अनेकदा आपला रात्रीच्या जेवणातील जास्तीचा भात उरतोच. हा शिल्लक राहिलेला भात आपण शक्यातो दुसऱ्या दिवशी खातो किंवा हमखास फोडणीचा भात करून खातो. परंतु नेहमीच अशा शिळ्या भाताचा (Leftover Rice Dhokla) फोडणीचा भात करून खायचा कंटाळा येतो. अशावेळी नेमकं या भाताचं करायचं काय (Instant Leftover Rice Dokla) असा एकच प्रश्न भंडावून सोडतो. फोडणीचा भात वगळता, उरलेल्या शिळ्या भाताचा उपयोग करून काहीतरी चविष्ट आणि झटपट तयार करता आलं, तर त्यासारखं समाधान नाही( How To Make Leftover Rice Dhokla At Home).
उरलेल्या शिळ्या भाताचा नेहमीचा, तोच तो फोडणीचा भात करण्यापेक्षा मस्त, चविष्ट शिळ्या भाताचा ढोकळा करुन पाहाच. घरात उपलब्ध असलेल्या साहित्याने, कमी वेळात आणि थोड्याशा कल्पकतेने तयार होणारा हा ढोकळा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतो. उरलेल्या भाताचा ढोकळा हा एक पौष्टिक आणि खमंग नाश्त्याचा बेस्ट पर्याय होऊ शकतो. उरलेल्या शिळ्या भाताचा ढोकळा कसा करायचा याची सोपी रेसिपी पाहूयात.
साहित्य :-
१. उरलेला भात - २ कप
२. बेसन - १/२ कप
३. बारीक रवा - १/२ रवा
४. दही - १/२ कप
५. आलं - १ छोटा तुकडा
६. हिरव्या मिरच्या - २ ते ३ हिरव्या मिरच्या
७. पाणी - १ कप
८. जिरं - १ टेबलस्पून
९. हिंग - १/२ हिंग
१०. मीठ - चवीनुसार
११. बेकिंग सोडा - १/२ टेबलस्पून
१२. तेल - २ टेबलस्पून
१३. मोहरी - १ टेबलस्पून
१४. पांढरे तीळ - १ टेबलस्पून
१५. चिली फ्लेक्स - १ टेबलस्पून
१६. पाव भाजी मसाला - १ टेबलस्पून
१७. कोथिंबीर - २ ते ३ टेबलस्पून
न लाटता करा आलू पराठा, पाहा पसारा न होता झटपट आलू पराठा करायची ट्रिक...
कृती :-
१. मिक्सरच्या एका मोठ्या भांड्यात उरलेला भात, बेसन, बारीक रवा, दही, आलं, हिरव्या मिरच्या असे सगळे जिन्नस एकत्रित घेऊन वाटून घ्यावेत.
२. मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं बॅटर एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घ्यावे. या तयार बॅटरमध्ये, जिरं, हिंग, चवीनुसार मीठ घालून चमच्याने कालवून घ्यावे. आता हे बॅटर १५ ते २० मिनिटे झाकून ठेवून द्यावे.
३. २० मिनिटानंतर या बॅटरमध्ये बेकिंग सोडा घालून बॅटर मिक्स करून घ्यावे.
४. एका डिशला तेल लावून ग्रीस करावे, या डिशमध्ये तयार बॅटर ओतून घ्यावे. मग १० ते १५ मिनिटे हे वाफवून घ्यावे.
सिझन संपला तरी घ्या आंब्याचा आस्वाद! आंब्याच्या फोडी, आमरस स्टोअर करण्याची पद्धत - खा मनसोक्त...
५. व्यवस्थित वाफवल्यानंतर थोडे थंड झाल्यावर या मिश्रणाचे चौकोनी तुकडे करून घ्यावेत.
६. आता एका कढईत तेल घेऊन त्यात मोहरी, पांढरे तीळ, चिली फ्लेक्स, पाव भाजी मसाला घालून खमंग फोडणी तयार करून घ्यावी. या खमंग फोडणीत तयार ढोकळ्याचे तुकडे घालून ते हलकेच परतवून घ्यावेत. सगळ्यात शेवटी यावर बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरवून घालावी.
उरलेल्या भाताचा ढोकळा खाण्यासाठी तयार आहे. हा ढोकळा आपण चटणी किंवा सॉससोबत देखील खाऊ शकता. सकाळच्या नाश्त्याला किंवा संध्याकाळच्या टी - टाईमसाठी स्नॅक्स म्हणून हा ढोकळा बेस्ट ऑप्शन ठरु शकतो.