थंडीचे दिवस सुरु झाले असल्याने बाजारांत ताज्या, हिरव्यागार भाज्या विकायला ठेवलेल्या दिसतात. यामध्ये ताजी, हिरवीगार, सुवासिक कोथिंबीर असेल तर आपण हमखास कोथिंबिरीची किमान एक तरी जुडी विकत घेतोच. एरवी आपण काही पदार्थांवर भुरभुरवून टाकण्यासाठी किंवा फार फार तर चटणी पुरतीच थोडीशी कोथिंबीर वापरतो. परंतु घरभर सुगंध दरवळून टाकणाऱ्या या कोथिंबीरीचे अनेक पदार्थ देखील तयार करता येतात, त्यापैकीच एक झटपट, सोपी आणि खूप चविष्ट अशी रेसिपी म्हणजे कोथिंबिरीची मसालेदार पुरी(How To Make Kothimbir Masala Puri Recipe).
थंडीच्या दिवसांत सकाळी किंवा संध्याकाळी गरमागरम पुरी नाश्ता म्हणून आपण पोटभर खाऊ शकतो. या पुऱ्यांमधील कोथिंबिरीची ताजी चव एकदम अप्रतिम लागते. ही पुरी फक्त चविष्ट नाही, तर शरीराला ऊब देणारीही असते. या कोथिंबीर पुरीसोबत साधी भाजी, लोणचं किंवा दही काहीही खा, हिवाळ्यातील स्नॅक्स टाईमसाठी अगदी परफेक्ट पदार्थ...
साहित्य :-
१. गव्हाचे पीठ - २ कप २. बारीक रवा - १ कप ३. मीठ - चवीनुसार ४. हळद - १/२ टेबलस्पून ५. लाल तिखट मसाला - १/२ टेबलस्पून ६. लाल मिरची पावडर - १ टेबलस्पून ७. धणेपूड - १ टेबलस्पून ८. जिरेपूड - १ टेबलस्पून ९. पांढरे तीळ - १ टेबलस्पून १०. ओवा - १ टेबलस्पून ११. हिंग - चिमूटभर१२. हिरव्या मिरचीची पेस्ट - १ टेबलस्पून १३. आलं - लसूण पेस्ट - १ टेबलस्पून १४. साजूक तूप - १ टेबलस्पून १५. कोथिंबीर - १ कप (बारीक चिरलेली)१६. पाणी - गरजेनुसार
थंडीत आवर्जून खा पारंपरिक आवळ्याची डाळ! चवीला अप्रतिम, आरोग्याला पौष्टिक - हिवाळ्यातील सुपरफूड!
कृती :-
१. एका मोठ्या बाऊलमध्ये गव्हाचे पीठ घेऊन त्यात बारीक रवा, चवीनुसार मीठ, हळद, लाल तिखट मसाला, लाल मिरची पावडर, धणेपूड, जिरेपूड, पांढरे तीळ, ओवा, हिंग, हिरव्या मिरचीची पेस्ट, आलं - लसूण पेस्ट, साजूक तूप, बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. २. आता हे सगळे मिश्रण कालवून एकजीव करून घ्यावे. त्यानंतर यात गरजेनुसार थोडं, थोडं पाणी घालून नेहमीप्रमाणे पुऱ्यांसाठीचे पीठ मळून घ्यावे.
३. मळून घेतलेल्या कणकेचे मध्यम आकाराचे गोळे तयार करून घ्यावेत. या गोळ्यांवर थोडे तेल लावून पुऱ्या लाटून घ्याव्यात. ४. एका मोठ्या कढईमध्ये तेल घेऊन ते व्यवस्थित गरम करावे. तेल गरम झाल्यावर त्यात लाटलेल्या पुऱ्या सोडून टम्म फुगेपर्यंत खरपूस अशा तळून घ्याव्यात.
मस्त गरमागरम कोथिंबिरीच्या टम्म फुगलेल्या पुऱ्या खाण्यासाठी तयार आहेत. या पुऱ्या आपण नुसत्याच किंवा टोमटो सॉस, चटणी किंवा रस्सेदार बटाट्याच्या भाजीसोबत खाल्ल्यास या चटकदार पुऱ्यांची चव दुपटीने वाढते.
Web Summary : Enjoy warm, flavorful coriander puri this winter! This simple recipe uses fresh coriander and spices for a tasty, energy-boosting snack. Perfect with yogurt, pickle, or any side dish.
Web Summary : इस सर्दी में धनिया की स्वादिष्ट और गरम पूरी का आनंद लें! यह आसान रेसिपी ताज़ा धनिया और मसालों का उपयोग करके एक स्वादिष्ट और ऊर्जा बढ़ाने वाला नाश्ता बनाती है। दही, अचार या किसी भी साइड डिश के साथ परोसें।