हिरवीगार कोथिंबीर पदार्थांवर भुरभुरवून घातली तर त्या पदार्थांची चव दुपटीने वाढते. नेहमीची डाळ, वरण, आमटी, भाजी यांवर आपण हमखास कोथिंबीर भुरभुरवून घालतोच. रोज स्वयंपाकात (Hare Dhaniye Ki Puri Recipe) वापरली जाणारी कोथिंबीर आपण एकदाच विकत आणून ती स्टोअर करून ठेवतो. काहीवेळा कोथिंबीर (Kothimbir Puri) जास्त झाली की आपण कोथिंबीरचे (How To Make Coriander Puri) वेगवेगळे चविष्ट पदार्थ करतो. घरांत कोथिंबीर जास्त प्रमाणात असेल तर हमखास कोथिंबीर वडीचा बेत केला जातो.
कोथिंबीर फक्त पदार्थांवर भुरभुरवून घालण्यासाठीच वापरत नाही तर, त्याचे अनेक पदार्थ केले जातात, कोथिंबीर पुरी हा त्यापैकीच एक खास पदार्थ. नाश्त्याला किंवा संध्याकाळच्या टी-टाईम स्नॅक्ससाठी आपण चाहसोबत या चविष्ट कोथिंबीर पुऱ्या खाऊन शकतो. जेवणात बटाट्याच्या भाजी सोबत ही पुरी खाताना तर अधिकच स्वादिष्ट लागते. जर तुमच्याकडे देखील कोथिंबीरची जास्तीची जुडी असेल तर तुम्ही कोथिंबीर पुरी अगदी झटपट करू शकता. कोथिंबीर पुरी कशी करायची याची रेसिपी पाहुयात.
साहित्य :-
१. गव्हाचे पीठ - २ कप
२. रवा - १ कप
३. हळद - १ टेबलस्पून
४. लाल तिखट मसाला - १ टेबलस्पून
५. धणेपूड - १ टेबलस्पून
६. जिरेपूड - १ टेबलस्पून
७. हिंग - १/२ टेबलस्पून
८. ओवा - १ टेबलस्पून
९. पांढरे तीळ - १ टेबलस्पून
१०. मीठ - चवीनुसार
११. साखर - १ टेबलस्पून
१२. साजूक तूप - २ टेबलस्पून
१३. बडीशेप पावडर - १ टेबलस्पून
१४. कोथिंबीर - २ कप (बारीक चिरलेली)
१५. पाणी - गरजेनुसार
१६. तेल - तळण्यासाठी
फक्त १५ मिनिटांत करा इन्स्टंट थालीपीठ, चव अगदी भाजणीच्या थालीपीठासारखीच खमंग...
कृती :-
१. सगळ्यांत आधी एका पसरट परातीमध्ये गव्हाचे पीठ, रवा, हळद, लाल तिखट मसाला, धणेपूड, जिरेपूड, हिंग, ओवा, पांढरे तीळ, बडीशेप पावडर, साजूक तूप, चवीनुसार मीठ व साखर घालावे. सगळ्यांत शेवटी यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी.
२. आता यात गरजेनुसार पाणी घालूंन पुरीसाठीचे पीठ मळून घ्यावे.
३. मळून घेतलेल्या पिठाला तेल लावून १५ ते २० मिनिटे पीठ झाकून ठेवावे.
फराह खानला आवडते 'चटपटे आलू की सब्जी'! पाहा तिची रेसिपी, एकदा खाल्ली तर पुन्हा कराल...
४. २० मिनिटानंतर या तयार पिठाचे छोटे गोळे करून गोलाकार पुऱ्या लाटून घ्याव्यात.
५. लाटून घेतलेल्या पुऱ्या मध्यम आचेवर गरम तेलात खरपूस तळून घ्याव्यात.
मस्त चटपटीत, चविष्ट कोथिंबिरच्या पुऱ्या खणयासाठी तयार आहेत. गरमागरम चहासोबत आपण टी - टाईम स्नॅक्स म्हणून या पुऱ्या खाऊ शकता.