नवरात्री हा सण उत्सव, आनंदासह अनेक विविध पदार्थांची चव चाखणारा सण.(Mahanavami parasad) या नऊ दिवसात अनेकजण उपवास करतात. उपवासाचे वेगवेगळ पदार्थ खातात. पण अनेकजण फळे किंवा ज्यूस पिऊन हा उपवास धरतात.(kheer recipe) नवरात्री महानवमीला विशेष महत्त्व असते. या दिवशी पूजा, हवन आणि देवीला नैवेद्य अर्पण केला जातो.(apple kheer recipe) या दिवशी जेवणात आणि प्रसादात पारंपरिक पदार्थांना विशेष स्थान असते. नेहमीच्या गोड पदार्थांमध्ये शेवयांची खीर, गोड पुऱ्या किंवा हलवा केला जातो. पण महानवमीला काही वेगळे आणि चविष्ट बनवायचे असेल तर सफरचंदाची खीर ट्राय करु शकतो. (prasad recipe for navrtari)
सफरचंद हे फळ आपण आवडीने खातो. आपल्याला गोडाचे तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर या फळाची खीर बनवू शकता.(Traditional kheer) सफरचंदामध्ये जीवनसत्त्वे, अँटिऑक्सिडंट्स आणि फायबर भरपूर प्रमाणात असते. कमी वेळात आणि झटपट होणारी सफरचंदाची खीर कशी बनवायची पाहूया.
साहित्य
दूध - १ लीटर
तूप - २ चमचे
ड्रायफ्रुट्स - आवश्यकतेनुसार
सफरचंद - ३
साखर - १/३ कप
केशर दूध - २ ते ३ चमचे
वेलची पावडर - अर्धा चमचा
गुलाब पाकळ्या
कृती
1. सगळ्यात आधी गॅसवर पातेल ठेवून त्यात दूध गरम करा. उकळी आल्यानंतर चमचा फिरवा. ज्यामुळे दूध थोड घट्ट होईल. आता कढईत तूप गरम करुन ड्रायफ्रुट्स तळून घ्या.
2. एका भांड्यात सफरचंद किसून घ्या. त्यानंतर कढईत किसलेले सफरचंद आणि साखर घालून मिश्रण तयार करा. गॅसवर ठेवलेले दूध हळूहळू घट्ट होईल आणि त्याचा रंग बदलेल त्यात वरुन केशरचे दूध घाला. वेलची पूड, तळलेले ड्रायफ्रुट्स आणि सफरचंदाचे मिश्रण घालून चमच्याने ढवळत राहा. दूधाला उकळी आल्यानंतर गॅस बंद करा.
3. आता एका बाऊलमध्ये तयार खीर घेऊन त्यात सफरचंदाची खीर घ्या. वरुन गुलाबाच्या पाकळ्या आणि पिस्ताचे काप घालून महानवमीच्या नैवेद्यात ठेवा.
