून घ्या. वाफेवर शिजल्यानंतर झाकण काढा. उकळी आल्यानंतर वरुन मॅगी मसाला घाला. पुन्हा एकदा ढवळून घ्या, वरुन कोथिंबीर पेरा. तयार होईल चमचमीत मसाला तोंडली. 

टॅग्स :अन्नपाककृती