Join us

रिमझिम पावसातलं सुख म्हणजे काकडीचं मोकल! कोकणातील पारंपरिक पदार्थ-पचायला हलका आणि करायला सोपा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2025 10:31 IST

Konkani traditional recipes: Kakdi chi Mokal recipe: Konkani monsoon special food : कोकणातला आगळावेगळा पदार्थ काकडीचे मोकल

पावसाळा म्हटलं की आठवतो तो हिरवागार कोकणातील निसर्ग, चमचमीत पदार्थ.(Konkani Food) पावसाळ्यात कोकणात अनेक पदार्थांची रेलचेल असते. भाकरी, भात, घावन, अळूचं फदफदं, नारळाच्या पदार्थांची चव चाखली जाते. पण यातीलच एक आगळावेगळा पदार्थ काकडीचं मोकल.(Maharashtra Traditional food) हा पदार्थ पारंपरिकरित्या गावागावात विशेषत: पावसाळ्यात बनवला जातो. (Konkani traditional recipes) हा पदार्थ हलक्या आणि मध्यम आचेवर तयार केला जाणारा पदार्थ. यात रवा, ओले खोबरे घालून याची चव आणखी वाढवली जाते. केळ्याच्या पानांवर किंवा ताटात वाफवून बनवला जातो.(Kakdi chi Mokal recipe) हा पदार्थ केवळ चविष्टच नाही तर आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे.(Konkani monsoon special food) काकडीमुळे शरीराला थंडावा मिळतो तर नारळामुळे पोषणमूल्य वाढते. हा पदार्थ कसा बनवायचा, यासाठी लागणारे साहित्य कोणते पाहूया. 

गणपती बाप्पाच्या नैवैद्यासाठी करा गुलाबी उकडीचे मोदक, सुंदर गोडगुलाबी मऊ मोदक करण्याची सोपी ट्रिक

साहित्य 

१ कप - किसलेला हिरवी काकडी१/२ कप-  गूळ१/२ कप - ताजं किसलेलं खोबरं१ चमचा - तूप१/२ कप - इडली रवा१ चमचा-  सुका मेवा (ऐच्छिक)१/४ चमचा-  वेलची पूड१/२ चमचा - तूप

कृती 

1. सगळ्यात आधी काकडी स्वच्छ धुवून वरील साल काढून घ्या. त्यानंतर किसून घ्या. आता कढईमध्ये तूप चांगले गरम करुन त्यात इडलीचा रवा लालसर होईपर्यंत भाजा. वरुन मीठ घालून गॅस बंद करा.  

2. किसलेल्या काकडीमध्ये चिरलेला गूळ घालून एकजीव करा. फोडणी पात्रात तूप आणि ड्रायफ्रुट्स घाला. आता भाजलेल्या रव्यात तयार काकडीचे मिश्रण घाला. आणि चमच्याने एकजीव करा. त्यात ड्रायफ्रुट्स, वेलची पूड घालून काही मिनिटे झाकूण ठेवा. 

गव्हाची चपाती पौष्टिक होण्यासाठी पिठात कालवा ५ पदार्थ, १ सोपी ट्रिक- चपाती होईल मऊसुत- टम्म फुगेल..

3. आता एका पातेल्याला तूप लावून घ्या. गॅसवर पातेल ठेवून त्यात काकडी- रव्याचे मिश्रण घालून २५ ते ३० मिनिटे झाकूण ठेवा. १० ते १५ मिनिटानंतर थंड झाल्यावर वड्या पाडा. तयार होईल कोकणातील पारंपरिक पदार्थ काकडीचे मोकल. 

टॅग्स :अन्नपाककृती