Join us
Daily Top 2Weekly Top 5

शिळ्या भाताची इडली.. ‘अशी’ मऊमऊ हलकी जाळीदार इडली तुम्ही खाल्ली नसेल! झटपट नाश्ता स्पेशल रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2026 09:30 IST

Quick breakfast ideas with leftover rice: How to make idli from cooked rice: उरलेल्या भातापासून 'इन्स्टंट इडली' कशी बनवायची. यासाठी लागणारे साहित्य आणि कृती पाहूया.

सकाळी नाश्त्याताला काय बनवायचे हा प्रत्येक गृहिणीसमोरचा सर्वात मोठा प्रश्न असतो. त्यातच जर रात्रीचा भात उरला असेल तर तो वाया घालवण्यापेक्षा त्याचा वापर करुन झटपट नाश्ता तयार करणं कधीही उत्तम.(Quick breakfast ideas with leftover rice) तांदूळ भिजवणे, वाटणे आणि आंबवणे यांसारख्या प्रक्रिया करुन आपल्या इडली किंवा डोसा करता येतो.(How to make idli from cooked rice) पण आपण उरलेल्या भातापासून अगदी हॉटेलसारखी पांढरीशुभ्र आणि हलकी-फुलकी इडली करु शकता. ही इडली चवीला इतकी अप्रतिम लागते की, उरलेल्या भातापासून बनवली आहे हे सुद्धा कळणार नाही. (Healthy breakfast recipes Marathi) पाहुणे आले असताना किंवा मुलांच्या डब्यासाठी हा एक झटपट आणि सोपा पर्याय आहे. जाणून घेऊया उरलेल्या भातापासून 'इन्स्टंट इडली' कशी बनवायची. यासाठी लागणारे साहित्य आणि कृती पाहूया. (No-soak instant idli batter)

वरणभात-लोणचं आवडणाऱ्या आशा भोसलेंची जगभरात १४ रेस्टॉरण्ट्स, गाण्यासह पाककलेवरही केलं भरभरुन प्रेम!

साहित्य 

उरलेला भात -  २ वाट्या रवा - १ वाटी दही - १ वाटी मीठ - चवीनुसार इनो- १ पाकीटपाणी - आवश्यकतेनुसार 

कृती 

1. सगळ्यात आधी रात्रीचा उरलेला शिळा भात मिक्सरच्या भांड्यात घ्या. त्यात थोडे पाणी घालून त्याची एकदम बारीक आणि मऊ पेस्ट तयार करुन घ्या. पेस्टमध्ये भाताचे दाणे राहाणार नाहीत याची काळजी घ्या. 

2. एका मोठ्या बाऊलमध्ये ही भाताची पेस्ट काढा. त्यात रवा आणि दही घालून व्यवस्थित मिक्स करा. गरजेनुसार थोडे पाणी घालून इडली पिठासारखे मध्यम दाटसर मिश्रण तयार करा.

3. या मिश्रणावर झाकण ठेवून १० ते १५ मिनिटे बाजूला ठेवा. यामुळे रवा व्यवस्थित फुलेल आणि इडली मऊ होईल.  १५ मिनिटानंतर मिश्रण जास्त घट्ट वाटत असेल तर त्यात थोडे पाणी घाला. यात चवीनुसार मीठ आणि इनो घालून एकाच दिशेने फेटून घ्या. 

4. इडली पात्राला तेल लावून ग्रीस करा. पात्रात बॅटर घालून १० ते १२ मिनिटे मध्यम आचेवर इडल्या वाफवून घ्या. इडल्या थोड्या थंड झाल्यावर डि-मोल्ड करा. तुमची गरमागरम आणि लुसलुशीत इडली तयार होईल. खोबऱ्याची चटणी किंवा सांबारसोबत खा.  

English
हिंदी सारांश
Web Title : Make soft, spongy idlis from leftover rice: Quick breakfast recipe.

Web Summary : Transform leftover rice into delicious, soft idlis! This quick and easy recipe requires just rice, semolina, yogurt, and Eno. Grind the rice, mix with other ingredients, and steam for a perfect, instant breakfast. Enjoy with chutney or sambar.
टॅग्स :अन्नपाककृती