Lokmat Sakhi >Food > आशा भोसलेंना आवडते 'माँ की दाल'! पराठा, भातासोबत खा पोटभर - अस्सल पारंपरिक रेसिपी...

आशा भोसलेंना आवडते 'माँ की दाल'! पराठा, भातासोबत खा पोटभर - अस्सल पारंपरिक रेसिपी...

Maa Ki Dal : Langar Waali Dal : Maa Choliyan di Dal : Maa Ki Daal Recipe : Asha Bhosleji's Favourite"Maa Ki Dal" Recipe : आशाताईंना आवडणाऱ्या व पेशावरची खासियत असलेल्या 'माँ की दाल' ची पारंपरिक रेसिपी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2025 15:05 IST2025-09-15T14:55:52+5:302025-09-15T15:05:17+5:30

Maa Ki Dal : Langar Waali Dal : Maa Choliyan di Dal : Maa Ki Daal Recipe : Asha Bhosleji's Favourite"Maa Ki Dal" Recipe : आशाताईंना आवडणाऱ्या व पेशावरची खासियत असलेल्या 'माँ की दाल' ची पारंपरिक रेसिपी...

Maa Ki Dal Langar Waali Dal Maa Choliyan di Dal Asha Bhosleji's Favourite"Maa Ki Dal" Recipe | आशा भोसलेंना आवडते 'माँ की दाल'! पराठा, भातासोबत खा पोटभर - अस्सल पारंपरिक रेसिपी...

आशा भोसलेंना आवडते 'माँ की दाल'! पराठा, भातासोबत खा पोटभर - अस्सल पारंपरिक रेसिपी...

आपल्याकडील भारतीय थाळींमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या व चवींच्या डाळींना विशेष महत्व असते. जेवणाच्या ताटातील वाफाळता भात असो किंवा गरमागरम चपाती, यासोबत डाळ खायला अतिशय चविष्ट लागते. भारतातील (Langar Waali Dal) वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या प्रकारच्या आणि खास चवीच्या अशा (Maa Ki Dal) अनेक पद्धतीच्या डाळी केल्या जातात. सुप्रसिद्ध जेष्ठ गायिका आशा भोसले यांनी एका मुलाखती दरम्यान, त्यांना आवडणाऱ्या आणि पेशावरची खासियत असलेल्या 'माँ की दाल' (Maa Ki Daal Recipe) बद्दल त्यांची खास आठवण शेअर केली आहे. ही डाळ चवीला अप्रतिम असून ती घरच्याघरीच तयार करायला देखील खूप सोपी आहे(Asha Bhosleji's Favourite"Maa Ki Dal" Recipe).

काळी उडीद डाळ, राजमा आणि इतर चविष्ट मसाले त्यांचा वापर करून तयार केली जाणारी ही डाळ रुचकर चवीसोबतच तितकीच पौष्टिकही असते. रेस्टॉरंट-स्टाईल चव घरच्या घरीच हवी असल्यास आपण या सोप्या रेसिपीच्या मदतीने झटपट, गरमागरम 'माँ की दाल' करु शकता. अशा भोसले यांच्या आवडीची ही पेशावरी स्पेशल 'माँ की दाल' सोप्या पद्धतीने कशी तयार करायची याची झटपट रेसिपी पाहूयात...     

साहित्य :- 

१. काळी अक्खी उडीद डाळ - १ कप 
२. चणा डाळ - १/२ कप 
३. राजमा - १/४ कप
४. हळद - १ टेबलस्पून 
५. लाल मिरची पावडर - १ टेबलस्पून 
६. आलं - २ ते ३ छोटे तुकडे (बारीक चिरलेलं)
७. लसूण - ४ ते ५ पाकळ्या (बारीक चिरलेल्या)
८. तमालपत्र - १ पान
९. मीठ - चवीनुसार 
१०. पाणी - गरजेनुसार
११. साजूक तूप - १ टेबलस्पून 
१२. जिरे - १ टेबलस्पून 
१३. हिरव्या मिरच्या - २ ते ३ (बारीक चिरलेल्या)
१४. कांदा - १ कप (बारिक चिरलेला)
१५. धणेपूड - १/२ टेबलस्पून
१६. टोमॅटो - १ कप (बारीक चिरलेला) 
१७. कोथिंबीर - १ टेबलस्पून (बारीक चिरलेली)

तेल की तूप, फोडणीसाठी काय फायदेशीर ? ९९% लोकांना माहीतच नसते रोजची १ चूक - होते आरोग्याचे नुकसान... 


ना माती, ना कुंडी, ग्लासभर पाण्यात लावा आलं घरच्याघरीच! ताजं औषधी आलं चहात घाला मस्त...

कृती :-

१. एका मोठ्या बाऊलमध्ये, काळी अक्खी उडीद डाळ, चणा डाळ, राजमा एकत्रित घेऊन ३ ते ४ वेळा स्वच्छ धुवून घ्यावेत. त्यानंतर यात पुरेसे पाणी घालून डाळ ५ ते ६ व्यवस्थित भिजवून घ्याव्यात. 
२. मग कुकरमध्ये भिजवलेल्या डाळी आणि पुरेसे पाणी घालावे. मग यात हळद, बारीक चिरलेल आलं, लसूण, तमालपत्र, चवीनुसार मीठ घालून कुकरमध्ये २ ते ३ शिट्ट्या काढून डाळ शिवून घ्यावी. 

कमी लोणी अगदी उरलेल्या बेरीतूनही काढा सगळे साजूक तूप, पाहा ट्रिक! रवाळ - घरगुती तुपाची चव भारी... 

३. डाळ शिजल्यानंतर रवीने डाळ हलकेच घुसळून घ्यावी. 
४. एका दुसऱ्या भांड्यात थोडे साजूक तूप घेऊन ते मंद आचेवर गरम करून घ्यावे. यात जिरे, बारीक चिरलेल आलं, लसूण, हिरव्या मिरच्या, कांदा, टोमटो असे सगळे जिन्नस घालूंन खमंग अशी फोडणी तयार करून घ्यावी. नंतर या फोडणीमध्ये, हळद, लाल मिरची पावडर, धणेपूड चवीनुसार मीठ घालावे.
५. सगळ्यात शेवटी या मिश्रणात कुकरमध्ये शिजवून घेतली डाळ घालावी. मग सगळे मिश्रण कालवून एकजीव करून घ्यावे. 
६. शेवटी वरुन बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरवून घ्यावी. 

मस्त गरमागरम अशी चमचमीत चवीची पेशावरी डाळ खाण्यासाठी तयार आहे. चपाती, पराठा किंवा वाफाळत्या भातासोबतच ही पेशावरी स्पेशल 'माँ की दाल'  खायला अतिशय चविष्ट लागते.

Web Title: Maa Ki Dal Langar Waali Dal Maa Choliyan di Dal Asha Bhosleji's Favourite"Maa Ki Dal" Recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.