अनेकदा आपल्या रात्रीच्या जेवणातील काही अन्नपदार्थ शिल्लक राहतातच. बरेचदा चपात्या जास्तीच्या केल्या जातात, किंवा खाल्ल्या जात नाहीत अशावेळी चपात्या भरपूर प्रमाणांत शिल्लक राहतात. या शिळ्या उरलेल्या चपात्या दुसऱ्या दिवशी खायच्या म्हटलं तर अनेकांना आवडत नाही. अशावेळी या चपात्या वाया जाऊ (Leftover Roti Kheer) नये यासाठी आपण त्याचे वेगवेगळे पदार्थ तयार करून खातो. आत्तापर्यंत आपण उरलेल्या शिळ्या (How To Make Leftover Roti Kheer) चपात्यांची फोडणीची पोळी, चपातीचा उपमा, चपातीचा लाडू असे वेगवेगळे पदार्थ तयार करुन खाल्ले असतील. पण कधी शिळ्या चपात्यांची (Perfect Roti Kheer Recipe) चविष्ट गोड चवीची खीर खाल्ली आहे का? दूध, साखर, सुकामेवा आणि घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्याच्या मदतीने तयार केलेली ही खीर अगदी झटपट तयार होते आणि मोठ्यांपासून लहानांपर्यंत सगळ्यांना आवडते(How to make kheer from leftover roti).
विशेषतः जेव्हा घरातल्यांना गोड खाण्याची इच्छा होते, आणि काही वेगळं करायचं असतं, तेव्हा ही खीर हा एक उत्तम पर्याय ठरु शकतो. गावाकडे याला "शिळपोळीची खीर" असंही म्हटलं जातं, आणि हे पारंपरिक खाद्यपदार्थ आजही अनेक घरांमध्ये विशेष आवडीने खाल्ले जातात. यात दूध आणि पोळी असल्याने ही खीर चवीसोबतच खायला देखील अधिक पौष्टिक असते. यासाठी, आपण हेल्दी म्हणून देखील सकाळच्या नाश्त्याला पोळीची खीर खाऊ शकतो. या खिरीचं पौष्टिक मूल्य काय आहे, आणि घरातल्या सहज उपलब्ध असणाऱ्या साहित्याने झटपट कशी तयार करायची ते पाहूयात.
साहित्य :-
१. उरलेल्या शिळ्या चपात्या - ४ ते ५ चपात्या२. साजूक तूप - २ टेबलस्पून ३. दूध - १ ग्लास४. साखर - १/२ कप ५. वेलची पूड - १/२ टेबलस्पून ६. ड्रायफ्रुटसचे काप - ३ ते ४ टेबलस्पून
कृती :-
१. उरलेल्या शिळ्या चपात्यांचे लहान - लहान तुकडे करून घ्यावेत. त्यानंतर हे सगळे तुकडे एका मिक्सरच्या भांड्यात भरून हलकेच फिरवून घ्यावेत. (जास्त फिरवून त्याचा भुगा करु नये, लहान - बारीक तुकडे राहतील असे ठेवावे.)२. आता एका कढईत थोडे साजूक तूप घेऊन त्यात चपातीचे मिक्सरमध्ये वाटून घेतलेले तुकडे हलकेच परतून घ्यावेत. ३. तुकडे परतून झाल्यावर त्यात दूध आणि साखर घालावी. आता सगळे मिश्रण एकत्रित चमच्याने कालवून साखर विरघळवून घ्यावी.
रविवारी नाश्त्याला करा 'मलई ब्रेड विथ चाय', खास दुबई स्पेशल! घरच्याघरी करा दुबईची व्हायरल रेसिपी...
ताकात मिसळा ७ सुपरफूड, पचन आणि पोषण मिळेल एकत्र, पोटाला मिळेल थंडावा...
४. साखर विरघळवून सगळे मिश्रण एकजीव झाल्यावर त्यात वेलची पूड घालावी. ५. त्यानंतर या खिरीला एक हलकी उकळी काढावी. उकळी आल्यानंतर गॅस कमी करून त्यात तळून घेतलेले ड्रायफ्रुट्सचे काप घालावे. ६. सगळ्यात शेवटी ही खीर एकजीव होण्यासाठी चमच्याने ढवळून घ्यावी.
उरलेल्या शिळ्या चपात्यांची खीर खाण्यासाठी तयार आहे. ही तयार खीर आपण गरमागरम किंवा थंड करून देखील खाऊ शकता.