Join us

Konkan Food: कोकणातला पारंपरिक पदार्थ 'वालाची आमटी', तोंडाला पाणी सुटेल अशी चमचमीत भाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2025 17:28 IST

Konkan traditional recipes: valach biradya : dalimbyanchi amti : डाळिंब्या किंवा बिरड्या कशा बनवायच्या पाहूया.

वाल म्हणजे घेवडा. कोकणात विशेषत: रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यांमध्ये वालाची आमटी हा अतिशय लोकप्रिय आणि पारंपरिक पदार्थ आहे. (Konkan food) याला घोळ्याची आमटी असं देखील काही ठिकाणी म्हटलं जातं. तर डाळिंब्या किंवा बिरड्या पण म्हणतात. (Valachi amati) कोकणात ही भाजी साधरणत: पावसाळ्यात जास्त प्रमाणात केली जाते. (Konkan traditional recipes) उपवासाची आमटी, सण-वार किंवा खास जेवणात ही चविष्ट आमटी आवर्जून असते. (valach biradya) गरमागरम भातासोबत किंवा भाकरीसोबत ही आमटी खाल्ली जाते. (dalimbyanchi amti) काही जण तुपासोबत भातात मिसळून खातात. हे खायला खूप पौष्टिक आणि पचनास हलके असतात. वालामध्ये प्रथिने, फायबर, आयर्न आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असते. ही आमटी प्रथिनांचा स्त्रोत मानली जाते. ही रेसिपी कशी करायची पाहूया.

पावसाळ्यात आस्वाद घ्या गरमागरम वडापाव बॅगेलचा, घरबसल्या खा स्वादिष्ट-खमंग पदार्थ, पाहा सोपी फ्यूजन रेसिपी

साहित्य

सोललेले वाल - पाव किलोबटाटा - १गूळ - ३ चमचेआमसूल - १ओले खोबरे - ३ चमचेभाजलेले खोबरे- जिरे - दीड चमचालाल मिरची पावडर - १ चमचागोडा मसाला - १ चमचामीठ - चवीनुसारकोथिंबीर - आवश्यकतेनुसारहळद - १ चमचाहिंग - चिमुटभरमोहरी - १ चमचाकडीपत्ता - ७ ते ८ पानं

कृती

1. सगळ्यात आधी बिरड्या स्वच्छ करुन दोन पाण्याने धुवून घ्या. त्यानंतर बटाटा सोलून त्याचे चौकोनी तुकडे करा.

2. आता कुकरमध्ये बिरड्या, बटाटे, तेल आणि पाणी घाला. कुकरचे झाकण लावून दोन ते तीन शिट्ट्या काढा. तेल घातल्याने आतील पाणी उतू जाणार नाही.

3. कुकर थंड झाल्यानंतर चमच्याने बिरड्या मॅश करुन घ्या. आता गॅसवर पातेल ठेवून त्यात तेल गरम करा. यात मोहरी, हळद, हिंग आणि जिरे घाला. वरुन कढीपत्ता घालून फोडणी तडतडू द्या.

4. शिजवलेल्या बिरड्या त्यात घाला. वरुन त्यात लाल तिखट, गोडा मसाला आणि मीठ घाला. बिरड्यांचा उग्र वास येतो त्यासाठी आमसूल आणि गूळ घाला. त्यात भाजलेले खोबरे आणि जिरे घाला. आमटी चमच्याने चांगली ढवळून घ्या.

5. वरुन ओल्या नारळाचा किस आणि कोथिंबीर घाला. उकळी आल्यानंतर गरमागरम भातासोबत खा वालाची आमटी. 

 

टॅग्स :अन्नपाककृती