Join us

न वाफवता करा ८ दिवस टिकणारी कुरकुरीत कोथिंबीर वडी, करायला सोपी चवीला उत्तम - पाहा रेसिपी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2025 14:23 IST

Kothimbir Vadi : Kothimbir Vadi Recipe : how to make maharashtrian kothimbir vadi recipe : Kothimbir Vadi Maharashtrian Snack Recipe : न वाफवता आणि फारशी मेहेनत न घेता झटपट सोप्या पद्धतीने कोथिंबीर वडी करण्याची इन्स्टंट रेसिपी

पावसाळ्याचे दिवस सुरु असल्याने बाजारांत छान हिरवीगार कोथिंबीर विकायला ठेवलेली  असते. अशी छान हिरवीगार, ताजी कोथिंबीर घेण्याचा मोह आवरता येत नाही. मग काय... ही कोथिंबिरीची जुडी विकत आणली जाते आणि मग कोथिंबीर वडीचा (Kothimbir Vadi Recipe) बेत झालाच नाही असे होऊ शकत नाही. 'कोथिंबीर वडी' (Kothimbir Vadi) हा एक लोकप्रिय आणि चविष्ट महाराष्ट्रीयन पदार्थ आहे. मुसळदार पावसात गरमागरम कोथिंबीर वडी खाण्याची मज्जा आणि आनंद काही औरच असतो(how to make maharashtrian kothimbir vadi recipe).

कोथिंबीर वडी घरी करायची म्हटलं की, साधारणपणे आपण वडी वाफवून किंवा तळून करतो. जर आपल्याला तळणं आणि वाफवणं टाळून हलकी आणि हेल्दी कोथिंबीर वडी खायची असेल, तर खास पद्धतीने न वाफवता आणि न तळता देखील  कोथिंबीर वडी तयार करता येते. या पद्धतीने तयार केलेली कोथिंबीर वडी कमी कॅलरीजची, पचनास सोपी आणि पौष्टिक असते. शिवाय ती पटकन तयार होते आणि विशेष मेहनतही लागत नाही. आरोग्याची काळजी घेणाऱ्यांसाठी आणि वजन कमी करू इच्छिणाऱ्यांसाठी अशा पद्धतीने तयार केलेली कोथिंबीर वडी एक उत्तम पर्याय आहे. न वाफवता आणि फारशी मेहेनत न घेता झटपट सोप्या पद्धतीने कोथिंबीर वडी करण्याची इन्स्टंट रेसिपी पाहूयात.

साहित्य :- 

१. ओलं खोबरं - १ कप २. लसूण पाकळ्या - ५ ते ६ पाकळ्या ३. हिरव्या मिरच्या - ४ ते ५ मिरच्या ४. हळद - १/२ टेबलस्पून ५. जिरे - १ टेबलस्पून ६. मीठ - चवीनुसार ७. लिंबाचा रस - २ टेबलस्पून८. पाणी - गरजेनुसार९. बेसन  - १ कप १०. कोथिंबीर - २ कप (बारीक चिरलेली) ११. तांदुळाचे पीठ - १/२ कप १३. पांढरे तीळ - २ टेबलस्पून १४. तेल - गरजेनुसार

लालचुटूक टोमॅटोचे भरीत एकदा खाऊन पाहा, चव लय भारी! पाहा टोमॅटोच्या भरीताची मस्त रेसिपी...

बटाटे उकडताना फुटतात, लगदा होतो? ८ टिप्स - बटाटे उकडण्याची परफेक्ट पद्धत, काम होईल झटपट...

कृती :- 

१. एका मिक्सरच्या मोठ्या भांड्यात ताजे किसून घेतलेले ओलं खोबरं, हिरव्या मिरच्या, लसूण पाकळ्या, हळद, जिरे, चवीनुसार मीठ, लिंबाचा रस व गरजेनुसार  पाणी घालून एकत्रितपणे त्याचे मिश्रण वाटून घ्यावे. मिश्रण थोडे पातळ रसरशीत आणि मध्यम कंन्सिस्टंन्सीचे असावे. २. आता एका मोठ्या भांड्यात पाणी घेऊन ते पाणी व्यवस्थित उकळवून घ्यावे. या उकळत्या पाण्यात मिक्सरमध्ये वाटून घेतलेले मिश्रण ओतावे. 

चुकूनही ‘या’ ७ भाज्या शिजतांना पाणी घालू नका, करा वाफेवर! नाहीतर भाजी होईल बेचव...

३. आता हे मिश्रण चमच्याने हलवून पाण्यांत एकजीव करून कालवून घ्यावे. २ ते ३ उकळ्या काढून घ्याव्यात. ४. आता या मिश्रणात बेसन, बारीक चिरलेली कोथिंबीर, तांदुळाचे पीठ व पांढरे तीळ घालावेत. आता हे सगळे मिश्रण एकत्रित कालवून घ्यावे. या मिश्रणात गुठळ्या तयार होऊ देऊ नका. आता मध्यम आचेवर गॅस ठेवून मिश्रण शिजवून घ्यावे. (कोथिंबीर वडीचे बॅटर पिठल्याप्रमाणेच रसरशीत शिजवून घ्यावे.)५. आता एका डिशला तेल लावून त्यात हे तयार मिश्रण ओतून घ्यावे. मिश्रण ताटात व्यवस्थित पसरवून घ्यावे. मग हे मिश्रण थोडे थंड होऊ द्यावे, मिश्रण थंड झाल्यावर व्यवस्थित सेट होते.६. मिश्रण थंड झाल्यावर आपल्याला आवडत्या आकारात त्याच्या वड्या कापून घ्याव्यात. या वड्या आपण तेलात तळू शकता किंवा शॅलो फ्राय करू शकता. 

न वाफवता आणि फारसे कष्ट न घेता खाण्यासाठी तयार आहे इन्स्टंट कोथिंबीर वडी... मुसळधार कोसळणाऱ्या पावसांत गरमागरम, बाहेरुन कुरकुरीत व आतून मऊ अशी कोथिंबीर वडी खाण्यासाठी तयार आहे. सॉस, चटणी सोबत कोथिंबीर वडी  खाल्ल्यास अधिक चविष्ट लागते.

टॅग्स :अन्नपाककृती