Join us

Konkan Food : कोकणातला पारंपरिक पदार्थ नारळाच्या दुधाचा हलवा, मुलांच्या आवडीचा खास पदार्थ, सोपी रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2025 09:35 IST

authentic Konkan food: coconut halwa with jaggery: Konkan Food: नारळाच्या दुधाचा हलवा मुलांसाठी खास गोडाचा पदार्थ कसा करायचा?

कोकण म्हटलं की, अनेक चमचमीत आणि चविष्ट पदार्थांची चव आपल्याला चाखायला मिळते.(Konkan food) नारळ आणि तांदूळ हा तेथील मुख्य पदार्थ. पदार्थाची चव वाढवण्यासाठी कोकणातील अनेक भागांमध्ये नारळाची चव घातली जाते. नारळच नाही तर त्याच्या दुधापासून देखील अनेक खास पदार्थ केले जातात. (authentic Konkan food)नारळाच्या दुधाचा हलवा ही एक स्वादिष्ट आणि चविष्ट अशी मिठाई आहे.(coconut halwa with jaggery) जो नारळाच्या दुधापासून केली जाते. यात नारळाच्या दुधाची चव आणि सुगंध असतो.(homemade Konkani dessert) ही रेसिपी करायला अगदी साधी आणि चविष्ट आहे. पाहूया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती. 

Ashadhi Ekadashi Food : आषाढी एकादशीला करा उपवासाचा कुरकुरीत मेदूवडा! चविष्ट आणि पौष्टिक पदार्थ

साहित्य 

ओल्या नारळाचा किस - २ वाटी पाणी - २ कप चिरलेला गूळ - १ वाटीकॉनफ्लॉवर - २ चमचे तूप - २ चमचा वेलची पूड - १ चमचा केळीचे पान बदाम - ५ ते ६

कृती 

1. सगळ्यात आधी नारळ फोडून त्याला खवून घ्या. नारळाचा किस निघाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात नारळाचा किस आणि पाणी घालून तो वाटून घ्या. 

2. आता एका सुती कापड्यात वाटलेल्या नारळाचा किस घालून तो पिळून घ्या. यातून नारळाचे दूध बाहेर निघेल. त्यानंतर गूळ किसून घ्या. 

3. एका भांड्यात नारळाचे दूध आणि कॉनफ्लॉवर घालून चमच्याने ढवळून घ्या. गॅसवर दूध तापवून त्यात चमचाभर तूप घाला. दुधाला उकळी आल्यानंतर वेलची पावडर घाला. वरुन गूळ घालून मिश्रण घट्ट करा. 

4. डब्यामध्ये केळीचे पान ठेवून त्यात तूप लावा. त्यावर बदाम ठेवून तयार केलेले मिश्रण घाला आणि सेट होण्यास ठेवा. नंतर झाल्यानंतर त्याच्या वड्या पाडा. 

 

टॅग्स :अन्नपाककृती