मस्त मऊ लुसलुशीत पाव, लाल सुकी झणझणीत चटणी आणि कुरकुरीत तळलेला गरम वडा म्हणजे सगळ्यांचाच विक पॉइंट. गरमागरम वडापावला खरी चव येते ती त्याच्यासोबत दिल्या जाणाऱ्या लाल सुकी चटणी आणि तळलेल्या मिरच्यांमुळेच. गरमागरम तळलेला वडा आणि पावाला लावलेली सुकी - ओली चटणी याची चटपटीत चव (vada pav chutney recipe) कायम प्रत्येकाच्याच जिभेवर रेंगाळत राहते. वडापाव सोबत दिली जाणारी लाल सुकी तिखट चटणी वडापावची चव आणखीनच वाढवते. रस्त्यांच्या कडेला असणाऱ्या ठेल्यावर वडापाव सोबत दिली जाणारी लाल सुकी तिखट चटणी आपण घरच्या घरी देखील तयार करु शकतो(Home Made Mumbai Vada Pav Chutney).
वडा पाव म्हटलं की त्यासोबत मिळणारी तिखट, झणझणीत आणि खमंग सुकी चटणी आठवतेच! अनेकदा आपण ही चटणी तव्यावर किंवा पॅनमध्ये तयार करतो, पण आपण ही चटणी एका नव्या सोप्या पद्धतीने अगदी झटपट तयार करु शकतो. आपण चक्क आप्पे पात्रात ही वडा पावाची सुकी चटणी घरच्याघरीच तयार करू शकतो. या पद्धतीने चटणी केल्यास चटणीला एकसंध आणि खमंगपणा येतो, आणि त्यात फारसं तेलही लागत नाही. कमी वेळ, कमी मेहनत तरीही भन्नाट चवीची चटणी तयार करायची असेल तर ही ट्रिक नक्की फॉलो करा. आप्पे पात्रात वडापावची सुकी झणझणीत चटणी करण्याची रेसिपी पाहा(Dry Garlic Chutney Powder, Vada Pav Chutney).
साहित्य :-
१. लसूण पाकळ्या - २० ते २५ पाकळ्या
२. मीठ - चवीनुसार
३. बेसन - १ कप
४. पाणी - गरजेनुसार
५. काश्मिरी लाल मिरची पावडर- १ टेबलस्पून
६. तेल - ४ ते ५ टेबलस्पून
७. हळद - १/४ टेबलस्पून
८. पांढरे तीळ - १ टेबलस्पून
९. सुक खोबरं - १ कप
भाजी-आमटीत गरम मसाला कधी आणि कसा घालावा ? परफेक्ट पद्धत-पदार्थ बिघडणार नाही होईल चविष्ट...
पोह्याच्या पुऱ्या करा पोह्याच्या पुऱ्या! कांदेपोहे खाताच, मात्र पोह्याचा हा पदार्थ पावसाळा स्पेशल...
कृती :-
१. सगळ्यातआधी आप्पे पात्र गॅसच्या मंद आचेवर ठेवून व्यवस्थित गरम करून घ्यावे. त्यानंतर या आप्पे पात्रात थोडे तेल घालावे.
२. आता या गरम तेलात लसूण पाकळ्या घालाव्यात २ ते ३ मिनिटे मंद आचेवर लसूण पाकळ्या खरपूस भाजून घ्याव्यात. लसूण पाकळ्या भाजून झाल्यानंतर त्या एका बाऊलमध्ये काढून घ्याव्यात.
गरमगरम मऊ लुसलुशीत लोणी स्पंज डोसा करण्याची पाहा परफेक्ट पद्धत आणि प्रमाण, पावसाळ्यातली मेजवानी...
३. एका मोठ्या बाऊलमध्ये बेसन घेऊन त्यात चवीनुसार मीठ, हळद, पाणी घालून त्याची मध्यम कन्सिनस्टंसीची पेस्ट बनवून घ्यावी. ही बेसनाची तयार पेस्ट पुन्हा चमच्याच्या मदतीने आप्पे पात्रात थोडी थोडी घालावी. बेसनाच्या पिठाच्या गोल भज्या तयार झाल्यावर त्या एका बाऊलमध्ये काढून घ्याव्यात.
४. मिक्सरच्या मोठ्या भांड्यात भाजलेल्या लसूण पाकळ्या, बेसनाच्या पिठाच्या गोल भज्या, चवीनुसार मीठ, पांढरे तीळ, काश्मिरी लाल मिरची पावडर हवे असल्यास थोडं सुक खोबरं असे सगळे जिन्नस घालावेत. हे मिश्रण बारीक पूड होईपर्यंत वाटून घ्यावे.
वडापाव सोबतची सुकी लाल चटणी खाण्यासाठी तयार आहे. ही तयार चटणी एका हवाबंद बरणीत भरुन स्टोअर करावी.