Join us
Daily Top 2Weekly Top 5

आजीच्या हातची चव, पारंपरिक लसणीच्या पातीचा झणझणीत ठेचा! दोन भाकरी जास्तच खाल...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2026 11:20 IST

Lasnachya Paticha Thecha Recipe : How To Make Olya Lasnachya Paticha Thecha Recipe At Home : थंडीच्या दिवसांत खास करा ओल्या हिरव्यागार लसणीच्या पातीचा झणझणीत ठेचा रेसिपी...

थंडीचा तडाखा वाढला की बाजारात ठिकठिकाणी ताज्या, टवटवीत, हिरव्यागार भाज्यां फार मोठ्या प्रमाणांत विकायला ठेवलेल्या दिसतात. थंडीच्या दिवसांत शरीराला उष्णता देणारे, चवीलाच नाही तर आरोग्यालाही पोषक असे पदार्थ खाण्याची खास गरज असते. अशाच पारंपरिक आणि चविष्ट पदार्थांपैकी एक म्हणजे हिरव्यागार लसणाच्या पातीचा ठेचा.... थंडीच्या दिवसांत मिळणारी 'ओल्या लसणाची पात' म्हणजे खवय्यांसाठी एक पर्वणीच असते. बाजरीची गरमागरम भाकरी आणि सोबतीला झणझणीत, जिभेला तिखट चवीचा अस्सल अनुभव देणारा हिरव्या पातीचा ठेचा असेल, तर जेवणाची रंगत काही वेगळीच असते. हा ठेचा केवळ चवीलाच नाही, तर आरोग्यासाठीही अत्यंत गुणकारी मानला जातो(How To Make Olya Lasnachya Paticha Thecha Recipe At Home).

हिवाळ्यात बाजारात सहज मिळणाऱ्या ताज्या लसणाच्या पातींमध्ये औषधी गुणधर्म भरपूर प्रमाणात असतात. यांचा ठेचा बनवल्यास जेवणाची चव वाढतेच, पण पचन सुधारते, सर्दी-खोकल्यापासून संरक्षण मिळते आणि शरीराला आवश्यक उष्णता मिळते. झटपट तयार होणारा, तिखट-झणझणीत आणि खमंग असा लसणाच्या पातीचा ठेचा थंडीच्या दिवसांत भाजी, भाकरी किंवा वरण-भातासोबत अप्रतिम लागतो. जर तुम्हाला लसणाच्या पातीची भाजी खाऊन कंटाळा आला असेल, तर यंदा ट्राय करा 'हिरव्यागार पातीचा झणझणीत ठेचा'. लसणाची पात, हिरवी मिरची आणि शेंगदाण्याचा कूट वापरून बनवलेला हा ठेचा तुमच्या (Lasnachya Paticha Thecha Recipe) साध्या जेवणाची चवही दुप्पट करेल. हिरव्यागार पातीचा झणझणीत ठेचा तयार करण्याची साधीसोपी रेसिपी... 

साहित्य :- 

१. लसणाची पात - १ कप २. तेल - २ ते ३ टेबलस्पून ३. धणे - १ टेबलस्पून ४. जिरे - १ टेबलस्पून५. शेंगदाणे - १ कप ६. हिरव्या मिरच्या - ३ ते ४ मिरच्या ७. लसूण - १ कप (बारीक चिरलेल्या लसूण पाकळ्या)८. लसणाच्या पातीचे देठ - १ कप (बारीक चिरलेले)   ९. मीठ - चवीनुसार१०. कोथिंबीर - १/२ कप (बारीक चिरलेली) 

बाहेरून कुरकुरीत, आतून मऊ! घरीच करा उडपी स्टाईल खमंग डाळ वडे - गुलाबी थंडीतील झक्कास बेत... 

डाळ-तांदूळ नाही, वाटीभर 'फरसाण'चा करा कुरकुरीत डोसा! १० मिनिटांत इन्स्टंट पदार्थ - शेजारीही विचारतील रेसिपी... 

कृती :-

१. हिरवीगार लसणाची पात स्वच्छ धुवून त्याची मुळे कापून घ्यावीत. मग लसूण पाकळ्या काढून त्याचे छोटे - छोटे तुकडे करून घ्यावेत. २. त्यानंतर लसणाची हिरवीगार पात देखील बारीक चिरुन घ्यावी. ३. एका पॅनमध्ये तेल घेऊन ते व्यवस्थित गरम करून घ्यावेत. या गरम तेलात जिरे, धणे, शेंगदाणे, हिरव्या मिरच्या घालून खमंग अशी फोडणी तयार करून घ्यावी. 

खमंग, खुसखुशीत मेथी वडी! एकदा केली तर घरातील सगळ्यांचीच होईल फेवरिट डिश - अस्सल पौष्टिक पदार्थ...

४. मग यात बारीक चिरलेला लसूण पाकळ्या आणि बारीक चिरलेली लसणाची पात आणि बारीक चिरलेली कोथिंबीर देखील घालावी. हे सगळे मिश्रण चमच्याने कालवून एकजीव करून घ्यावे. २ ते ३ मिनिटे मंद आचेवर हे मिश्रण शिजवून घ्यावे व सगळ्यात शेवटी यात चवीनुसार मीठ घालावे. ५. तयार मिश्रण मिक्सरमध्ये किंवा पाटा वरवंट्याच्या मदतीने ठेचून त्याची जाडसर अशी भरड तयार करून घ्यावी. 

थंडीच्या दिवसांत मस्त, ताज्या हिरव्यागार लसणाच्या पातीचा झणझणीत ठेचा भाकरी सोबत खायला अधिकच चविष्ट लागतो.

English
हिंदी सारांश
Web Title : Grandma's garlic scape thecha recipe: A spicy, traditional delight!

Web Summary : Enjoy the winter season with a traditional and healthy garlic scape thecha. This spicy condiment, made with fresh garlic scapes, peanuts, and green chilies, enhances digestion, provides warmth, and doubles the taste of any simple meal. Try this simple recipe for a flavorful experience.
टॅग्स :अन्नपाककृतीहिवाळाहिवाळ्यातला आहार