कोकणात असे बरेच पदार्थ आहेत जे जेवणाची चव वाढवतात. (Roasted platter slider fusion) परंतु काही पारंपरिक पदार्थांनी कोकणातील खाद्यसंस्कृतीला समृद्ध आणि चविष्ट बनवले आहे.(Konkan Tilkut recipe) आरोग्यासाठीही उपयुक्त असतात. काही खास कोकणी पदार्थ आहेत जे आजही आवर्जून घरी बनवले जातात. घावने, काकडीची तौशे, भाकरी, सुरनोळी, पातोळी आणि खांडवी यांसारख्या पदार्थांची चव आपण चाखली असेलच. (Gavar bhaji recipe Maharashtrian)
ऑफिसच्या डब्यात किंवा दुपारच्या जेवणात आपल्याला असे पदार्थ खावेसे वाटतात जे भाकरी आणि भातासोबत देखील खाता येतील, त्यातीलच एक तिळकूट गवार.(Maharashtrian fusion food recipes) तिळकुटमध्ये तिळाचा मसाला तयार करुन गवारीच्या भाजीचा समावेश केला जातो.(How to make Tilkut at home) गवार भाजी ही साधी पौष्टिक आणि स्वादिष्ट कोकणी जेवणाचा अविभाज्य भाग आहे.(Konkan-style Gavar sabzi) हे दोन्ही पदार्थ कोकणातील परंपरेची चव आजही जपून ठेवतात. तिळकूट गवार कशी बनवायची पाहूया रेसिपी. (Fusion roasted slider recipes)
साहित्य
गवार - १ वाटी
धने - १ चमचा
कारळ - १ चमचा
लाल मिरची पावडर - १ चमचा
मीठ - चवीनुसार
तेल
ठेचलेल्या लसूण पाकळ्या - ४ ते ५
पाणी
कृती
1. सगळ्यात आधी गवारीचे तुकडे करुन घ्या. त्यानंतर गॅसवर पॅन ठेवा.
2. पॅन गरम झाल्यावर त्यात धने आणि कारळ भाजून घ्या. भाजल्यानंतर खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घ्या.
3. आता त्यात लाल मिरची पावडर, मीठ घालून चांगले एकजीव करा.
4. गॅसवर पातेल ठेवून त्यात पाणी आणि मीठ घाला. त्यात गवार शिजेपर्यंत उकळवून घ्या. चाळीमध्ये गाळून त्याचे पाणी काढा.
5. यामध्ये तयार तीळकूटचे मिश्रण घालून चमच्याने एकजीव करा. आता कढईत तेल गरम करुन त्यात ठेचलेला लसूण घाला.
6. त्यात एकजीव केलेल गवारीचे मिश्रण घालून थोडे परतवून घ्या. तयार होईल तीळकूट गवार.
7. दुपारच्या जेवणात भाकरी किंवा भातासोबत चवीने खा तीळकूट गवार भाजी.