रात्रीचा भात उरला की सकाळी तो गरम करून खाण्याचा कंटाळा येतो. अशावेळी अन्नाचा अपमान न करता, त्या उरलेल्या भाताचे असे काही पदार्थ करता येतात की पाहणारे बघतच राहतील! कोकणी घराघरांत लोकप्रिय असलेली 'आंबोळी' हा न्याहारीचा एक असा प्रकार आहे जो लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनाच आवडतो. घरात उरलेला शिळा भात अनेकदा फेकून दिला जातो, पण कोकणातील पारंपरिक स्वयंपाकात त्याच भातापासून बनणारा एक भन्नाट आणि चविष्ट पदार्थ म्हणजे आंबोळ्या. मऊ, लुसलुशीत आणि सुंदर जाळीदार टेक्स्चर असलेल्या या आंबोळ्या सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या हलक्या खाण्यासाठी उत्तम पर्याय मानल्या जातात. कमी साहित्य, सोपी कृती आणि अप्रतिम चव यामुळे कोकणी घरांमध्ये हा पदार्थ आजही खास मानला जातो(Leftover Rice Amboli Recipe).
शिळ्या भाताचा योग्य वापर करून तयार होणाऱ्या या आंबोळ्या केवळ स्वादिष्टच नाहीत, तर पचायला हलक्या आणि पटकन बनणाऱ्या आहेत. नारळाची चटणी, घावनाची चटणी किंवा अगदी साध्या तुप-गुळासोबत खाल्ल्या तरी त्यांची चव अधिक खुलते. या आंबोळ्या इतक्या मऊ होतात की तोंडात टाकताच विरघळतील आणि त्यांच्यावर पडणारी ती मोहक जाळी (How To Make Amboli From Leftover Rice) पाहून तुम्हाला हॉटेलच्या डोशाचीही आठवण येणार नाही. कमी मेहनत, घरातलं उपलब्ध साहित्य आणि चवीला एकदम भारी...
साहित्य :-
१. शिल्लक उरलेला भात - १ कप २. बारीक रवा - १/२ कप ३. दही - १/२ कप ४. पाणी - गरजेनुसार५. मीठ - चवीनुसार६. इनो / बेकिंग सोडा - १/२ टेबलस्पून७. तेल - ३ ते ४ टेबलस्पून
प्रमाण चुकलं की इडली डोसे फसलेच, डाळ तांदळांचं ‘असं’ गणित परफेक्ट- अजिबात विसरु नका प्रमाण...
कृती :-
१. सगळ्यात आधी मिक्सरच्या एका मोठ्या भांड्यात शिल्लक राहिलेला भात घेऊन त्यात बारीक रवा, गरजेनुसार थोडं पाणी, चवीनुसार मीठ घालून सगळे मिश्रण एकत्रित करून मिक्सरमध्ये वाटून घ्यावे. २. मिक्सरच्या भांडयात वाटून घेतलेलं मिश्रण एका बाऊलमध्ये काढून १० ते १५ मिनिटे झाकून ठेवावं.
३. १० ते १५ मिनिटानंतर त्यात लगेच इनो किंवा खायचा बेकिंग सोडा या दोघांपैकी कोणताही एक पदार्थ घालावा. वरून किंचित चमचाभर पाणी घालून मिश्रण चमच्याने कालवून एकजीव करून घ्यावे. ४. पॅनला व्यवस्थित गरम करून त्यावर थोडं तेल लावून घ्यावे. मग तयार बॅटर पॅनवर ओतून चमच्याने हलकेच पसरवून व्यवस्थित गोलाकार आकार घ्यावा. ५. आंबोळीचे बॅटर तव्यात टाकताच त्याला मस्त छोटी - छोटी छिद्र पडून जाळी सुटेल.
अशाप्रकारे उरलेल्या शिळ्या भाताच्या मऊ - लुसलुशीत आणि जाळीदार अशा कोकणी स्टाईल आंबोळ्या खाण्यासाठी तयार आहेत. या गरमागरम आंबोळ्या आपण चहा किंवा हिरव्यागार चटणीसोबत खाण्याचा आनंद लुटू शकता.
Web Summary : Don't waste leftover rice! Make soft, lacy Amboli, a popular Konkani breakfast. This easy recipe uses minimal ingredients for a delicious and quick dish. Enjoy with coconut chutney or ghee.
Web Summary : बचे हुए चावल को बर्बाद न करें! नरम, जालीदार आंबोली बनाएं, जो एक लोकप्रिय कोंकणी नाश्ता है। यह आसान रेसिपी स्वादिष्ट और झटपट व्यंजन के लिए न्यूनतम सामग्री का उपयोग करती है। नारियल की चटनी या घी के साथ आनंद लें।