Lokmat Sakhi >Food > कोकणातील पारंपरिक लुसलुशीत सुरनोळी करा नाश्त्याला, खास कोकणी बेत - रविवार होईल झक्कास!

कोकणातील पारंपरिक लुसलुशीत सुरनोळी करा नाश्त्याला, खास कोकणी बेत - रविवार होईल झक्कास!

Konkani soft & fluffy Surnoli Dosa Recipe : Soft & Spongy Konkan Delicacy Surnali Dosa Recipe : Konkani Breakfast Surnoli Dosa : Authentic Konkani Breakfast Surnoli recipe : How To Make Surnali Dosa At Home : नाश्त्याला नेहमीचेच डोसा, इडली असे पदार्थ करण्यापेक्षा कोकणातील पारंपरिक सूरनोळीचा आस्वाद घ्या...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2025 10:34 IST2025-04-18T06:28:56+5:302025-04-18T10:34:25+5:30

Konkani soft & fluffy Surnoli Dosa Recipe : Soft & Spongy Konkan Delicacy Surnali Dosa Recipe : Konkani Breakfast Surnoli Dosa : Authentic Konkani Breakfast Surnoli recipe : How To Make Surnali Dosa At Home : नाश्त्याला नेहमीचेच डोसा, इडली असे पदार्थ करण्यापेक्षा कोकणातील पारंपरिक सूरनोळीचा आस्वाद घ्या...

Konkani soft & fluffy Surnoli Dosa Recipe Soft & Spongy Konkan Delicacy Surnali Dosa Recipe Authentic Konkani Breakfast Surnoli recipe | कोकणातील पारंपरिक लुसलुशीत सुरनोळी करा नाश्त्याला, खास कोकणी बेत - रविवार होईल झक्कास!

कोकणातील पारंपरिक लुसलुशीत सुरनोळी करा नाश्त्याला, खास कोकणी बेत - रविवार होईल झक्कास!

'सूरनोळी' हा कोकणातील अतिशय लोकप्रिय पारंपरिक पदार्थ आहे. महाराष्ट्रातील कोकण भागांत हा पदार्थ बऱ्याचदा नाश्त्याला किंवा जेवणाला आवडीने खाल्ला जातो. कोकणातील हा मऊ, लुसलुशीत पारंपरिक पदार्थ आता सगळ्यांच्याच घरात मोठ्या आवडीने तयार करून खाल्ला जातो. 'सूरनोळी' या दोन प्रकारे (Konkani soft & fluffy Surnoli Dosa Recipe) तयार केल्या जातात, एक गोडाची सूरनोळी आणि एक मिठाची (Konkani Breakfast Surnoli Dosa) सूरनोळी. मिठाची सूरनोळी (Soft & Spongy Konkan Delicacy Surnali Dosa Recipe) म्हणजे एक प्रकारे डोसा किंवा आंबोळीचाच प्रकार आहे, असं म्हणायला हरकत नाही. शक्यतो मिठाची सूरनोळी हा पदार्थ पिवळी बटाट्याची भाजी, खोबऱ्याची घट्ट चटणी किंवा काळ्या वाटाण्याच्या सांबार सोबत खाल्ला जातो. कोकणातील हा खास लोकप्रिय पदार्थ सकाळी नाश्त्याला खाणे म्हणजे याहून मोठे सुख नाही( Authentic Konkani Breakfast Surnoli recipe).

 'सूरनोळी' हा पदार्थ मऊ, लुसलुशीत, छान जाळीदार झाला तरच खायला मजा येते. 'सूरनोळी' तयार करण्यासाठी त्याचे इडली, डोशाप्रमाणेच पीठ तयार करून ते  आंबवून घ्यावे लागते. 'सूरनोळी' (How To Make Surnali Dosa At Home) करण्यासाठी तांदुळाचे योग्य प्रमाण घेऊन त्याचे पीठ तयार करावे लागते. जर का हे प्रमाण चुकले तर 'सूरनोळी'चे पीठ व्यवस्थित फुलून येत नाही. त्यामुळे छान जाळीदार, मऊ, लुसलुशीत 'सूरनोळी' बनत नाही. यासाठी  'सूरनोळी' बनवताना त्यात तांदुळाचे प्रमाण किती घ्यावे ? पीठ कसे भिजवावे ? सूरनोळी कशी करावी ? याचे साहित्य व कृती पाहूयात. 

साहित्य :-

१. तांदूळ - १ कप 
२. पोहे - १/२ कप 
३. मेथी दाणे - १/४ टेबलस्पून 
४. दही - १/४ कप 
५. ओलं खोबरं - १/२ कप (किसलेलं ओलं खोबरं)
६. मीठ - चवीनुसार
७. पाणी - गरजेनुसार 
८. तेल - ४ ते ५ टेबलस्पून 

भेंडी चिरताना हात चिकट - बुळबुळीत होतात? ४ टिप्स, हात चिकट न होता भेंडी चिरा भरभर...


खरबुजाच्या बिया फेकून नुकसान करु नका, करा १० मिनिटांत खरबूज बियांचे मिल्कशेक! उन्हाळा गारेगार...

कृती :-

१. सगळ्यांत आधी एका मोठ्या भांड्यात तांदूळ, पोहे, मेथी दाणे असे सगळे जिन्नस एकत्रित करून ते पाण्याने २ ते ३ वेळा स्वच्छ धुवून घ्यावेत. 
२. त्यानंतर या मिश्रणात पाणी घालून ३ ते ४ तासांसाठी तसेच ठेवून भिजवून घ्यावे. 
३. ४ तासांनंतर यातील पाणी काढून सगळे मिश्रण मिक्सरमध्ये ओतून घ्यावे. यासोबतच, यात दही आणि किसलेलं ओलं खोबरं देखील घालावे. आता सगळे जिन्नस एकत्रित मिक्सरमध्ये वाटून घ्यावे. 

उन्हाळ्यात घरीच करा मस्त ‘मँगो लस्सी!’ बाहेरच्या लस्सीने मुलांचा घसा बिघडण्याचाही धोका नाही...

४. मिक्सरमध्ये वाटून घेतलेले मिश्रण एका मोठ्या भांड्यात काढून घ्यावे. हे भांड झाकून ८ ते १० तासांसाठी पीठ फर्मेंटेशन होण्यासाठी ठेवून द्यावे.  
५. ८ ते १० तासानंतर या पिठात चवीनुसार मीठ घालून पीठ कालवून घ्यावे. 
६. तव्याला तेल लावून तयार पीठ तव्यावर डोशाप्रमाणे गोलाकार घालूंन सुरनोळी दोन्ही बाजूने खरपूस भाजून तयार करून घ्यावी. 

गरमागरम तयार सुरनोळी हिरव्या चटणीसोबत खाण्यासाठी सर्व्ह करावी.

Web Title: Konkani soft & fluffy Surnoli Dosa Recipe Soft & Spongy Konkan Delicacy Surnali Dosa Recipe Authentic Konkani Breakfast Surnoli recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.