Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > कपभर दलिया आणि पोह्याचा कुरकुरीत डोसा, पचायला हलका, चवीला भारी आणि रेसिपी सोपी आणि पौष्टिक

कपभर दलिया आणि पोह्याचा कुरकुरीत डोसा, पचायला हलका, चवीला भारी आणि रेसिपी सोपी आणि पौष्टिक

Healthy Dalia and Poha Dosa Recipe: Instant Crispy Dosa without Rice: High Protein Breakfast Ideas Marathi: कपभर लापशी आणि पोह्यांपासून हा हेल्दी डोसा कसा तयार करायचा, यासाठी लागणारे साहित्य आणि कृती पाहूया.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2026 09:30 IST2026-03-10T09:30:00+5:302026-03-10T09:30:02+5:30

Healthy Dalia and Poha Dosa Recipe: Instant Crispy Dosa without Rice: High Protein Breakfast Ideas Marathi: कपभर लापशी आणि पोह्यांपासून हा हेल्दी डोसा कसा तयार करायचा, यासाठी लागणारे साहित्य आणि कृती पाहूया.

Lapsi ani poha dosa recipe Healthy Dalia and Poha Dosa Recipe Instant Crispy Dosa without Rice Lapsi and Poha Dosa for Weight Loss Daliyacha dosa kasa banvaycha Zatpat ani kurkurit dosa recipe | कपभर दलिया आणि पोह्याचा कुरकुरीत डोसा, पचायला हलका, चवीला भारी आणि रेसिपी सोपी आणि पौष्टिक

कपभर दलिया आणि पोह्याचा कुरकुरीत डोसा, पचायला हलका, चवीला भारी आणि रेसिपी सोपी आणि पौष्टिक

आज काय बनवू असा प्रश्न गृहिणींना रोजच पडतो. रोज तेच पोहे किंवा उपमा खाऊन कंटाळा आला असेल तर लापशी आणि पोह्यांचा डोसा हा एक उत्तम आणि आरोग्यदायी पर्याय आहे.(Healthy Dalia and Poha Dosa Recipe) सहसा आपण तांदूळ आणि उडदाची डाळ भिजवून डोसा बनवतो, ज्यासाठी बराच वेळ लागतो. मात्र, लापशी आणि पोह्यांपासून बनवलेला हा डोसा चवीला जितका चविष्ट लागतो, तितकाच तो पौष्टिकही असतो.
हा डोसा बनवण्यासाठी आपल्याला तांदूळ भिजवण्याची किंवा आंबवण्याची तासनतास वाट पाहावी लागत नाही.(Instant Crispy Dosa without Rice) झटपट तयार होणारा आणि कुरकुरीत टेक्सचर असलेला हा नाश्ता आपल्या सकाळची सुरुवात अधिक ऊर्जावान करतो.(High Protein Breakfast Ideas Marathi) जाणून घेऊया कपभर लापशी आणि पोह्यांपासून हा हेल्दी डोसा कसा तयार करायचा, यासाठी लागणारे साहित्य आणि कृती पाहूया.

कोकणी मेजवानी! कोवळ्या फणसाचा झणझणीत 'सुका मसाला', सोपी रेसिपी- एकदा खाल्लं तर बोटं चाटत राहाल

साहित्य 

लापशी- १ कप
मुगाची डाळ - १/४ कप 
उडदाची डाळ - २ मोठे चमचे 
मेथी दाणे - १ छोटा चमचा
पोहा - १/४ कप 
मीठ - १ चमचा
तूप - १ चमचा 
लाल तिखट - १ चमचा
कोथिंबीर 

कृती 

1. सगळ्यात आधी एका बाऊलमध्ये लापशी, मुगाची डाळ, उडदाची डाळ, मेथीचे दाणे घालून दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवा. 

2. नंतर हे मिश्रण मिक्सरमध्ये घेऊन त्यात कपभर पोहे आणि पाणी घाला. बॅटर तयार करुन हाताने फेटून घ्या. मिश्रण ८ ते ९ तासांसाठी झाकून ठेवा. 

3. दुसऱ्या दिवशी पीठ व्यवस्थित फुगेल, त्याला चमच्याने ढवळून घ्या. त्यात मीठ घालून पुन्हा मिश्रण फेटून घ्या. 

4. आता पॅनला तेलाने ग्रीस करुन घ्या. डोसाचे बॅटर पसरवून घ्या. वरुन तूप, लाल तिखट आणि कोथिंबीर घाला. डोसा कुरकुरीत झाल्यानंतर चटणीसोबत खा. 


Web Title : स्वस्थ दलिया और पोहा डोसा: आसान, स्वादिष्ट और पौष्टिक रेसिपी

Web Summary : क्या आप रोज एक जैसा नाश्ता करके थक गए हैं? इस स्वादिष्ट और पौष्टिक दलिया और पोहा डोसा को आजमाएं। यह झटपट और कुरकुरा डोसा प्रोटीन और ऊर्जा से भरपूर है, जो आपके दिन की शुरुआत के लिए एकदम सही है। आसान रेसिपी और सामग्री यहाँ पाएं।

Web Title : Healthy Dalia and Poha Dosa: Easy, tasty, and nutritious recipe.

Web Summary : Tired of the same old breakfast? Try this healthy and delicious Dalia and Poha Dosa. This instant, crispy dosa is packed with protein and energy, perfect for a quick and nutritious start to your day. Find the simple recipe and ingredients here.