आपल्यापैकी बऱ्याच घरांत अजूनही पारंपरिक पद्धतीने साजूक तूप (How to use leftover ghee residue) तयार केले जाते. साजूक तूप कढवून झाल्यानंतर तळाशी जो गाळ राहतो हीच बेरी आपण शकयतो फेकून देतो. साजूक तुपाची बेरी काहीच उपयोगाची नाही असं समजून आपण अनेकदा ती बेरी फेकून देतो. परंतु आपण या बेरीचा वापर करुन चक्क बेकरी (Leftover ghee solids mawa cake recipe) पेक्षाही भन्नाट चवीचा मऊसूत आणि स्पॉंजी मावा केक (Homemade mawa cake with ghee residue) तयार करु शकतो. आपण शक्यतो केक खायचा म्हटलं तर बेकरीतून विकत आणतो, बाजारांत देखील बटर, क्रीम, चॉकलेट अशा वेगवेगळ्या फ्लेवर्सचे केक विकत मिळतात(Indian Mawa Cake with ghee residue).
साजूक तुपाच्या बेरीजला थोडा मॉडर्न ट्विस्ट देत आपण मस्त खमंग चवीचा "साजूक तुपाच्या बेरीचा केक" अगदी झटपट तयार करु शकतो. बेरीचा खमंगपणा आणि साजूक तुपाचा स्वाद यांचं सुंदर फ्युजन म्हणजे हा केक. कोणत्याही खास प्रसंगासाठी, गोड आठवणींसोबत खावासा वाटणारा हा केक म्हणजे आरोग्यदायक आणि स्वादिष्ट पर्याय आहे. साजूक तुपाच्या बेरीचा केक तयार करण्याची सोपी रेसिपी पाहूयात.
साहित्य :-
१. साजूक तुपाची बेरी - १ कप २. खवा - १ कप ३. साखर - १ कप ४. दूध - १ + १/२ कप ५. बारीक रवा - १ + १/२ कप ६. मैदा - १/४ कप ७. बेकिंग पावडर - १ टेबलस्पून ८. बेकिंग सोडा - १/२ टेबलस्पून ९. इसेंन्स - ३ ते ४ थेंब १०. ड्रायफ्रूट्स काप - १/२ कप
कृती :-
१. एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यात साजूक तुपाची बेरी, खवा, साखर, दूध हे सगळे पदार्थ एकत्रित घालून ते मिक्सरला वाटून त्याचे थोडे पातळ असे बॅटर तयार करून घ्यावे. २. मिक्सरमधील तयार बॅटर एक मोठ्या बाऊलमध्ये काढून घ्यावे. या बॅटरमध्ये बारीक रवा, मैदा, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, इसेंन्स घालावे. आता हे सगळे मिश्रण चमच्याने कालवून एकजीव करून घ्यावे. २० मिनिटांसाठी हे तयार केकचे बॅटर झाकून ठेवून दयावे.
साजूक तूप कढवताना बिघडते? लोण्यात २ पदार्थ मिसळा - तूप होईल रवाळ रंगही येईल मस्त...
दक्षिण भारतात घरोघर करतात तसा सांबार राईस करण्याची पाहा सोपी रेसिपी, मस्त आंबटगोड चविष्ट पदार्थ...
३. २० मिनिटानंतर हे तयार बॅटर एका केक टिनमध्ये भरुन घ्यावे. त्यानंतर या बॅटरवर तुमच्या आवडत्या ड्रायफ्रुट्सचे काप किंवा तुकडे वरुन भुरभुरवून घालावे.४. मग कुकर ५ मिनिटे प्री - हिट करून त्यात हा केक टिन ठेवून २० ते २५ मिनिटे केक व्यवस्थित बेक करून घ्यावा. केक बेक झाल्यानंतर ३० ते ३५ मिनिटे कुकर उघडू नये. ३० मिनिटांनंतरच कुकर उघडावा.
साजूक तुपाच्या बेरीचा मस्त मऊ - लुसलुशीत असा स्पॉंजी केक खाण्यासाठी तयार आहे. साजूक तुपाची बेरी आपण शक्यतो फेकून देतो परंतु, आपण त्याच बेरीचा घरच्याघरीच बेकरीपेक्षा भन्नाट असा मावा केक तयार करु शकतो.
Traditional Food : मुसळदार पावसात गरमागरम वाफाळत्या चहासोबत बिस्किट नको खा पारंपरिक मुगाची मठरी!